मी २४ वर्षांची असून उंची ४ फूट ९ इंच आणि वजन ४३ किलो आहे. मार्चमध्ये माझ्या भावाचं लग्न आहे. माझ्या कमी उंचीमुळे मी या लग्नासाठी काय घालावं याबाबत कनफ्यूज्ड आहे. मला असं वाटतं की, अनारकली काही मला सूट होत नाही. संध्याकाळसाठी जरीची पैठणी आणि सकाळच्या समारंभासाठी नियॉन सिक्विन लेहंगा घालण्याचा मी विचार करतेय. ते मला बरं दिसेल का?
– मेघा, चेंबूर, मुंबई.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

 प्रिय मेघा,
तुझ्या वर्णनावरून तू तशी खूप बारीक आहेस, असं वाटतंय. पण नेहमी मी सांगते त्याप्रमाणे जाड, बल्की मटिरिअलचा वापर करून शिवलेले ड्रेस तू घालू नकोस. या ड्रेसमध्ये बारीक मुली चांगल्या दिसतात. पण तुझी उंची कमी असल्याने तू त्यामध्ये आणखी बुटकी दिसण्याचा संभव आहे. अनारकलीबाबतचा तुझा विचार योग्य आहे. फूल लेंथ अनारकली तुला सूट होणार नाही. पण पोटऱ्यांपर्यंत येणाऱ्या अनारकलीचा तू विचार करू शकतेस. तसा अनारकली पॅटर्न तुला चांगला दिसेल. याशिवाय पतियाला आणि त्यावर शॉर्ट कुर्ती असंही तू ट्राय करू शकतेस. त्यात तू उंच दिसशील. सॉफ्ट एम्ब्रॉयडरी कॉटन किंवा सिल्कचा त्यासाठी वापर कर. जॉर्जेट, शिफॉन, नेट या कापडांमध्ये तू आणखी बारीक दिसशील. सुंदर भरतकाम केलेला फुलकारी दुपट्टा आणि पतियाला सेट हे कुठल्याही समारंभाला छान दिसेल.
तू संध्याकाळी पैठणी नेसण्याचा विचार करत असशील आणि नियॉन कलरचा घागरा सकाळी घालण्याचं ठरवत असशील, तर जरा उलट विचार करून बघ. पैठणीसारखी भरजरी साडी दिवसा छान दिसते. नियॉन कलर रात्रीच्या दिव्यांमध्ये आणखी चार्मिग वाटतात. नियॉन सीक्विन किंवा टिकल्यांचा ड्रेस बेज किंवा गोल्डन बॅकग्राउंडला असेल तर छान दिसेल.
एक्सपर्ट अ‍ॅडव्हाइस : या फंक्शनला कुठला ड्रेस घालावा, कुठला रंग उठून दिसेल, या ड्रेसमध्ये जाड तर दिसणार नाही ना.. असे नाना प्रश्न आपल्याला पडत असतात. प्रत्येक वेळी खास ड्रेस डिझायनर गाठणं काही जमत नाही आणि परवडत नाही. तुमच्या फॅशनविषयीच्या शंकांना या कॉलममधून डिझायनर मृण्मयी मंगेशकर उत्तरं देतील. आपला प्रश्न व्यवस्थित वर्णनासह आमच्याकडे viva.loksatta@gmail.com  या आयडीवर पाठवा. सोबत तुमचं नाव, वय आणि आपले राहण्याचे ठिकाणही आम्हाला सांगा. सब्जेक्ट लाइनमध्ये फॅशन पॅशन असा उल्लेख करायला विसरू नका.