मिन्त्रा.कॉम’ या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटच्या वतीनं हा फॅशन वीकएण्ड आयोजित करण्यात येत आहे. १०० पेक्षा दास्त फॅशन डिझायनर्स आणि ब्रँड्स थेट ग्राहकांसमोर त्यांचं कलेक्शन सादर करणार आहेत. आयएमजी रिलायन्स आणि मिन्त्रा यांच्या वतीनं हा सोहळा ३ ते ५ ऑक्टोबरदरम्यान मुंबईत पॅलेडियम हॉटेलमध्ये होणार आहे. अभिनेत्री आणि मॉडेल लिसा हेडन हिच्या उपस्थितीत या पहिल्या ‘फॅशन वीकएण्ड’ची घोषणा नुकतीच झाली. फॅशन वीक आणि फॅशन वीकएण्ड यातला फरक स्पष्ट करताना आयोजकांनी सांगितलं की, फॅशन वीकमध्ये प्रामुख्यानं व्यापारी सामील होतात. तिथलं कलेक्शन सर्वसामान्यांसाठी नसतं. फॅशन वीकला निमंत्रितांनाच प्रवेश असतो. पण फॅशन वीकएण्ड मात्र सामान्य ग्राहकांसाठी असणारं एक प्रकारचं फॅशन आणि लाइफस्टाइलचं प्रदर्शन आहे.
फॅशन वीकएण्ड
फॅशन शो आणि फॅशन वीक आता आपल्याकडे बऱ्यापैकी रुळले आहेत. मात्र आता ‘फॅशन वीकएण्ड’ नावानं फॅशन आणि लाइफस्टाइलचा एक वेगळा सोहळा मुंबईत रुजू पाहतोय.
First published on: 19-09-2014 at 01:03 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fashion weekend