पाश्चिमात्य फाइन डाइनमधले विविध कोर्स पाहिल्यानंतर आता  पेयांबद्दल जाणून घेऊ. अल्कोहोलिक आणि नॉन- अल्कोहोलिक असं या पेयांचं वर्गीकरण करता येईल. ‘फाइन डाइन’मध्ये यापैकी वाइनला जास्त महत्त्व आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेव्हरेजेस म्हणजे विविध प्रकारची पेय आणि त्या सर्व पेयांचे वर्गणीकरणही केलं गेलं आहे. दोन मुख्य प्रकार आहेत अल्कॉहोलिक (मादक) आणि नॉन अल्कॉहोलिक. आपण ज्यांना टिपिकली सॉफ्ट ड्रिंक्स आणि हार्ड ड्रिंक्स म्हणतो!

नॉन अल्कॉहोलिक पेयांचं वर्गीकरण तीन प्रकारांमध्ये होतं.

रेफ्रेशिंग (उत्साहवर्धक): या पेयांनी ताजंतवानं, फ्रेश झाल्यासारखं वाटतं. सरबतं आणि इतर शीतपेय यांचा यामध्ये समावेश होतो. यामध्ये कार्बन डायऑक्साइड घालून काबरेनेशन केलं असतं अशा पेयांना एरेटेड ड्रिंक्स असंही म्हणतात.

स्टीम्युलेटिंग (उत्तेजक) :  या पेयांनी तरतरी येते. चहा आणि कॉफी ही उत्तेजक पेय आहेत.

नरिशिंग (पोषक): दूध, ताक, लस्सी आदी पोषणमूल्य असणारी पेय नरिशिंग बेव्हरेजेस म्हणून गणली जातात.

मॉकटेल्स : हा प्रकारही नॉन-अल्कॉहोलिक पेयांमध्ये गणला जातो. दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारची पेय एकत्र करून एक वेगळंच पेय बनवलं जात ते म्हणजे मॉकटेल!

कॉकटेल हा प्रकार विविध अल्कोहोलिक पेय एकत्र करून बनवला जातो. ‘फाइन डाइन’मध्ये या सर्व पेयांपैकी वाइनलाच जास्त महत्त्व आहे. त्याबद्दल पुढच्या अंकात..

अल्कॉहोलिक पेयांचे दोन प्रकार असतात : फर्मेण्टेड आणि डिस्टिल्ड

फर्मेण्टेड पेयांमध्ये प्रसिद्ध आहेत –

बीयर आणि वाइन.

‘डिस्टिल्ड’चे प्रकार अनेक आहेत. त्यातले काही लोकप्रिय प्रकार :

व्हिस्की : सर्वात फेमस व्हिस्की म्हणजे स्कॉच! ही बार्ली या धान्यापासून बनविली जाते आणि फक्त स्कॉटलंडमध्ये बनवली जाते. अमेरिकन व्हिस्की ही कॉर्न किंवा राय किंवा त्यांच्या मिश्रणापासून बनवली जाते.

ब्रॅण्डी : ही खरं तर कोणत्याही फळापासून बनवता येते. पण नुसतं ब्रॅण्डी म्हटल की, ती फक्त द्राक्षांपासून बनवली असते.

रम : ही काकवीपासून बनते आणि त्यात लाइट, गोल्डन आणि डार्क असे प्रकार असतात.

जिन : कोणत्याही धान्यापासून तयार झालेला अल्कोहोल जेव्हा विविध प्रकारच्या विशिष्ट वनस्पती घालून पुन्हा डिस्टिल करतात, तेव्हा त्याला जिन म्हणतात. जुनिपर बेरी ही त्यातली एक मुख्य वनस्पती असते.

वोडका :  वोडका म्हणजे गहू, राय किंवा बटाटय़ापासून काढलेल्या अल्कोहॉलनी बनवली जाते. वोडका पारदर्शक, रंगहीन आणि विनाचवीची असते.

गौरी खेर

मराठीतील सर्व फाइन डाइन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Different types of beverage