आपल्याकडच्या बॉलिवूडची फॅशन मार्केटमध्ये कशी लोकप्रिय होते, याबद्दल आपण मागच्या लेखात पाहिलं. बॉलिवूडच्या तारका आपल्यासाठी फॅशन आयकॉन्स असतात. आपण सिनेमातली फॅशन अगदी डोळे झाकून स्वीकारतो. फॅशन लोकप्रिय होण्याची एक प्रोसेस आहे. साधारणपणे बडय़ा डिझायनर्सने डिझाईन केलेले कपडे आपल्या बॉलिवूडच्या तारकांच्या अंगावर पहिल्यांदा आपण पाहतो आणि तिथून त्याच्या लोकप्रियतेचा प्रवास सुरू होतो. सुरुवातीला मात्र काही ठराविक क्लासपुरतीच ही फॅशन मर्यादित असायची. कारण फॅशनसाठी खूप मोठी किंमत मोजायली लागायची. फॅशन सर्वमान्य नसायची. त्याचा एक प्रकारचा टॅबूही असायचा. ८० अणि ९० च्या दशकात शॉर्ट स्कर्ट आणि स्ट्रेच्ड जीन्सची फॅशन आली होती, आठवतंय का? त्या वेळी माधुरी दीक्षित, श्रीदेवी आणि दिव्या भारती अशा शॉर्ट स्कर्टमध्ये दिसायच्या. या फॅशन लगेच मार्केटमध्येही आल्या. पण त्या केवळ ठराविक दुकानांमध्येच आणि खूपच चढय़ा किमतीत उपलब्ध होत्या. यातून उघड होतं की, या फॅशन सामान्य लोकांसाठी नव्हत्या. या स्टाईलचे कपडे शाळा- कॉलेजमधल्या मुलींनी वापरायला परवानगीच नव्हती. कमी कपडे, रिव्हीिलग ड्रेस असंच याचं वर्णन होई आणि त्यामुळे मध्यमवर्गीयांपासून ही फॅशन दूर राहिली. कॉस्पोपॉम्लिटन लोकांपुरती राहिलेली फॅशन बाकीच्यांसाठी टॅबू म्हणूनच राहिली.
त्यानंतरच्या दशकात उच्च मध्यमवर्गीयांमध्ये हळूहळू फॅशन यायला लागली. क्सासपासून मासपर्यंत फॅशनचा प्रवास खऱ्या अर्थाने तेव्हा सुरू झाला. पण ही प्रक्रिया एका रात्रीत झालेली नाही. त्यासाठी बराच काळ मध्ये जावा लागला. समाजाच्या वरच्या स्तरापासून हळूहळू फॅशन सगळीकडे पसरत गेली.
जवळपास दीड दशकापूर्वीपासून नवी फॅशन सर्वसामान्यांच्या अंगाखांद्यावर खेळत असलेली तुम्हाला दिसेल. नवीन चित्रपट प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातली फॅशन मार्केटमध्ये यायला आणि मार्केटमधून घराघरात पोचायला आता अजिबात वेळ लागत नाही. करीष्मा, उर्मिला किंवा सोनाली बेंद्रे यांनी गेल्या दशकात पडद्यावरची फॅशन लोकांपर्यंत पोचवली. त्या काळापासून फॅशनचा प्रसार झपाटय़ाने व्हायला लागला. काही वर्षांपूर्वी आलेल्या बंटी बबली चित्रपटातली फॅशन बघा. राणी मुखर्जीनं घातलेल्या बोल्ड प्रिंटचे, कॉलरवाले कुडते किती झटक्यात प्रसिद्ध झाले. चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आतच ही फॅशन बाजारात आलेली होती. चित्रपटानंतर तर या पॅटर्नला ऊत आला होता. या फॅशनच्या झटक्यात प्रसाराला आजचा मीडियासुद्धा जबाबदार आहेच. आज लोकांमध्ये फॅशनबाबतची जागरुकता आहे, जिव्हाळा आहे आणि नवीन फॅशन आत्मसात करण्याची जी ओढ आहे, त्याचं श्रेयही माध्यमांना निश्चितपणानं जातं. आणि आता पूर्वीचा तो फॅशनभोवतीचा ‘टॅबू’ अजिबात राहिलेला नाही. सगळ्यांपेक्षा वेगळं आणि हटके घालण्याच्या हौसेपोटी नवनवीन फॅशन आवर्जून केली जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा