प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलीवूडची स्टाइल दिवा म्हणून ओळखली जाणारी मलाइका देतेय स्टाइल टिप्स खास व्हिवाच्या वाचकांसाठी.
मी संजना, मी कॉलेजगर्ल आहे. मला नेहमी डेनिम जीन्स आणि टी- शर्ट्स घालायला आवडतात. पण पलाझ्झोसारख्या काही वेगळ्या पॅण्ट्सही मला घालून पाहायच्या आहेत. अशा काही वेगवेगळ्या ऑप्शन्सबद्दल आपण मला टिप्स देऊ शकाल का?
हाय संजना,
हॅपी टु हिअर दॅट, तुला नेहमीपेक्षा काही तरी वेगळं करायचं आहे. ही खूपच चांगली गोष्ट आहे. जीन्स आणि टी आपण जवळजवळ रोजच घालत असतो, कित्येकदा तोच तो ड्रेस प्रकार घालूनही कंटाळा येतो, शिवाय सध्याच्या उन्हाळ्यात जाडजूड जीन्स नकोशा वाटतात. त्याऐवजी पलाझ्झो ग्रेट ऑप्शन आहे. कमरेशी आवळ असणारा हा पॅन्टचा प्रकार पायाशी मात्र घेरदार असतो, याच्या कापडाला सुंदर फॉल असतो, त्यामुळे हे घालून वावरणे सोपे आणि हवेशीर वाटते. उंच आणि बारीक अंगकाठीला हा कपडे प्रकार शोभून दिसतो. प्रिंटेड कापडाच्या किंवा एकाच रंगातल्या पलाझ्झोसुद्धा मस्त दिसतात. सध्याच्या समर सीझनसाठी लिनन कापडाच्या पलाझ्झो आणि वर मंद रंगसंगतीचे, एकाच रंगातले टॉप्स किंवा शर्ट्स एकदम बेस्ट वाटतील. वर छान, नाजूक अ‍ॅक्सेसरीज घातल्या की दिवसासाठी स्टाइल्ड लुक नक्की मिळेल. शिवाय आरामदायी आणि सुटसुटीतही वाटेल. तसंच  लिनन पलाझ्झोवर गडद रंगातला, म्हणजे काळा किंवा गडद पोवळी (कोरल) रंगाचा किंवा चमकदार रंगातला टॉप हे नाइट औटिंगसाठी झकास दिसेल. या कपडय़ांवर हिल्स असलेले वेजेस किंवा शूज असतील तर मग यू आर रेडी फॉर पार्टी.
 आता कामाच्या ठिकाणी पलाझ्झो घालायच्या असतील तर  डार्कर रंगसंगतीतील प्लेन पलाझ्झो वर शुभ्र पांढरा टॉप म्हणजे ग्रेट फॅशन कॉम्बो होईल. आता दुसरे तुला वापरण्यासारखे ड्रेसचे प्रकार म्हणजे स्केटर ड्रेस, हे वनपीस प्रकारचे ड्रेस जास्तीत जास्त गुडघ्यापर्यंत लांब, काही वेळा स्लीव्हलेस आणि स्टायलिश असतात, कमरेला घट्ट पण खाली घेरदारही असतात. या ड्रेसप्रकारामुळे स्मार्ट लुक मिळायला मदत होते. शूज किंवा चपलांबद्दल विचारशील तर दिवसा या ड्रेस वर स्नीकर्स बेस्ट स्टाइल होईल. सध्या हीच फॅशन इन आहे आणि रात्री याच ड्रेसिंगवर वेजेस किंवा सिलेटोज सही दिसतील, डेनिम जीन्सऐवजी तुला पॅन्टचा वेगळा प्रकार ट्राय करायचा असेल तर तो म्हणजे रिलॅक्स्ड ड्रॉ स्ट्रिंग पॅन्ट. या नावाप्रमाणे खरंच आरामदायी, अंगासरशी बसणाऱ्या, सुटसुटीत तरीही आटोपशीर, कमरेजवळ सैल, घट्ट करता येतात. पूर्ण पायाच्या लांबीच्या असतात, हा कम्फर्टेबल स्टायलिंगचा उत्तम प्रकार म्हणता येईल. शिवाय खूप रंगांत उपलब्ध असतात, त्यामुळे अशा पॅण्टवर वेगवेगळ्या रंगांचे टीशर्ट, टॉप्स घालूनही नवीन स्टाइल केल्याची मजा मिळते. शिवाय कॉलेजमध्ये किंवा बाहेर कुठेही घालता येतात. तेव्हा संजना, या सगळ्या सध्या ‘इन’ असलेल्या ड्रेसिंग स्टाइल्स वापरल्यास की तू कॉलेज क्राऊडमध्ये ‘आऊट’स्टॅण्डिंग दिसशील हे नक्की.
मलाइका अरोरा खान
(अनुवाद : गीता सोनी)
सौजन्य – द लेबल कॉर्प
http://www.thelabelcorp.com, http://www.theclosetlabel.com  

आपल्या गर्ल्स गँगबरोबर सकाळी ब्रंचला जाणार आहात की रात्री पार्टीचा प्लॅन आहे? काय घालू, कसं दिसेल या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी स्टाइल दिवा मलाइका अरोरा-खान तुम्हाला मदत करेल. फॅशन, कपडे, हेअर, स्टाइलिंग याबाबतच्या तुमच्या शंकांना मलाइका या सदरामधून उत्तरं देईल. फॅशन आणि स्टाइलिंगविषयीचे आपले कोणतेही प्रश्न viva@expressindia.com या ईमेल आयडीवर बिनधास्त पाठवा. आपलं नाव, राहण्याचं ठिकाण यांसह प्रश्न पाठवा आणि सब्जेक्ट लाइनमध्ये स्टाइलिंग बाय मलाइका असं आवर्जून लिहा.

Story img Loader