malikaप्रसिद्ध मॉडेल आणि बॉलिवूडची स्टाइल दिवा म्हणून ओळखली जाणारी मलाइका देतेय स्टाइल टिप्स खास व्हिवाच्या वाचकांसाठी.
हाय, मी तुमच्या फॅशन टिप्स नेहमी वाचते. मी अठरा वर्षांची, कॉलेज गोइंग गर्ल आहे. माझी उंची ५ फूट आणि वजन ६२ किलो आहे. माझ्या मते मी जराशी लठ्ठच आहे. मला वेगवेगळ्या प्रकारचे श्रग्स आणि जॅकेट घालायला आवडतात. तसंच स्कार्फ, स्टोल अशा अ‍ॅक्सेसरीजदेखील वापरायला आवडतात. वेस्टर्न स्टाइलचे कपडे घालायची खूप इच्छा आहे. मला ते शोभून दिसतील का आणि मी पुरेशी उंचही वाटेन अशा ड्रेसिंग स्टाइलबद्दल काही टिप्स मिळतील का?
वैष्णवी
हॅलो वैष्णवी,
तू माझ्या फॅशन टिप्स नेहमी वाचतेस. थँक्यू!  बहुतेक तू स्वत:वर वेगवेगळ्या फॅशन्सचे प्रयोग करत असणार. ग्रेट! हे वाचून आनंद वाटला. असे केल्याने आपल्याला कोणती स्टाइल शोभून दिसते किंवा दिसत नाही याचे ज्ञान तुला आपोआपच होईल. थोडक्यात सांगायचे झाले तुला ‘करेक्ट फॅशन सेन्स’ येईल. तुला वेस्टर्न स्टाइलचे कपडे घालायला आवडत असतील तर फारच छान. मग तुझ्याकडे ड्रेसिंगचे खूप पर्याय असतील. तुला तुझ्या वयाप्रमाणे कुल आणि कम्फर्टेबल दिसायचे असेल तर तू मॅक्सी ड्रेस (हा वनपीस ड्रेस प्रकारातील पायघोळ ड्रेस असतो आणि अंगासरशी बसतो) किंवा स्केटर ड्रेस (हा गुडघ्यापर्यंत लांबीचा वनपीस प्रकार असून, अंगासरशी बसणारा, कमरेला घट्ट व खाली घेरदार असतो) का घालून पाहत नाहीस? मॅक्सी ड्रेस योग्य प्रकारे घातलास तर, त्यात तुझा बांधा आणि लुक फार आकर्षक दिसू शकतो. अर्थात यावर मस्त हिल्स असलेली पादत्राणे मस्ट आहेत. नाही तर ‘वेजेस’ प्रकारच्या सँडल्सही चालतील. सरतेशेवटी निरनिराळ्या ड्रेसिंग स्टाइल्स ट्राय करूनच, तुझ्या अंगकाठीला काय योग्य दिसेल ते तुलाच ठरवावे लागेल.   
 आता आपण रुटीन लाइफमध्ये तुझ्यासाठी योग्य असतील, असे काही वेस्टर्न ड्रेसचे प्रकार पाहूया. रोजच्या वापरासाठी स्केटर स्कर्ट (स्केटर ड्रेसमधील वनपीसऐवजी फक्त घेरदार स्कर्ट आणि वर टी-शर्ट घातला जातो) या प्रकारात स्कर्टवर घालायचा टी-शर्ट खूप तंग नसेल तर स्केटर स्कर्टमध्ये आपला लुक एकदम स्मार्ट आणि स्टायलिश दिसतो. आतापर्यंत आपण कपडय़ांच्या फॅशनबद्दल चर्चा केली. पण त्याचप्रमाणे केशरचना, दागदागिने, अ‍ॅक्सेसरीज यांचीही काळजीपूर्वक निवड करणे गरजेचे आहे.
या सर्व गोष्टी जरी वरकरणी किरकोळ भासत असल्या तरी त्यांच्या एकत्रित परिणामाने आपल्या बाहय़ व्यक्तिमत्त्वात खूप मोठे बदल घडू शकतात. उदाहरणार्थ बघणाऱ्यांचे लक्ष तुझ्या ड्रेसकडे वेधून घ्यायचे असेल तर, कमीत कमी दागिने अंगावर घाल. नाही तर एखादाच ठळक नेकलेस किंवा फक्त ठसठशीत कॉकटेल िरग वापरायला हरकत नाही. आता या सर्वापेक्षाही अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझा स्वत:वर असलेला विश्वास. स्वत:च्या विचारांवर, निर्णयांवर, क्षमतांवर नेहमी विश्वास ठेव. हीच स्मार्ट स्टायिलगची गुरुकिल्ली आहे. स्वत:कडील नसलेल्या गोष्टींबद्दल खंत करण्यापेक्षा असलेल्या गोष्टींचा आदर कर, मनातील या सकारात्मक भावनाच तुझ्या चेहऱ्यावर खरंखुरं सौंदर्य खुलवतील आणि तुझ्यातील आत्मविश्वास, तुझे चालणे डौलदार बनवील. मग कॉलेजमधल्या मुलींच्या घोळक्यात तू नक्की उठून दिसशील, यात शंकाच नाही सो यंग लेडी ऑल द बेस्ट फॉर स्टायिलग.
मलाइका अरोरा खान
(अनुवाद – गीता सोनी)
सौजन्य – द लेबल कॉर्प
http://www.thelabelcorp.com, http://www.theclosetlabel.com  

आपल्या गर्ल्स गँगबरोबर सकाळी ब्रंचला जाणार आहात की रात्री पार्टीचा प्लॅन आहे? काय घालू, कसं दिसेल या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी स्टाइल दिवा मलाइका अरोरा-खान तुम्हाला मदत करेल. फॅशन, कपडे, हेअर, स्टाइलिंग याबाबतच्या तुमच्या शंकांना मलाइका या सदरामधून उत्तरं देईल. फॅशन आणि स्टाइलिंगविषयीचे आपले कोणतेही प्रश्न viva@expressindia.com या इमेल आयडीवर बिनधास्त पाठवा. आपलं नाव, राहण्याचं ठिकाण यांसह प्रश्न पाठवा आणि सब्जेक्ट लाइनमध्ये स्टाइलिंग बाय मलाइका असं आवर्जून लिहा.

Story img Loader