मुलांनी कॉलेजला जाताना छान दिसतील असे कुठले कपडे वापरावेत. मी वेलबिल्ट आहे आणि उंची ५. ९ फूट आहे. मुली झटकन इम्प्रेस होतील यासाठी कसा पेहराव असावा?
– उमेश, अहमदनगर
प्रिय उमेश,
तू वेलबिल्ट आहेस, तुझी पर्सनॅलिटी छान आहे असं लिहिलं आहेस तर तुला मुलींना इम्प्रेस करायला वेगळे प्रयत्न कशाला करायला हवेत?
मुळात स्वत:बद्दल कॉन्फिडन्स असायला हवा. तो तुझ्यात आहे. राहिला राहिला प्रश्न ड्रेसिंगचा.
स्वत:ला छान कॅरी करणं हेच सगळ्यात महत्त्वाचं असतं. तू कॉलेजला जातोस म्हणजे तुला कपडय़ांचा फार चॉईस कॉलेजसाठी तरी असणार नाही. डेनिम्स म्हणजेच जीन्स आणि चांगला टी-शर्ट किंवा शर्ट हेच परफेक्ट असू शकतं. या सीझनमध्ये डेनिम्सपेक्षा कलर जीन्सची फॅशन रुळली आहे. पण कलर जीन्स वापरताना मुलांचे नेहमीचे रंगच निवड. मुलांनी लाल किंवा हिरव्या रंगाची जीन्स वापरणं माझ्यामते तरी फॅशन स्टँडर्डमध्ये बसत नाही. त्याऐवजी काळा, ब्राऊन, बेज, ब्लू हेच रंग मुलांना चांगले दिसतात. टी-शर्ट नेहमीसारखे राउंड नेक किंवा व्ही नेक असतील तरी चालतील. कधी कधी प्रिंटेड टीशर्ट घालायलाही हरकत नाही. कॅज्युअल शर्ट हादेखील एक डिसेंट पर्याय असू शकेल. पण शर्ट आणि जीन्स यांचं कॉम्बिनेशन योग्य असायला हवं. शर्ट आणि पँटच्या रंगात अगदी विरुद्ध रंग टाळलेलेच बरे. उदाहरणार्थ लाल-हिरवा, पिवळा-जांभळा किंवा नारिंगी-निळा ही कॉम्बिनेशन टाळायला हवीत. खूप गडद किंवा भडक रंगसुद्धा टाळायला हवेत. ते वाईट दिसतं.
कपडय़ांप्रमाणेच डिसेंट फूटवेअरवरही लक्ष दिलं पाहिजे. फ्लोटर्स किंवा स्निकर्स घातले तरी ते डिसेंट असले पाहिजेत. मुलांना नेहमी शूजवरून पारखलं जातं, हे लक्षात ठेव. आणि एक महत्त्वाचं.. त्या मोठय़ा, लांबलचक चेन किंवा ब्रेसलेट अजिबात वापरू नकोस. सगळ्या गेटअपला शोभून दिसतील अशा रंगाचे गॉगल्स असतील तर आणखी छान. पण ते नसतील तरीही एक डिसेंट, इम्प्रेसीव्ह लुक आणणं सहज शक्य आहे. ऑल द बेस्ट !
फॅशन पॅशन : मुलांना डिसेंट लुक हवा!
मुलांनी कॉलेजला जाताना छान दिसतील असे कुठले कपडे वापरावेत. मी वेलबिल्ट आहे आणि उंची ५. ९ फूट आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-03-2014 at 01:06 IST
मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fashion passion children want dissent look