कुठल्या प्रकारचं जेवण कसं घ्यावं? कटलरी कुठली, कशी वापरावी? चांगला होस्ट किंवा गेस्ट बनण्यासाठीचे डायनिंग एटीकेट शिकवणारे सदर

मागच्या सदरात आपण फॉर्मल जेवणासाठी टेबल कसं लावतात ते पाहिलं. पण फॉर्मल जेवण म्हणजे काय? औपचारिक समारंभांच्या मेजवान्यांत जेव्हा पाश्चात्त्य (किंवा पाश्चात्त्य थाटात भारतीय) पद्धतीचं जेवण सव्र्ह करतात, तेव्हा ते या स्टाइलमध्ये करतात. अशा प्रकारच्या मेजवानीला औपचारिकता आणि शिष्टाचाराचं काटेकोर पालन केलं जातं. या औपचारिकतेची सुरुवात अगदी आमंत्रणपत्रापासून होते. आजदेखील मेजवानीचं आमंत्रण हे कागदावरच असतं. उत्तम प्रतीचा कागद वापरून त्यावर सुबक अक्षरात अगदी फॉर्मल भाषेत आमंत्रण केलं जातं. स्थळ आणि वेळेव्यतिरिक्त त्यात ड्रेस-कोड आणि R.S.V.P. असंही असतं.

लिफाफ्यावर आमंत्रितांची नावं असतात. सहसा ती जोडप्यांची असतात. लग्न झालेलं जोडपं असेल तर ‘मिस्टर अँड मिसेस’ याच्या पुढे पुरुषाचं पूर्ण नाव असतं. वैवाहिक स्थितीची (marital status) माहिती नसल्यास आमंत्रिताचं नाव ‘अँड पार्टनर’ असं लिहिलं जातं. ही आमंत्रणं बहुधा दोघांकरिताच असून मुलांचा त्यात समावेश नसतो. पाश्चात्त्यांची जवळची लग्नकरय सोडल्यास अशा फॉर्मल समारंभांना मुलं अलाउडच नसतात. मुलांना एकटं कसं घरी ठेवायचं? म्हणून बरोबर घेऊन जाता येत नाही. अशा वेळी आपल्या यजमानीणबाईंकडे चौकशी करावी. आमंत्रितांच्या यादीत लहान मुलं असलेली बरीच जोडपी असतील, समारंभाच्या जवळच्या खोलीत पाळणाघराची (temporary creche) सोय करतात.

ड्रेस कोड :
ड्रेस कोड म्हणजे समारंभाला तुम्ही कोणत्या पेहरावात येणं अपेक्षित आहे याचा उल्लेख. सहसा ‘बिझनेस फॉर्मल’ किंवा ‘ब्लॅक टाय’, असा ड्रेस कोड असतो. बिझनेस फॉर्मल असेल तर पुरुषांनी किमान सुटात यावं ही अपेक्षा असते आणि ‘ब्लॅक टाय’साठी फॉर्मल काळा सूट (टक्सीडो) घालावा ही अपेक्षा असते. आणि हो – सुटावर टाय/बो-टाय लावायला विसरू नये. इंडियन फॉर्मलही चालतं, पण ते विचारून निश्चित करून घेतल्यास जास्त चांगलं. यात बंद गळ्याच्या जॅकेटचा समावेश होतो. अशा पेहरावावर बूटच घालावे लागतात – सँडल्स किंवा चपला घालता येत नाहीत. महिलांना अशी काही फार बंधनं नसतात. पण सभ्यतेच्या चौकटीत बसेल असा कोणताही पेहराव चालतो. भारतात साडीही चालते. जेवणानंतर डान्स असेल तर लांब स्कर्ट किंवा गाउन उत्तम. जीन्स, सपाता अशा कॅज्युअल गोष्टींना मज्जाव असतो. लिहिलेल्या ड्रेस कोडमध्ये न जाणं म्हणजे आपल्याला त्या समारंभाचं किती महत्त्व आहे हे अधोरेखित करणं. म्हणून आपल्याकडून यजमानांना अवमानित वाटू नये यााची काळजी घेणं जरुरी आहे.

Story img Loader