कुठल्या प्रकारचं जेवण कसं घ्यावं? कटलरी कुठली, कशी वापरावी? चांगला होस्ट किंवा गेस्ट बनण्यासाठीचे डायनिंग एटीकेट. जेवणाचा शेवट गोडाने करण्याची पद्धत असल्याने फाइन डाइनमध्ये शेवटी डीझर्ट्सचा प्रवेश होतो. डीझर्ट कोर्समधले काही लोकप्रिय पदार्थ आणि ते खायची पद्धत..
जेवणाचा शेवट गोडाने करायचा असला की डीझर्ट्सचा प्रवेश होतो. फ्रेंच जेवणात डीझर्ट्स हे दोन प्रकारांमध्ये गणले जातात. एकाला डीझर्ट्सच म्हणतात आणि त्यात निरनिराळ्या फळांचा समावेश असतो. दुसरा प्रकार आहे ‘ऑन्त्रमें’. या प्रकारात विविध प्रकारचे गोड पदार्थ येतात.
शानदार फाइनडाइनमध्ये गरम डीझर्ट्सपण सव्र्ह करतात. अनेकदा त्यावर अल्कोहोल ओतून तो पेटवून सव्र्ह केले जातात. लो लाइटिंगच्या रेस्टराँमध्ये ही डीझर्ट्स जेव्हा टेबलवर आणतात तेव्हा ती खूप आकर्षक दिसतात!
डीझर्ट्स हे फक्त चवीला गोड असून चालत नाही. ते दिसायला पण आकर्षक असले पाहिजे. डीझर्ट्स बनविणारे शेफ आपल्या कामात खूप तरबेज असतात. नवीन नवीन प्रकारची डीझर्ट्स बनवून आपल्या कस्टमर्सना कसं आकर्षति करावं, हा अनेक चांगल्या शेफ्सचा प्रयत्न असतो.
डीझर्ट्सचे प्रेझेंटेशनही अतिशय मोहक असले पाहिजे. म्हणजे कोंदण छान असले की खडय़ांचीही शोभा वाढते, तसलाच प्रकार! शुभ्र पांढऱ्या प्लेटवर सॉसने डिझाइन काढता येतं किंवा कागदाची नक्षीदार जाळी प्लेटवर ठेवून त्यावर कोको पावडर भुरभुरली की खाली त्याची प्लेटमध्ये सुंदर कोकोची जणू रांगोळीच तयार होते. त्यावर एखादा पुिडगचा तुकडा ठेवला जातो. ज्याच्यावर नाजूक गाíनश करता येतं. चॉकलेट फ्लेक्सपासून ते अगदी खाता येणाऱ्या फुलांच्या पाकळ्यापर्यंत काहीही गाíनश म्हणून वापरता येतं. प्लेट्सपण साध्या गोल न वापरता चौकोनी किंवा चंद्रकोर आकाराच्या वापरल्याने प्लेटिंगला अधिक उभारी येते. प्लेटमध्ये सव्र्ह केलेली डीझर्ट्स, डीझर्टस फोर्क आणि डीझर्ट स्पूनने खाल्ली जातात.
आपल्याकडचे फाइन डाइनमधले काही लोकप्रिय डीझर्ट्स आहेत
मूस: फेटलेलं अंड आणि साखर, क्रीम, फ्लेविरग (चॉकलेट, आंबा, स्ट्रॉबेरी इत्यादी) आणि जिलेटिनचं मिश्रण एका मोल्डमध्ये घालून थंड केलं जातं आणि ते सेट झाल्यावर मोल्डमधून काढून (उपडं करून) प्लेटमध्ये सव्र्ह केलं जातं.
सुफ्ले : बरंचसं मूसप्रमाणेच केलं जातं, पण त्यात फेटलेल्या एग व्हाइट्सचं प्रमाण जास्त असतं आणि ते डीमोल्ड करता येत नाही.
केक्स : सुंदर, मऊ आणि अगदी सुबक क्रीम केक्स. अनेक फ्लेवर्सचे थर असलेले केक्स पण खूप पॉप्युलर आहेत.
पुिडग : बेक्ड, अनबेक्ड, चक्क तांदळाच्या खीरीसारखी राइस पुिडग, फळांची पुडिंग्स इत्यादी प्रकार यात करतात.
क्रेप्स : म्हणजे सारण भरलेले मद्याचे अतितलम घावन, जे गोड सॉसबरोबर सव्र्ह केले जातात. कोणत्या प्रकारचा सॉस असावा हे क्रेप्समधल्या सारणावर अवलंबून असतं.
– गौरी खेर