पाश्चिमात्य फाइन डाइनमध्ये अल्कोहोलिक पेयांमध्ये वाइनला विशेष महत्त्व आहे. वाइन सेवनाचा पुरेपूर आनंद घ्यायचा असेल तर कुठली वाइन कशी घ्यावी, कधी घ्यावी याची माहिती हवी. उत्तम वाइन कशी ओळखायची हे जाणून घेण्याआधी वाइनची टर्मिनॉलॉजी माहिती हवी. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाइनच्या सेवनाचा संपूर्ण आनंद घ्यायचा असेल तर आपल्याला वाइनबद्दल बऱ्यापैकी माहिती असली पाहिजे. वाइनचा सर्वात जास्त प्रचार फ्रान्सने केल्यामुळे वाइनच्या संदर्भात काही विशिष्ट फ्रेंच शब्द सर्वत्रच वापरले जातात. वाइनच्या टर्मिनॉलॉजीमध्ये या शब्दांना महत्त्व आहे आणि ते तसेच वापरले जातात. त्यातले काही आहेत :

वँ (vin): वाइन.

वेनदांज (vendange)- द्राक्षांची कापणी.

विन्यर्ड (vineyard)- द्राक्षांचा मळा/ बाग

विन्त्रर  (vintner) – वाइन बनवणारा

विंटेज/विन्ताज  (vintage)- ठरावीक वर्षांची,

उत्तम प्रतीची वाइन.

सोमेलीये (sommelier)- वाइन वेटर.

वाइनरी – जिथे वाइन बनवली जाते ती जागा.

वाइनच्या सेवनात रंग, वास आणि चव या तिन्हीला महत्त्व आहे. वाइन बनल्यानंतरही तिचा दर्जा कसा आहे हे वर्णन करणारे काही खास शब्द असतात. त्यातले काही समजायला सोपे असतात. उदाहरणार्थ ‘कलर’ म्हणजे रंग. लाल आणि सफेद रंगाच्या वाइनमध्ये अनेक छटा असतात. वाइनची पारदर्शकता कमी असली तर ती वाइन ‘क्लाउडी’ (cloudy) समजली जाते.

‘अरोमा’ म्हणजे अन्नपदार्थाचा सुवास. हो, वाइन पिण्याआधी चक्क हुंगली जाते! प्रथम जो वास आपल्याला येतो तो अरोमा, आणि त्यानंतर येणारा ‘बुके’(bouquet). मराठीत याचं सरळ भाषांतर करून मिळणारा शब्द मला तरी माहीत नाही. कदाचित सुगंधित म्हणता येईल. वासांची नावे आपल्याला कशाची आठवण करून देतात, त्यावरून त्यांना संबोधलं जातं. फ्लावरी (फुलाचा वास), फ्रुटी (फळांचा वास ) इत्यादी विशेषणं वाइनच्या बाबतीत वापरली जातात.

वाइन चवीला कशी लागते हे आधी अगदी थोडीशी पिऊन बघितलं जातं. आवडली तरच सव्‍‌र्ह केली जाते/ प्यायली जाते. ड्राय वाइन म्हणजे जिच्यात अगदीच काही गोडपणा नसतो. ही वाइन बनवताना रसातल्या सर्व साखरेचं अल्कोहोल बनतं आणि काही माधुर्य राहात नाही. मीडियम म्हणजे निम्न गोड. डिझर्ट वाइनमध्ये रसातल्या सगळ्या साखरेचं अल्कोहोल न झाल्याने ही चवीला गोड लागते. वाइनचा घोट घेतल्यावर तो सरळ न गिळता, त्याने आधी चक्क चूळ भरली जाते. असं केल्याने त्याची खरी चव कळते. एक्स्पर्टसारखी वाइन कशी टेस्ट करावी, हे पुढच्या सदरात..

गौरी खेर

मराठीतील सर्व फाइन डाइन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to choose right wine