कुठल्या प्रकारचं जेवण कसं घ्यावं? कटलरी कुठली, कशी वापरावी? चांगला होस्ट किंवा गेस्ट बनण्यासाठीचे डायनिंग एटीकेट शिकवणारे सदर. आजच्या लेखात टेबलावर ठेवायच्या टेबलक्लॉथ, नॅककिन आदी साधनांविषयी..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लिननवेअर म्हणजे डायिनग टेबलवर वापरल्या जाणाऱ्या कापडाच्या वस्तू. उदाहरणार्थ टेबलक्लॉथ, नॅपकिन आणि रनर्स. लिनन हे अळशी जातीच्या (ऋ’ं७) वनस्पतीपासून केलेले कापड. आपल्याकडे जसे पारंपरिकरीत्या कापसापासून सूत कातले जायचे, तसे युरोपमध्ये लिनन. आज हॉटेलीयिरगच्या भाषेत लिनन म्हणजे खोलीत किंवा डायिनग रूममध्ये वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही कापडाच्या वस्तू – सुती, सिंथेटिक किंवा खुद्द लिननसुद्धा!

फाइन डाइनमध्ये जास्त करून लिनन किंवा उच्च प्रतीच्या कॉटनचा वापर होतो. टेबलक्लॉथ बहुधा कॉटनचाच असतो. त्यातूनही ‘दमास्क’ या दर्जेदार व्हरायटीचं कॉटन असेल तर फारच उत्तम. दमास्क कापड सेल्फ डिझाइनचे असते. आपल्याकडे साधारणत: गुलाब किंवा द्राक्षांच्या घोसाच्या सेल्फ डिझाइनचे दमास्क पूर्वी खूप पॉप्युलर होते. आता अनेक डिझाइन्स मिळतात. टेबलक्लॉथचा रंग सहसा सफेदच किंवा सौम्य रंगाचा (पेस्टल शेड्स) असतो.

नॅपकिन लिनन किंवा कॉटनचा असू शकतो. कॉटनचा फायदा हा, की ओले पटकन शोषले जाते आणि त्याच्या फोल्ड्स पण नीट होतात. हलकी कांजी केलेल्या कॉटनच्या नॅपकिनच्या विविध फोल्ड्स सुंदर दिसतातही आणि आपोआप पटकन उघडतही नाहीत. साधारणत: दुपारच्या जेवणासाठी टेबलफोल्ड्स (कटलरीच्या मधोमध टेबलवर ठेवलेला नॅपकिन) असतात आणि रात्रीच्या जेवणासाठी ग्लासफोल्ड्स (ग्लासमध्ये घडय़ा घालून ठेवलेला नॅपकिन) असतात. घडय़ा करायच्या नसतील तर साधी गुंडाळी करून नॅपकिन एका िरगमध्येही सरकवून ठेवू शकतो. आपले बोधचिन्ह किंवा इनिशियल्सचे भरतकाम असलेले नॅपकिनपण करून मिळतात. काही नॅपकिन्सना हाताने तयार केलेल्या लेसची किनार असते. बहुधा नॅपकिन्सचा रंग सफेदच असतो पण काही वेळा नॅपकिन क्रॉकरीला मॅचिंग असतात. नाही तर कॉन्ट्रास्ट असतात.

रनर्स हे टेबलाच्या मधोमध अंथरलेलं लांबलचक कापड. हे टेबलाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत असते. हे टेबलवरच्या सर्व वस्तूंची शोभा वाढवते. रनर्सचा रंग नॅपकिनला मॅचिंग असू शकतो. रनरच्या मध्यभागी शोभिवंत फुलांचा गुच्छ (सेंटरपीस) ठेवला जातो.

फ्रिल – टेबलाचे पाय दिसू नये म्हणून टेबलाभोवती लावलेली झालर. ही झालर सहसा सॅटिनची असते.
डॉयली – हे कापडाचे अथवा संपूर्ण लेसचे गोल असतात. डॉयलीचा उपयोग अंडरप्लेट किंवा सॉसरवर ठेवायला होतो. कप आणि बशीच्या मध्ये किंवा सूप बोल आणि त्या खालच्या बशीमध्ये डॉयली ठेवली की आवाज होत नाही. आजकाल कागदाच्या सुंदर डॉयली मिळतात ज्या ‘यूज अँड थ्रो’ प्रकारच्या असतात. म्हणूनच कापडाच्या डॉयली हल्ली क्वचितच वापरतात.