सध्याच्या काळात मेकअपला पर्याय नाही हे मान्य. पण काही वर्षांपूर्वीच्या ट्रेंडच्या तुलनेत सध्या सगळ्याच तरुणींचा कल ‘सिंपल लूक’कडे जातो. लाऊड मेकअपला तितकंसं प्राधान्य दिलं जात नाही. तरीही फेस्टिवल सीझन असल्या कारणानं ‘सिंपल तरीही फंकी’ असाही ट्रेंड दिसून येतोय. ब्युटी एक्स्पर्टशी बोलून घेतलेला आढावा..
ऑक्टोबर-नोव्हेंबर हे महिने म्हणजे फेस्टिव्हल फीवर. नवरात्री, लग्न-समारंभ यांचा हा काळ. त्यामुळेच या काळात तरुणींना सतावणारा आणि कॉन्शिअस करणारा घटक म्हणजे त्यांचा ‘लूक’ आणि त्यावर अवलंबून असणारं त्याचं ड्रेसिंग, त्यांचा मेकअप, त्यांच्या अॅक्सेसरीज्.. फेस्टिव्ह काळातील मेकअप कसा असावा यासाठी व्हिवा टीमने ओरिफ्लेमच्या ब्युटी आणि मेकअप एक्स्पर्ट आकृती कोचर यांच्याशी संवाद साधला. त्यांनी दिलेल्या काही टिप्स..
फेस्टिव्हल सीझन
फेस्टिव्हल सीझनमध्ये मेकअपसाठी १६ ते २५ या वयोगटातल्या तरुणी शिमर किंवा फ्रॉस्टी लिपस्टिक ट्राय करू शकतात. त्याने चेहऱ्याला एक ग्लोइंग लूक मिळतो, जो फेस्टिव्हल मूडला साजेसा असतो. या सीझनमध्ये लाऊड मेकअप टाळायचा असेल तर शिमर बेस्ड आयशॅडोज्देखील वापरता येऊ शकतात. शिवाय लायनर, मस्कारा आणि काजळ यांशिवाय मेकअप अपूर्णच असतो. या फेस्टिव्हल सीझनच्या चाìमग वातावरणामुळेच मेकअपसाठी ब्राइट कलर्स वापरणं सोयीचं ठरतं; त्यामुळे मॅट स्कीनचा लूक टाळता येतो, पण सध्या हिवाळादेखील तोंडावर आला असल्याने फ्रेश डूई स्किन जास्त पॉप्युलर ठरतेय. त्यासाठी चेहऱ्याला न्यूट्रल इफेक्ट देण्यासाठी तुम्ही एक तर डोळ्यांवर ब्राइट कलर्स वापरू शकता किंवा ओठांवर ब्राइट कलरची लिपस्टिक ट्राय करू शकता. फेस्टिव्हल सीझन आणि स्पेशली विंटर सीझनसाठी मजेंटा, ब्राइट पिंक असे कलर्स जास्त उठून दिसतात. या कलर्समुळे एक फ्रेश लूकही मिळतो आणि लाऊड मेकअपसुद्धा टाळला जातो, पण एकाच वेळी दोन्ही करणं टाळावं. ज्यामुळे मेकअप लाऊड होऊन तुमच्या फ्रेश डूई स्किनचा इफेक्ट जाऊ शकतो. आऊटफिट्समध्येही तुम्ही गोल्डन, ब्राँझ अशा कलर्सने प्राधान्य देऊ शकता.
लग्नसमारंभासाठी मेकअप
नवरात्र आणि दिवाळीपाठोपाठ आता लग्नसराईचा हंगाम सुरू होईल. लग्न म्हणजे फक्तनवरीनंच नटणं, हा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा