देशभरातून आलेले ९८ डिझायनर्स, एक भव्यदिव्य रॅम्प, लखलखणारे तारे-तारका, हजारो कॅमेराजचे फ्लॅशेज आणि एक ग्रॅण्ड शो. लॅक्मे फॅशन वीकबद्दल एका वाक्यात सांगा, असं जर कोणी सांगितलं तर त्याचं वर्णन थोडंबहुत असंच असेल. नवीन वर्षांत कोणते नवीन ट्रेण्ड असतील, कोणते कलर्स इन आणि कोणते आऊट असतील, कोणते िपट्र्स फॉर्ममध्ये असतील या आणि अशा अनेक प्रश्नांची हमखास उत्तरं मिळण्याचं ठिकाण म्हणजे लॅक्मे फॅशन वीक. वर्षांतून दोनदा मुंबईत पार पडणाऱ्या या फॅशन वीकवर भारतीय फॅशन विश्वातील प्रत्येकाची बारीक नजर असते. त्यामुळे किमान दोन ते तीन महिन्याअगोदरपासून या फॅशन वीकच्या चर्चा रंगत जातात. शोची सुरुवात आणि सांगता करायचा मान कोणाला मिळणार, जेन नेक्स्टमध्ये कोण असणार, कोणकोणत्या सेलेब्रिटीज कोणाच्या शोला रॅम्पवॉक करणार, यासंबंधीचे तर्कवितर्क लावले जातात.
लॅक्मे फॅशन वीक िस्प्रग-समर २०१४ ची अधिकृत घोषणा १८ फेब्रुवारीला मुंबईच्या ‘ग्रॅण्ड’ हॉटेलमध्ये करण्यात आली. यंदा १२ ते १६ मार्चच्या दरम्यान हा फॅशन वीक पार पडणार आहे. या सीझनच्या ९८ डिझायनर्सची घोषणा करण्यात आलीच. पण त्याचबरोबर या वेळी पहिल्यांदाच काही निवडक डिझायनर्सनी त्यांच्या कलेक्शनची पहिली झलकसुद्धा या वेळी सादर केली. लॅक्मेने यंदाच्या सीझनसाठी त्यांचे खास ‘अ‍ॅबस्युलूट इल्युजन’ हे खास मेटालिक कलेक्शन सादर केले. यासंबंधी बोलताना लॅक्मेच्या हेड ऑफ इनोव्हेशन पूर्णिमा लांबा म्हणाल्या, ‘आजची तरुणी तिच्या लूकसोबत विविध प्रयोग करू इच्छितात. हीच गोष्ट लक्षात ठेवून या वेळी आम्ही रंग आणि प्रकाशाचा मेळ घालणारे इल्युजन कलेक्शन घेऊन आलो आहोत. यात तुम्हाला मेटॅलिक शेड्सची रेंज पाहायला मिळेल.’
मागच्या वेळेप्रमाणे यंदाच्या फॅशन वीकची सुरुवातसुद्धा डिझायनर मनीष मल्होत्रा करणार असून सांगता डिझायनर राजेश प्रताप सिंग यांच्या कलेक्शनने होणार आहे. मागच्या फॅशन वीकला गरहजर असलेली लॅक्मेची ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसीडर करीना कपूर या वेळी मात्र राजेश प्रताप सिंग यांच्यासाठी रॅम्पवॉक करणार आहे. भारतातील ऑनलाइन शॉिपगमधील अग्रगण्य नाव – ‘जबाँग.कॉम’ने यंदा लॅक्मेमधील काही खास डिझायनर्ससाठी स्टेज उपलब्ध करून दिला आहे आणि त्याचबरोबर या डिझायनर्सचे यंदाचे कलेक्शन्स तुम्हाला जबाँग.कॉम वर शोच्या नंतर लगेचच खरेदीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. लॅक्मेच्या यंदाच्या ‘जेन नेक्स्ट’ डिझायनर्समध्ये दिल्लीची चांदनी मोहन, कोलकाताची दिव्या दत्ता, पॅरिसची पारुल भार्गव, कोचीचा श्रीजीत जीवन, नॉयडाचा उज्ज्वल दुबे आणि पुण्याचा विवेन साबू या सहा डिझायनर्सचा समावेश करण्यात आला आहे. युके बेस अ‍ॅक्सेसरी डिझायनर मॉय किवोम इंडियन फॅशन इंडस्ट्रीत तिचे पदार्पण यंदाच्या लॅक्मेतून करणार आहे. त्याचबरोबर इंटरनॅशनल मॉडेल िनजा सिंगसुद्धा पहिल्यांदा लॅक्मेच्या फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक करणारे आहे.
लॅक्मे फॅशन वीकचे पार्टनर असलेल्या ‘डीएलएफ’ कंपनीने यंदापासून भारतीय डिझायनर्ससाठी ‘एक्स्पोर्टेड’ नामक नवीन उपक्रमाची घोषणा केली. या कार्यक्रमामधून दरवर्षी काही डिझायनर्स निवडले जातील आणि त्यांना पॅरिस फॅशन वीक, न्यूयॉर्क फॅशन वीक, टोकियो फॅशन वीक आणि लंडन फॅशन वीक या जगातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या चार फॅशन वीक्समध्ये दोनदा त्यांचे कलेक्शन्स सादर करायची संधी मिळणार आहे. डिझायनरच्या खर्चाची सर्व जबाबदारी ‘डीएलएफ’ स्वत: उचलणार आहे.
याशिवाय नीता लुल्ला, स्वप्निल िशदे, कृष्णा मेहता, श्रुती संचेती, अनिता डोंगरे, अर्चना कोचर अशी अनेक नामवंत डिझायनर्सची कलेक्शन्स फॅशन वीकमध्ये पाहायला मिळतील. त्याचबरोबर मंदिरा बेदी, मोनिका शहा, सिद्धार्थ सिन्हा असे १६ डिझायनर्स त्याचे पहिलेवहिले कलेक्शन यंदाच्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये सादर करणार आहेत.
५्र५ं.’‘२ं३३ं@ॠें्र’.ूे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा