फॅशन करणं, अप टू डेट राहणं हे आता नवीन राहिलं नाही. पूर्वी सर्वसामान्य लोकं फॅशनपासून तशी अलिप्त असायची. रँपवर दिसते तीच किंवा सिनेमांमधून करतात तीच फॅशन असं काहीसं वातावरण होतं. त्यातूनही जरा मॉडर्न स्टाईलचे कपडे वापरणारी, किंवा वेस्टर्न आऊटफिट्स वापरणारी मुलगी असेल तर ती फॅशनेबल समजली जायची. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता फॅशनची आपल्या आयुष्याशी घट्ट सांगड घातली गेलीयं. आता फक्त कपडय़ांमधून किंवा दागिन्यांवरून आपली फॅशन बघितली जात नाही. तर रोजच्या व्यवहारातून – आपण काय खातो, कसं खातो, काय करतो, कुठे फिरायला जातो आणि आपले छंद काय आहेत याचीही फॅशन होऊ शकते. ज्या डिशची चलती आहे, फॅशन आहे तेच पदार्थ आपण खातो. म्हणजे अगदी कट्टर नॉनव्हेजिटेरियन मुलगी फक्त ‘गोइंग व्हेगन’ ही स्टाईल आहे, म्हणून शाकाहारी होईल. आपण कुठल्या प्रकारचे व्यायाम करतो, हेसुद्धा त्या क्षेत्रातल्या फॅशनवर अवलंबून असतं. म्हणजे योगाला जायचं की एरोबिक्सला हे सध्या ट्रेंड कुठला आहे, त्यावरून ठरवलं जातं.
तर सध्या कशाचा ट्रेंड आहे, कुठली फॅशन आहे, हे सर्वसामान्य लोकांनाही माहिती असतं. भारतीय फॅशन नेहमीच बॉलिवूडच्या तारे- तारकांच्या प्रभावाखाली राहिली आहे. सिनेमातूनच फॅशन ट्रेंड रुळले जातात. मधुबाला ते माधुरी, ऋषी ते रणबीर आणि हेलन ते मलाईका प्रत्येकानं कोणती ना कोणती फॅशन रुढ केलेली आहे. त्यांनी घातलेले कपडे, त्यांच्या हेअर स्टाईल सगळीच फॅशन होते. जुन्या काळातल्या फॅशन पुन्हा
तुम्हाला तो साधना कट आठवतोय का? आई किंवा मावशीच्या जुन्या अल्बममधले फोटो बघा. तेव्हाची तरुणाई तो हेअर कट मिरवताना नक्की दिसेल. आतासुद्धा तशा फ्लिक्स किंवा लेअर चेहऱ्यावर हव्या, असं म्हणणाऱ्या मुलींची संख्या वाढतेय. एखादी फॅशन चलतीत आली की, सगळे त्याच स्टाईलचे कपडे घेण्याच्या मागे लागतात किंवा तशीच स्टाईल करतात. मग त्याचं सॅच्युरेशन होतं आणि हळूहळू ती फॅशन लयाला जाते. सध्या दिसणाऱ्या ‘लेग ओ मटन स्लीव्हज’ ही जुन्या जमान्यातलीच फॅशन होती. आता पुन्हा एकदा मुलींना असे ड्रेस हवेहवेसे वाटताहेत. तशीच गोष्ट ‘पफ स्लीव्हज’ची.
आज ३० वर्षांपूर्वीच्या त्या रेट्रो स्टाईलची पुन्हा चलती आहे. कपडय़ांमध्ये बोलायचं तर तसेच बोल्ड, डिजीटल प्रिंट, पोल्का डॉट्स हे आज चलतीत आहेत. अनार्कली पॅटर्नमुळे पुन्हा अगदी ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातला काळ अवतरल्यासारखं वाटतंय. पण इंडो- वेस्टर्न आउटफिट्समध्येही ती जुन्या जमान्यातली फॅशन डोकावतेय.
फॅशन पॅशन : फॅशन गोइंग रेट्रो
फॅशन म्हणजे नक्की काय? लेटेस्ट फॅशन कशी ओळखायची? आपल्याला कुठली फॅशन सूट होईल, या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हे नवं सदर फॅशन- टेक्सटाईल एक्सपर्ट यातून संवाद साधतील.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-07-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fashion passion retro fashion