तेजश्री गायकवाड
ऋतू बदलतो तशी आपल्याकडे फॅशन बदलते. बाजारात दुकानांबाहेर लटकणाऱ्या वस्तू बदलल्या की आपल्याला त्या मोसमातील फॅशनची जाणीव होते. या पावसाच्या सरीतली आपली फॅशन कशी ट्रेण्डी करता येईल यासाठी सध्या मार्केटमध्ये नवीन काय आहे? आणि त्यातील नेमक्या कोणत्या वस्तू किती ट्रेण्ड होत आहेत, हे समजून घ्यायला हवं.

पाऊस आणि फॅशन हे समीकरण जुळवून आणणं फार महत्त्वाचं असतं. कारण पावसाळय़ात घराबाहेर पडताना कपडय़ांपासून बुटांपर्यंत कुठल्याही बाबतीत आपण चुकीची निवड केली तर सगळीच तयारी पाण्यात गेली, असं म्हणायला हवं. ऐन पावसात आपल्या फॅशनचे तीनतेरा वाजतात आणि मग एरवी मनभावन वाटणारा पाऊस तेव्हा मात्र कवी सौमित्र यांनी वर्णन केल्याप्रमाणे पाऊस म्हणजे चिखल सारा.. पाऊस कपडे खराब करतो..पाऊस वैतागवाडी.. असं सगळं आठवत राहतं. पावसातला गारवा तेवढा मनातल्या मनातच राहतो. पावसाच्या धारांचा आनंद घ्यायचा आणि आपली फॅशनही जपायची असेल तर आपली पावसाची खरेदीही विचारपूर्वक करायला हवी.

Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Annual flower exhibition detail update
निसर्गलिपी : फुलांच्या वार्षिक प्रदर्शनांना जाच!
fake Goods Market Pune, fake Goods, Market Pune,
शहरबात… बनावट मालाच्या बाजारपेठांना रोखणार कोण?
MG Select shares first look of mg cyberster with electric cissor doors
महागड्या स्पोर्ट्स कारला देणार टक्कर! ‘या’ कंपनीने नव्याकोऱ्या कारचा पहिला लूक केला शेअर, इलेक्ट्रिक डोअर्ससह मिळतील खास फिचर्स
Shabana Azmi Javed Akhtar
शबाना आझमींना चेटकिणीच्या रुपात पाहून जावेद अख्तर यांनी दिलेली ‘अशी’ प्रतिक्रिया, म्हणालेले, “सगळा मेकअप…”

आधी उल्लेख केल्याप्रमाणे ऋतू बदलतात तशी फॅशन बदलते. साहजिकच हा बदल बाजारातही दिसून येतो. पाऊस म्हटला की छत्री आणि रेनकोट या दोन गोष्टी प्रामुख्याने येतात. याचे ट्रेण्ड्स दर वर्षी फार बदलतात असं नसलं तरी छत्र्यांच्या बाबतीत लहानांपासून मोठय़ांपर्यंत त्यांच्या आवडीप्रमाणे आणि गरजेप्रमाणे विविध पिंट्र्स, आकार आणि रंग उपलब्ध आहेत. बरं छत्री खरेदीही अगदी दुकानातच जाऊन करायला हवी, हेही गरजेचं उरलेलं नाही. ऑनलाइनम् काही हटके ब्रॅण्ड्सही उपलब्ध आहेत. टिकाऊपणा हवा असेल तर ‘सन’सारख्या काही ब्रॅण्ड्सच्या छत्र्या प्लेन रंगांमध्ये, पोलका िपट्र अशा ठरावीक पिंट्र आणि रंगांमध्ये वर्षांनुवर्ष उपलब्ध आहेत. गेली काही वर्षे उंचीला मोठय़ा असणाऱ्या, रंगीबेरंगी, सुंदर पिंट्र असणाऱ्या छत्र्या सर्रास वापरल्या जातात. यात बदल म्हणून ‘नाप्पा दोरी’सारख्या ब्रॅण्ड्सने ही छत्री ठेवण्यासाठी खांद्यावर अडकवता येईल अशी केसही डिझाईन करून दिली आहे. अर्थात या छत्र्यांची किंमत तीन-साडेतीन हजारांच्या पुढे आहे.

फ्रिल असलेल्या छत्र्यांनाही सातत्याने मागणी असते. त्यातही वेगवेगळय़ा रंगांचे आकर्षक कॉम्बिनेशन्स पाहायला मिळतात. सामान्यपणे मोठय़ा, उंच छत्र्या खरेदी करताना त्या उंच दिसत असल्या तरी त्या उघडल्यावर मोठयम असतीलच हे गरजेचे नाही. त्यामुळे त्या खरोखरच मोठय़ा आहेत की नाहीत हे तपासून घेणं गरजेचं आहे. एरव्ही पर्स किंवा बॅगेत सहजपणे मावतील अशा थ्री फोल्ड छत्र्याही उघडल्यावर मोठय़ा असतात. त्यामुळे त्यांना ऑफिसला जाणाऱ्यांकडून जास्त पसंती मिळते. ऑफिसच्या फॉर्मलवर शोभून दिसतील अशा प्लेन पण अतिशय ट्रेण्डी रंगाच्या छत्र्या बाजारात उपलब्ध आहेत. प्लेन नको असल्यास पोलका डॉटस किंवा बारीक पिंट्र्स असलेल्या छत्र्यांबरोबरच विद्यार्थ्यांसाठी- लहान मुलांसाठी मिकी माऊसपासून ते सुपरहिरोजपर्यंत हव्या त्या पिंट्रमध्ये छत्र्या उपलब्ध आहेत. मीम्स किंवा कवितेच्या ओळी पिंट्र केलेल्या कस्टमाइज्ड छत्र्यांनाही कॉलेजच्या मुलामुलींकडून पसंती मिळते. अगदी खास, हटके छत्री हवी असेल तर ‘इंडिया सर्कस’सारख्या ब्रॅण्डने मुघल काळातील चित्रांच्या पिंट्र्स, भौमितिक रचना असलेल्या पिंट्र्स अशा काही क्लासिक पिंट्र्समधील छत्र्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

छत्रीप्रमाणे रेनकोट घेतानाही आपण काही चुका नेहमी करतो. रंग, डिझाइन आणि फिटिंग छान आहे म्हणून आपण रेनकोट लगेच विकत घेतो; पण रेनकोट घेताना या सगळय़ा गोष्टींबरोबर रेनकोटचं कापड योग्य आहे ना, त्यावरून पाणी ओघळून जाते आहे की नाही, त्याच्या सगळय़ा चेनची नीट उघडझाप होते आहे ना, या सगळय़ा गोष्टी तपासून घ्यायला हव्यात. रेनकोट शक्यतो दुकानातूनच खरेदी करा. रेनकोटमध्येही ट्रेण्डी रंग आले आहेत. पोन्चो, रेनकोट, पूर्ण पॅन्ट आणि टॉप असलेला रेनकोट आणि ट्रान्सपरन्ट रेनकोटपासून हरतऱ्हेच्या पिंट्रमधील रेनकोटचे पर्याय बाजारात उपलब्ध झाले आहेत.

फुटवेअरही पावसाळय़ात खूप महत्त्वाचे ठरतात. पावसाळय़ात चपलांची ग्रिप नीट असणं अति महत्त्वाचं असतं, नाही तर भर रस्त्यात आपला कपाळमोक्ष होण्याची शक्यता जास्त. सध्या बाजारात महिला आणि पुरुषांसाठी सुंदर प्लास्टिकचे किंवा त्यासारख्या मटेरियलचे शूज आले आहेत. या शूजचे रंग आणि डिझाईन्स कॉलेजला जाणाऱ्या मुलांपासून ते ऑफिसला जाणाऱ्या लोकांपर्यंत सगळय़ांना वापरता येतील असे आहेत. प्लास्टिकच्या चपलांमध्येही वेगवेगळे प्रकार आले आहेत. पावसाळी फुटवेअरची खरेदी दुकानातूनच करावी असं काही नाही. स्ट्रीट फॅशनमध्येही पावसाळी चपलांचे स्वस्त आणि मस्त प्रकार उपलब्ध असतात.

पावसाळय़ातील कपडे हा एक स्वतंत्र विषय आहे. मात्र त्या कपडय़ांवरच्या अॅीक्सेसरीज विशेषत: दागिन्यांची काळजीपूर्वक निवड करायला हवी. सध्या दोऱ्यांचे नेकलेस, ऑक्सिडाइज्ड नेकलेस किंवा चेन्स नेहमी घातल्या जातात. पावसाळय़ात अशा दागिन्यांचा रंग जाणं, ते दागिने अंगाला लागून त्वचेला त्रास होणं असे प्रकार वारंवार होतात. त्यामुळे पावसाळय़ात कमीत कमी दागिने घाला. वॉटरप्रूफ, चांगला दर्जा असलेले दागिने बाजारात उपलब्ध आहेत. अजूनही चंकी दागिने जास्त ट्रेण्डिंग आहेत आणि ते पाण्याने खराबही होत नाहीत. त्यामुळे त्यांचा वापर करता येईल. या सगळय़ा गोष्टी लक्षात घेऊन ट्रेण्डी, पण तुम्हाला सोयीस्कर ठरतील, उपयोगी पडतील अशा वस्तूंची खरेदी केली तर बरसत्या धारांबरोबरच पावसाळी फॅशनचा आनंदही लुटता येईल.
viva@expressindia.com

Story img Loader