रसिका शिंदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
करोनाच्या संकटामुळे प्रत्येकाच्या जीवनातील दोन वर्षे कुठे तरी हरवून गेल्यासारखी झाली होती. मात्र, २०२२ हे वर्ष उजाडलं आणि सगळय़ाच गोष्टींचा कायापालट झाला. सरत्या वर्षांत अनेक नवनवीन उलाढाली झाल्या. सण, उत्सव आणि समारंभ धूमधडाक्यात सगळय़ांनीच साजरे केले. इतकेच काय, अनेक नवनवे ट्रेण्डसदेखील आपण अनुभवले. आता ट्रेण्ड म्हटलं की फॅशन आलीच आणि फॅशन म्हटलं की फॅशन शो आणि कपडय़ांचे नवे ट्रेण्ड्सही..
‘फॅशन शो’ला मिळाली भरारी
न्यूयॉर्क, मिलान, पॅरिस, लंडन आणि अरब फॅशन वीक हे सगळे शोज म्हणजे फॅशनप्रेमींची पंढरीच म्हणावी लागेल. करोनामुळे दोन वर्षे फॅशन शोजना डिजिटल स्वरूप मिळाले होते. मात्र, या वर्षी पुन्हा एकदा मॉडेल्स रॅम्पवर दिसल्या आणि फॅशन जगतात आनंदाची लाट पसरली. न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये या वर्षी विटेंज कपडे वेगवेगळय़ा स्टाइलने सादर केले गेले. करोनामुळे फिजिटल फॅशन शोज हा ना धड फिजिकल ना धड डिजिटल प्रकारही जगभरातील फॅशनप्रेमींनी अनुभवला. फॅशन शो हे केवळ मोठय़ा लोकांपुरतेच मर्यादित राहिले नाहीत. अगदी दोन वर्षांचे चिमुकलेही रॅम्प वॉक करताना पाहायला मिळाले. अलीकडे किड्स फॅशन शो वाढत चालले आहेत आणि या वर्षीही अशा किड्स फॅशन शोजचे आयोजन करण्यात आले होते. ‘इंडिया किड्स फॅशन वीक’चे यंदाचे ९ वे वर्ष होते. नऊ शहरांमधून पार पडलेल्या या फॅशन शोच्या माध्यमातून जवळपास तीन हजारांहून अधिक लहान मुलांनी आपल्या चिमुकल्या पावलांनी रॅम्प वॉक करत फॅशन जगतात पाऊल ठेवले आहे. लहान मुलांना प्रशिक्षण देणे फार कठीण असते, मात्र त्यांच्यात समजूतदारपणाही अधिक असतो, असं फॅशन रनवे दिग्दर्शक अभिषेक जैसवाल म्हणतात. या किड्स फॅशन वीकमध्ये लहान मुलांचे कपडे डिझाईन करणाऱ्या फॅशन डिझायनर नेहा खुशलानी म्हणतात, ‘‘लहान मुलांचे कपडे डिझाईन करताना त्यांना कपडे कुठेही टोचणार नाहीत आणि त्या कपडय़ांमध्ये ते छान दिसतील, याचा एकत्रित विचार करावा लागतो. त्यामुळे लहान मुलांचे कपडे हे बव्हंशी सॉफ्ट कापड, सॅटिनचे काप वापरून तयार केले जातात.’’
भारतीय वस्त्रांची जागतिक भरारी
प्रत्येक क्षेत्रात ठरावीक भाषिकांचा चमू काम करताना दिसतो. त्यातही फॅशन उद्योगात मराठी माणूस दिसणं काहीसं दुर्मीळच, मात्र याला अपवाद ठरली ती म्हणजे मराठमोळी फॅशन डिझायनर वैशाली शदांगुळे. गेली अनेक वर्षे भारतीय वस्त्रांचा प्रसार जागतिक स्तरावरील फॅशन शोजमध्ये वैशाली करते आहे. या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या मिलान फॅशन वीकमध्ये बंगाली सिल्क, लॅविश सिल्क तसेच महाबळेश्वर, कर्नाटकात मिळणाऱ्या कॉटनच्या वस्त्रांचा कलाकुसरी पद्धतीने वापर करत ‘अॅनसेस्ट्रल थ्रेड्स’ या संकल्पनेवर आधारित नव्या कपडय़ांच्या डिझाईन्स तिने सादर केल्या. भारतातील हातमागाला जागतिक दर्जा देण्याचा निर्धार केलेल्या वैशालीने गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षांतही प्रत्येक फॅशन शोजमध्ये हातमागावरील आणि भारतीय बनावटीच्या धाग्यांपासून तयार केलेल्या कपडय़ांवर भर दिलेला पाहायला मिळाला. वैशाली ही भारतातील पहिली मराठी फॅशन डिझायनर आहे जिने मिलान फॅशन वीकमध्ये पैठणी, खणाचे कापड रॅम्पवर आणले. पैठणी, खण, चंदेरी, ज्यूट, खादी, महेश्वरी अशा अस्सल भारतीय धाग्यांवर काम करत अनोखे कलेक्शन सादर केले.
खणाच्या साडीला फॅशनेबल ब्लाऊजची साथ
जसा काळ बदलत जातो तशी कपडय़ांची फॅशन बदलत जाते आणि बदलत्या काळानुरूप स्वत:ला अपडेट ठेवणे गरजेचे होऊन जाते. करोनामुळे या वर्षीही सुरुवातीला वर्क फ्रॉम होम असल्यामुळे लोकांची फॅशनबद्दलची मानसिकता काहीशी बदलली होती आणि याच बदललेल्या मानसिकतेचा सदुपयोग या वर्षांत फॅशन डिझायनर्सनी केला. सण, उत्सव, लग्न समारंभ जोरदार साजरे झाल्यामुळे समारंभात परिधान करण्यात येणाऱ्या पारंपरिक कपडय़ांना वेस्टर्न टच दिला गेला. आजही अनेक ठिकाणी महिला खणाची चोळी म्हणजे ब्लाऊज वापरतात. खणाचे वैशिष्टय़ म्हणजे कोणत्याही ब्लाऊजवर कोणत्याही रंगाची साडी उठून दिसते. या वर्षी खणाची साडी एका नव्या ढंगात महिलांच्या अंगावर खुलून दिसली. प्लेन खणाच्या साडीवर वेगवेगळय़ा पद्धतीच्या डिझाइन्स आल्या, यात नथीचा आकडा, चंद्रकोर, सरस्वती, स्क्वेअर, पोपट, कलमकारी अशा डिझाइन्सनी खणाच्या साडीवर हजेरी लावली. साडीबरोबरच खणाचे कुर्ते, वनपीस घेण्याकडेही मुलींचा कल वाढलेला पाहायला मिळाला. अस्सल मराठमोळा पोशाख असणाऱ्या खणाने पुन्हा एकदा नव्या ढंगात फॅशन जगतात प्रवेश केला. पारंपरिक साडीला वेस्टर्न लुक कसा देता येईल याचा विचार हल्ली केला जातो. खणाच्या साडीप्रमाणे ब्लाऊजवरही नथ, पोपट, कलमकारी अशी डिझाइन्स बघायला मिळत आहेत. ब्लाऊजसाठी खास या डिझाइनचे पॅचेस बाजारात उपलब्ध आहेत. पारंपरिक लुकला थोडा वेस्टर्न टच देण्यासाठी ब्लाऊजच्या डिझाइनमध्ये ऑफ शोल्डर, हायनेक, कोल्ड शोल्डर, बॅकलेस, स्लीवलेस असे नानाविध प्रकार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे पारंपरिक साडीला वेस्टर्न ब्लाऊजच्या डिझाइनमुळे या वर्षी वेगळा लुक मिळाला.
फॅशनपेक्षा स्टाइल-कम्फर्ट जास्त महत्त्वाचे
लग्नकार्य असो किंवा कोणताही मोठा समारंभ असो, खिसा जड असणाऱ्या लोकांसाठी वेिडग प्लॅनर्सना बोलावणं किंवा फॅशन डिझायनर्सकडून कपडे छान डिझाइन करून घेणं फार सोप्पं असतं. मात्र, करोनाकाळानंतर सर्वसामान्य लोकांची ही मानसिकता बदलली आणि आपणही फॅशन डिझायनर्सकडून कपडे डिझाइन करून घेऊ शकतो यावर त्यांचा विश्वास बसू लागला. याबद्दल अधिक माहिती देताना फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट नचिकेत बर्वे म्हणतात, ‘‘करोनानंतर सर्वसामान्य लोक बजेट-फ्रेंडली कपडय़ांना पसंती देत आहेत. बऱ्याचशा लोकांना अद्यापही वर्क फ्रॉम होम असल्यामुळे त्या वयोगटातील अनेक जण बजेट-फ्रेंडली किंवा रेंटेंड कपडे घेताना दिसतात. तर दुसरीकडे तरुण मुला- मुलींसाठी फॅशनची परिभाषा ही समाजमाध्यमांवर प्रभावकर्ते ज्या स्टाइलचे कपडे परिधान करतात तीच ट्रेण्डिंग फॅशन आहे अशी झाली आहे.’’ हुमा कुरेशी, समंथा प्रभु आदी हिंदी-दाक्षिणात्य अभिनेत्रींचे कपडे डिझाइन करणाऱ्या नचिकेत बर्वे यांनी या वर्षी लॅक्मे फॅशन वीकमध्ये कॉकटेल पार्टी लुक, संगीत लुक अशा फेस्टिव्ह लुकच्या कपडय़ांचे सादरीकरण केले. काळानुसार फॅशन अपडेट करावी लागते या विचारांना तडा देत आपण कोणत्या स्टाइलमध्ये सुंदर दिसतो हे ट्रेण्डिंग फॅशनपेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे, असं बर्वे सांगतात. फॅशन येते आणि जाते; पण आपल्या स्वत:ची अशी एक ठरावीक स्टाइल असेल आणि त्यात आपण सुंदर दिसत असू तर तीच आपली फॅशन असायला हवी, असा मोलाचा सल्लाही नचिकेत यांनी दिला. तर करोनानंतर सगळय़ांना घराबाहेर पडायचे होते, छान कपडे घालून तयार व्हायचे होते. मात्र, लॉकडाऊननंतरही वर्क फ्रॅाम होम असल्यामुळे लोकांना फॅशनेबल कपडय़ांपेक्षा कम्फर्टेबल कपडे घालायचे होते. त्यासाठी जम्पसूटना जास्तीत जास्त पसंती मिळाली. जम्पसूटच्या नानाविध डिझाइन्स बाजारात उपलब्ध झाल्या आणि या वर्षांत जम्पसूटची फॅशन जास्त ट्रेण्ड झाली, अशी माहिती फॅशन डिझायनर वैशाली शदांगुळे यांनी दिली.
कॉटनचे कपडे अधिक सोयीस्कर
कपडय़ांची फॅशन करताना आपण त्या कपडय़ांमध्ये किती कम्फर्टेबल आहोत हे पाहणंही तितकंच गरजेचं असतं. आपण परिधान केलेले कपडे विविध धाग्यांपासून तयार केलेले असतात. या वर्षी सर्वाधिक पसंती ही कॉटनच्या कपडय़ांना मिळाली आहे. यातही ‘को-ऑर्ड’ या फॅशन प्रकाराला महिलांची मागणी जास्त असल्याचे ‘लेबल पोशाख’ या ब्रॅण्डची मालक आणि फॅशन स्टायलिस्ट श्वेता शिंदे सांगते.
को-ऑर्ड म्हणजे टॉप आणि पॅन्ट हे एकाच रंगाचे असतात आणि एकाच धाग्यापासून तयार केलेले असतात. समरंगांच्या ‘को-ऑर्ड’च्या कॉटनच्या नव्या पोशाखाला चांगलीच मागणी आहे. करोनाकाळानंतर लोकांनी फॅशनेबल राहण्यापेक्षा आपल्या कम्फर्टला जास्त प्राधान्य दिल्याचं निदर्शनास येतं, असंही श्वेता सांगते. सरत्या वर्षांत पारंपरिक लुकला आधुनिक टच देणारे, भारतीय धाग्यांपासून तयार केलेल्या विविध वस्त्रांचे कपडे आणि पार्टीवेअर कपडय़ांची फॅशन जास्त गाजली आणि पसंतीस पडली असं दिसून येतं.
इतिहासाची पुनरावृत्ती
‘इतिहासाची पुनरावृत्ती होते’ या प्रसिद्ध उक्तीची प्रचीती फॅशनच्या बाबतीत वारंवार येत असते, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. १९९० आणि २००० च्या दशकाच्या सुरुवातीला फॅशनप्रेमींच्या मनात राज्य करणारे काही फॅशन ट्रेण्ड्स परतले आहेत. यामध्ये पॅराशूट पॅन्ट, कार्गो पॅन्ट, बटरफ्लाय पॅटर्न, बेल बॉटम आदींचा समावेश आहे. या विविध पॅन्टवरती क्रॉप टॉप्स किंवा ढगळे टॉप घालून पायात स्निकर्स किंवा मिस मॅच रंगाचे शूज घालण्याचा ट्रेण्डही चांगलाच गाजला. याव्यतिरिक्त साडय़ांचे रूपांतर लेहेंग्यात करून त्यावर क्रॉप टॉप आणि कानात झुमके, हातांत बांगडय़ा असा इंडोवेस्टर्न लुक करत जुन्या साडय़ांना नव्या क्रॉप टॉपची जोड देत नवी फॅशनदेखील उदयास आली.
viva@expressindia.com