मी पन्नास वर्षांची आहे. उंची पाच फूट दोन इंच आहे. वजन ६८ किलो आहे. वैद्यकीय व्यवसाय करते. रंग निमगोरा आहे. मला कोणत्या रंगाचे आणि प्रकारचे कपडे चांगले दिसतील?
सुहासिनी
नमस्कार सुहासिनी,
तुमच्या आत्ताच्या वयाचा विचार करता शरीर प्रमाणबद्ध आहे, पण तुमची शरीरयष्टी किंचित स्थूलतेकडे झुकणारी वाटते. तुमच्या व्यवसायाच्या निमित्ताने अनेक लोकांशी तुमचा संपर्क दररोजच्या कामात येत असणार. रुग्णांकडे लक्ष द्यावं लागत असणार. आजच्या जगात काम तर उत्तम लागतंच त्याबरोबर तुमचं व्यक्तिमत्त्वही प्रेझेंटेबल असणं महत्त्वाचं असतं. तुम्ही कुठलाही व्यवसाय करणाऱ्या असलात तरी व्यवस्थित, टापटीप राहणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा नाही की वेस्टर्न वेअर किंवा ग्लॅमरस कपडे वगैरे घालायला पाहिजेत. तुम्हाला योग्य वाटतील ते कपडे, पेहराव तुम्ही वापरा, पण तो टापटीप असला पाहिजे.
तुमच्या व्यवसायात तुम्हाला रुग्णांबरोबर स्टाफलाही सांभाळावं लागतं. त्या सगळ्यांच्या लेखी तुमचं व्यक्तिमत्त्व आदरस्थानी असतं. त्यामुळे त्याला अनुसरून ड्रेसिंग असलं पाहिजे. कापड आणि ड्रेसचे कट कंफर्टेबल असले पाहिजेत. या सीझनमध्ये कॉटनचं कापड त्यासाठी उत्तम पर्याय आहे. त्यातून तुम्ही पूर्णवेळ काम करणाऱ्या व्यवसायात असल्यानं सुती कापडासारखा पर्याय योग्य ठरेल. तुमच्या प्रोफेशनमध्ये तुम्ही टिपिकल फॉर्मल ड्रेसिंग केलं नाहीत तरी चालेल, असं वाटतं, पण ग्लॅमरस किंवा भडक कपडेही नकोत. तुमच्या वयाचा, वर्णाचा आणि प्रोफेशनचा विचार करता तुमच्याकरिता काळा, पांढरा, क्रीम, बेज, निळ्याच्या सगळ्या छटा, लेमन यलो, रोझ पिंक, मरून, ब्राऊन आणि ग्रे रंग शोभून दिसतील.
ड्रेसिंगचा प्रकार विचारात घेता, तुम्ही सलवार कमीझ, चुणीदार किंवा लेगिंग्ज, कुर्ता आणि साडी यातलं काहीही निवडू शकता. त्याबरोबर सुंदर स्कार्फ आणि स्टोल वापरू शकता. त्याचबरोबर तुम्हाला कंफर्टेबल आणि सहज वावरता येईल असे कपडे कोणते ते ठरवावं लागेल. तुम्हाला साडीची सवय नसेल तर कामाच्या ठिकाणी मुद्दाम साडी नेसून जाणं मी सुचवणार नाही. तुम्ही कंफर्टेबल नसाल तर कपडे व्यवस्थित कॅरी करता येणार नाहीत. संपूर्ण पंजाबी सूट म्हणजे सलवार- कमीज – दुपट्टा असा आग्रह धरण्यात अर्थ नाही. दुपट्टा किंवा ओढणी तिच्या जागेवर व्यवस्थित असेल तरच चांगली दिसते. म्हणजे ती पिन लावलेली असावी किंवा सतत सांभाळत काम करायला हवं. ते प्रत्येक वेळी शक्य होईल असं नाही. त्यामुळे ड्रेसऐवजी ओढणीशिवाय चांगली दिसेल अशा कुर्ताचा पर्याय ट्राय करायला हरकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चालू स्टाइल कुठल्या कपडय़ांची आहे त्यावर लक्ष ठेवून त्याप्रमाणे ड्रेसिंग करायला हवं. लेटेस्ट ट्रेंड कसला आहे, ते पाहणं यासाठी आवश्यक आहे.
अॅक्सेसरीजचा विचार करता व्यावसायिक स्त्रियांनी सांभाळायला सोप्या अॅक्सेसरीज वापरणं योग्य ठरेल. त्यामुळे सुयोग्य आकाराची आणि वेगवेगळे कप्पे असलेली पर्स वापरली पाहिजे. झोळी किंवा त्या प्रकारच्या बॅगा वापरू नका. त्यात वस्तू पटकन हाताला लागणं कठीण असतं. कंफर्टेबल फूटवेअर वापरायला हवं. शक्यतो हिल्स नकोत. खूप जास्त दागिने आवश्यक नाहीत. खरं तर टाळायलाच हवेत. फार नटूनथटून गेल्यासारखं वाटेल. साधे पण नेमके दागिने वापरा.
सर्वात शेवटी महत्त्वाचे – नेहमी व्यवस्थित तयार होऊन कामाच्या ठिकाणी जा. म्हणजे तुमचे केस व्यवस्थित हवेत, विस्कटलेले नकोत, वास यायला नको. चेहरा फ्रेश असणं आवश्यक. एखादा हलक्या सुगंधाचा परफ्यूम वापरायला हरकत नाही. मेकअपची गरज आहे, असं मला वाटत नाही. फेशिअल टिश्यू, कॉम्पॅक्ट पावडर, लिप बाम आणि डिओड्रंट किंवा परफ्यूम नेहमी कॅरी करा.
असं राहणं असेल तर या टापटिपीची आणि व्यवस्थितपणाची चांगल्या प्रकारे दखल निश्चितच घेतली जाईल आणि तुमचा प्रभाव पडेल.
फॅशन पॅशन : सुयोग्य कपडे – टापटीप राहणी
मी पन्नास वर्षांची आहे. उंची पाच फूट दोन इंच आहे. वजन ६८ किलो आहे. वैद्यकीय व्यवसाय करते. रंग निमगोरा आहे. मला कोणत्या रंगाचे आणि प्रकारचे कपडे चांगले दिसतील?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-06-2014 at 01:15 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fashion passion appropriate clothing living method