लॅक्मे फॅशन वीक विंटर फेस्टिव्ह २०१३ मध्ये सहभागी झालेल्या काही बडय़ा आणि काही नवोदित डिझायनर्सशी ‘व्हिवा’नं बातचीत केली आणि त्यातून फॅशन विश्वाची बदलती स्पंदनं टिपली.
ऑन द रँप
* अँड आणि ग्लोबल देसी हे अनिता डोंगरे यांचे ब्रँड प्रथमच लॅक्मे फॅशन वीकमध्ये सादर झाले.
* जूही चावला, ऊर्मिला मातोंडकर, गुल पनाग, राधिका आपटे, संजय सुरी आदी स्टार्स अनितासाठी रँपवर.
* आधुनिक, स्वतंत्र अशी वर्किंग वुमन हीच कलेक्शनची प्रेरणा
* ७०च्या दशकाची आठवण देणारं रेट्रो म्युझिक आणि ‘डे अॅट वर्क लुक’ एकदम पार्टी वेअरच्या ‘नाइट इन टाऊन’मध्ये बदलला, ते आकर्षक.
ऑन द रँप
* पाँड्स गोल्ड रेडिअन्सनं प्रायोजित केल्यानं गोल्ड हीच फॅशन शोची थीम होती.
* चकचकीत आणि ट्रेंडी असं कलेक्शन दिमाखात सादर झालं.
* चकाकी, ग्लॅमर, रॉयल लुक ही प्रेरणा
* शो स्टॉपर करिष्मा कपूरनं घातलेला गोल्डन गाऊन मुख्य आकर्षण ठरला.
भारतीयत्व हेच आपल्या फॅशनचं वैशिष्टय – विक्रम फडणीस
भारतीय फॅशन विश्वाचं एक स्वत:चं असं वैशिष्टय़ आहे. आपण सतत ग्लोबल फॅशनचा चष्मा लावून त्याच्याकडे बघण्याची गरज नाही. अनेक परदेशातील डिझायनर्स एम्ब्रॉयडरी करण्यासाठी, इथली एथनिक डिझाइन्स करून घेण्यासाठी खास भारतात येतात. अगदी लहान लहान गावांपर्यंत कशिदाकाम करायला, हँड एम्ब्रॉयडरी करून घ्यायला ते पोहोचतात. आपल्या देशात परत जाऊन आपला ब्रँड टॅग लावतात आणि आपण परदेशात जाऊन तेच खरेदी करतो. भारतीयत्व हीच आपल्या फॅशनची खरी ओळख आहे. मार्केटमध्ये काय मागणी आहे, लोकांना काय आवडतंय याचा विचार करून डिझाइन केलं तर ते भावतं. भारतीय फॅशन विश्वावर हिंदी चित्रपटांचा प्रभाव आहे, यात शंका नाही. लोक चित्रपटातील फॅशन आजही फॉलो करतात.
भारतीय फॅशन प्रगल्भ होतेय – अनिता डोंगरे
गेल्या पाच-सहा वर्षांत भारतीय फॅशन विश्व खूपच विस्तारलं आहे. भारतीय लोकांच्या फॅशनविषयक जाणिवा प्रगल्भ होताहेत. भारतासारख्या देशात पूर्वी फॅशन हिंदी चित्रपटांशी जोडलेली होती. आताही बॉलीवूडचा प्रभाव आहे. पण तो काही ठराविक लोकांपुरता मर्यादित आहे. ग्लोबल फॅशन काय आहे हे लोकांना आता माहिती असतं. फक्त हिंदी चित्रपटांचा प्रभाव तेवढाच राहिलेला नाही. सामान्य जनतासुद्धा इंटरनेट आणि अन्य माध्यमातून फॅशनबाबत अपडेट असते. अँड आणि ग्लोबल देसीची देशात ४० शहरांमध्ये आऊटलेट्स आहेत. लहान शहरांमधूनसुद्धा लोकांचा चांगला प्रतिसाद असतो. रँपवरची फॅशन आता लोकांपर्यंत सहज पोहोचते. फॅशन अॅक्सेसिबल असणं हेदेखील महत्त्वाचं आहे. अॅक्सेसिबल असते तीच फॅशन असंच माझं मत आहे. आमच्या ग्लोबल देसी आणि अँड कलेक्शनमधले सगळे जागतिक आणि देसी ट्रेंड फुलवणारी आऊटफिट्स ठेवण्यावर भर आहे. आधुनिक तरुणाईला आपली खास ओळख हवी असते, ती देते अशी फॅशन ते आपलीसी करतात. लग्न समारंभांमध्येसुद्धा आजच्या नवरीला नुसतं ख्रिसमस ट्रीसारखं वेगवेगळ्या दागिन्यांनी नटणं नको असतं. नटण्यातलं सौंदर्य हवं असतं. साधेपणातही सौंदर्य आहे, असं माझं मत आहे.