पाश्चिमात्य फाइन डाइनमधले विविध कोर्स पाहिल्यानंतर आणि ब्रेकफस्टबद्दल जाणून घेतल्यानंतर आफ्टरनून टी च्या प्रथेविषयी जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंग्लंडमध्ये तर जेवणापेक्षा ब्रेकफस्ट आणि हा ‘आफ्टरनून टी’च जास्त फेमस आहे. ‘आमच्याकडे चहाला या ना कधी’, हे आमंत्रण आपण कित्तीदा अनेकांना केलं असेल. आमंत्रित पाहुण्यांचं स्वागत नुसतं चहानीच होत नाही, तर आपण त्याबरोबर काही खायलापण देतो. पाहुणचार जबरदस्त करायचा असेल तर आधी खायला एक तिखट , एक गोड आणि अजून काही पदार्थ असू शकतात आणि मग चहा- कॉफी सव्‍‌र्ह केली जाते. इंग्लंडमधल्या ‘आफ्टरनून टी’चं पण असंच काही असतं. इंग्लंडमध्ये दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणापेक्षा त्यांचा ‘ब्रेकफस्ट’ आणि ‘आफ्टरनून टी’च जास्त प्रसिद्ध आहेत.
‘आफ्टरनून टी’ची प्रथा, दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाच्यामध्ये लागणारी भूक शमवण्यास सुरू झाली. ती बरीच पॉप्युलर होऊन त्याला नंतर ‘स्नॉब व्हॅल्यू’पण आली. ‘आफ्टरनून टी’चा अनेकदा उल्लेख ‘हाय टी’ म्हणून केला जातो. पण या दोन्हीत छोटासा फरक आहे. जेव्हा ही प्रथा सुरू झाली तेव्हा आफ्टरनून टी हा श्रीमंतांची चैन समजली जायची. चहा महाग असल्याने व*++++++++++++++++++++++++++++र्*ंग क्लासला तो नुसता चैन म्हणून परवडणारा नव्हता. त्यामुळे थकून कामावरून परतल्यावर चहा बरोबर भरपोट, गरमागरम मांसाहारी पदार्थ खायला दिले जायचे जे जवळ-जवळ त्यांचं रात्रीचं जेवणच होत असे.
याच्या विरुद्ध आफ्टरनून टी अगदी लाइट समजला जायचा. चहा आणि साधे, आयसिंग नसलेले केक्स – त्यांना ‘टी केक्स’ म्हणतात (आपल्याकडे स्लाइस्ड केक्स म्हणून मिळतात) – असं सव्‍‌र्ह केलं जायचं. पण जसजशी त्याची पॉप्युलॅरिटी वाढत गेली, तसे सव्‍‌र्ह केले जाणारे पदार्थही वाढत गेले. आज त्यात विविध छोटे सुबक आयसिंग केलेले केक्स (पेस्ट्रीझ), छोटी सँडविचेस (यांना ‘फिंगर सँडविचेस’ म्हणतात), टार्ट इत्यादींचा समावेश झाला आहे. इंग्लिश आफ्टरनून टीचा खास पदार्थ आहे ‘स्कोन्स’. हे जॅम आणि क्रीमबरोबर खाल्ले जातात. हे सर्व पदार्थ प्लेट स्टँडवर आकर्षकरित्या मांडले जातात.
‘स्टार ऑफ द शो’ अर्थातच चहा असतो आणि तोही राजेशाही थाटात प्यायला जातो. रेडीमेड चहा हा प्रकार नसतो तेंव्हा, नशिबाने, ‘कटिंग’ नामक प्रकार तरी तिथे कोणाला माहित नसावा. चहापत्ती व्यवस्थित ‘टी पॉट’मध्ये (आपल्याकडची, आता गायब झालेली, ‘किटली’) ‘ब्रू’ करायला ठेवतात. त्याबरोबर साखरेचं भांडं वेगळं आणि दुधाचा छोटूसा जग – ‘मिल्क पॉट’ही असतो. तयार झाल्यावर तो गाळण्यातून कपात ओतला जातो आणि त्यात साखर आणि गरम दूध घातलं जातं. उत्तम प्रतीची क्रॉकरी – अगदी बोन चायनाची यासाठी वापरली जाते. कटलरी आणि हॉलोवेर चांदीचं असत. आफ्टरनून टीचे सर्व एटिकेट पाळावे लागतात. एक खास चहा पिण्याचा सोहळा कधी अनुभवायचा असेल तर ‘आफ्टरनून टी’चा आस्वाद जरूर घ्या!

-गौरी खेर

मराठीतील सर्व फाइन डाइन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous tradition behind afternoon tea