vv11नव्या पिढीचा गायक, संगीतकार, रिअ‍ॅलिटी शोचं व्यासपीठ गाजवणारा, रॉक म्युझिक बॅण्डमध्ये झोकून देऊन गाणारा आणि शास्त्रीय संगीताच्या तानाही तितक्याच नजाकतीनं घेणारा हरहुन्नरी कलाकार जसराज जोशी सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!
१४ फेब्रुवारी..अरे कोण कुठला तिकडचा संत.. तिकडचा सण इकडे कशाला? आपली संस्कृती नाही ती.. असे म्हणणाऱ्यांनी आजची प्ले लिस्ट वाचायची काही गरज नाही. (अरे १४ फेब्रुवारीपर्यंत कोण थांबतंय? अपने लिये तो रोजही व्हॅलेंटाइन है. असा दावा असेल तर त्यांचे त्यांनी ठरवावे.)  बाकी या दिवसात काहीतरी मजा आहे यात वाद नाही. कारण या दिवशी अख्खे जग प्रेममय असते. रोमँटिक असते. हा दिवस दर वर्षी कितीतरी जणांना दिल की बात सांगायची िहमत देत असतो. आपल्या साथियाँसोबत दिवस मजेत घालवायचा हक्क देत असतो.. आणि साथीला रोमँटिक गाण्यांची प्ले लिस्ट नसेल तरच नवल. माझ्या-तुमच्या प्ले लिस्टमध्ये खूप प्रमाणात साम्य असणार हेही ओघाने आलेच. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं नि आमचं अगदी सेम असतं.
माझ्या प्ले लिस्टची सुरुवात निर्वविादपणे मला रोमँटिकपणा शिकवणाऱ्या सोनू निगमच्या सजिद-वाजिदचे संगीत असलेल्या ‘दीवाना’ या अल्बमने होतेय. यातल्या सगळ्याच गाण्यांनी मला वेड लावले होते. तेव्हा मी दहावीत होतो. कधी एकदा मुलांच्या शाळेतून कॉलेजमध्ये जातोय आणि एखाद्या मुलीच्या प्रेमात पडतोय असे मला ही गाणी ऐकताना झाले होते. नंतर कॉलेजमध्ये मुलींसमोर गायलो नाही फार; पण रॅिगग करणारे कोणी म्हणाले, की गायक आहेस तर मग गाऊन दाखव पट्कन काहीतरी..की, माझे एकच गाणे ठरलेले असायचे- ‘दीवाना तेरा..’ काही सीनिअर्स तर मला सोनू अशीच हाक मारायला लागले होते, त्यानंतर.
कॉलेजला असताना थेट तलत मेहमूदच्या ‘जलते है जिस्के लिये’, रफीसाहेबांच्या ‘तेरे मेरे सपने’, किंवा ‘एहेसान तेरा होगा मुझपर’ लतादीदीच्या ‘मुझे तुम मिल गये हमदम.., ना..जिया लागे ना..’, ‘आज कल पाँव ज़्‍ामी पर नही पडते मेरे’ या आणि अशा गाण्यांचे नव्याने अर्थ लागायला लागले. किशोरदाच्या ‘छू कर मेरे मन को’, ‘केहेना है केहेना है’, वगरे गाण्यांनी वेगळी नशा चढायली लागली. बाकी कडव्यात ‘रे’ चा ‘सा’ होणाऱ्या (स्केल चेंज) ‘तेरे बिना जिया जाये ना’चाही अनुभव आला.विजू शहा-हरिहरन-साधना सरगम यांचा सुरेल संगम- ‘कुछ मेरे दिलने कहा..’(चित्रपट-तेरे मेरे सपने), ‘चुपके से’ आणि ‘साथियाँ’( चित्रपट- साथियाँ) यांनीही वेड लावलेच होते.
प्ले लिस्टमधले मस्ट – ‘तुम्हे हो न हो मुझको तो इतना यकीन है, मुझे प्यार तुमसे नही है नही है ..’ (चित्रपट -घरोंदा) – हे असे गुलजारसाहेबांशिवाय दुसरे कोण लिहिणार? ‘चुप चुप् के चोरीसे चोरी’ (चित्रपट -बंटी और बबली)- शंकर-एहसान-लॉय च्या सर्वात भारी चालींपकी एक.. पुन्हा एकदा गुलज़ारसाहेब. या संगीत त्रिकुटाचेच ‘दिल चाहता है’ मधले ‘कैसी है ये रुत..’ जावेद अख्तरसाहेबांनी लिहिलेली हीदेखील गाणी रोमँटिक मूडमध्ये ऐकावीच अशी.
गुलजार-विशाल भारद्वाज यांचे ‘ओंकारा’मधले भन्नाट गाणे ‘ओ साथी रे..’ स्वत विशाल आणि श्रेया घोषालनी गायलेले आहे. प्रेमाची गाणी म्हटल्यावर आठवतातच अशी आणखी दोन गाणी – ‘क्या यही प्यार है..’  (‘रॉकी’ मधले) आणि ‘तुमसे मिलके’ सुरेशजी-  आशाताई – आरडी. काय बोलू याविषयी.. तुम्हाला ऐकल्यावर प्रत्येकवेळी थेट जाणवेलच. (सुरेशजींचा विषय निघाल्यावर ‘माजे राणी माजे मोगा’ हेही आठवतेच आठवते.)
 कमालीचा गोड आवाज लाभलेल्या मधुश्रीने गायलेले- ‘तू बिन बताये मुझे ले चल कही..’ (रंग दे बसंती), ‘कयामत से कयामत तक’ मधली सगळी गाणी विशेषत ‘अकेले है तो क्या ग़म है’, उदित नारायणच्याच फ्रेश आवाजातले- ‘तेरि याद हमसफर सुबहशाम..’ ही सगळी गाणी ऐकण्यासाठी मला १४ फेब्रुवारीपर्यंत थांबवत नाही. आणखी एक राहिले.. कुमार शानू मी आधी आवर्जून ऐकत नसे. पण, त्याचे ‘संभाला है मने बहुत अपने दिल को..’,
‘जब कोइ बात बिगड जाये..’, ‘सासोंकी जरुरत है जैसे..’,
‘आखोन्की ..’, ‘जब्से तुमको देखा है सनम..’
ही रोमँटिक गाणी आज मला खूप जवळची वाटतात. कुमार शानूची गायकी मला जरा उशिरा कळू लागली, असे म्हणा हवे तर.. रोमँटिक आणि दर्दभऱ्या गाण्यांमधील कुमार शानूचे योगदान विसरून चालणारच नाही.
खरे तर ही यादी अशीच पुढे चालू राहू शकते. इतकी की, १४ नोव्हेंबर उजाडेल!!! तुर्तास थांबू या.
जसराज जोशी -viva.loksatta@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे  ऐकाच..  व्हेन आय नीड यू
‘जब कोइ बात बिगड जाए..’ ची चाल राजेश रोशननी ‘500 miles’ या पीटर-पॉल-मेरी च्या गाण्यावरून घेतलेली आहे. अर्थात कडव्याची चाल वेगळी आहे; पण हे मूळ गाणे नक्की ऐका. फार सुंदर आहे. खरा धक्का तर तुम्हाला हे वाचल्यावर बसेल की, ‘तुमसे मिलके..’ या ‘परिन्दा’मधल्या गाण्याची चालसुद्धा पंचमदांनी लीओ सेअरच्या when i need you वरून उचलली आहे! याच्याही कडव्याची चाल वेगळी बांधली आहे आणि त्यात भारतीय मुलाम्याची गायकीही सुंदरररीत्या अवतरली आहे. इंग्रजी गाण्यांचा विषय निघालाच आहे, तरी enrique iglesias चे ‘हीरो’ मला त्याच्या आर्त गायकीसाठी खूप आवडते. Have i told you lately that i love you? हे रॉड स्टुअर्टचे गाणे त्यातील प्रपोजच्या स्टाइलमुळे आवडते. स्लमडॉग मिलिअनरमधले- dreams on fire ऐकाच. कारण अर्थातच ते रेहमानचे आहे!

हे  ऐकाच..  व्हेन आय नीड यू
‘जब कोइ बात बिगड जाए..’ ची चाल राजेश रोशननी ‘500 miles’ या पीटर-पॉल-मेरी च्या गाण्यावरून घेतलेली आहे. अर्थात कडव्याची चाल वेगळी आहे; पण हे मूळ गाणे नक्की ऐका. फार सुंदर आहे. खरा धक्का तर तुम्हाला हे वाचल्यावर बसेल की, ‘तुमसे मिलके..’ या ‘परिन्दा’मधल्या गाण्याची चालसुद्धा पंचमदांनी लीओ सेअरच्या when i need you वरून उचलली आहे! याच्याही कडव्याची चाल वेगळी बांधली आहे आणि त्यात भारतीय मुलाम्याची गायकीही सुंदरररीत्या अवतरली आहे. इंग्रजी गाण्यांचा विषय निघालाच आहे, तरी enrique iglesias चे ‘हीरो’ मला त्याच्या आर्त गायकीसाठी खूप आवडते. Have i told you lately that i love you? हे रॉड स्टुअर्टचे गाणे त्यातील प्रपोजच्या स्टाइलमुळे आवडते. स्लमडॉग मिलिअनरमधले- dreams on fire ऐकाच. कारण अर्थातच ते रेहमानचे आहे!