गेल्या आठवडय़ापासून आपण ब्रेकफस्टबद्दल जाणून घेतोय. काँटिनेंटल, अमेरिकन आणि इंग्लिश हे ब्रेकफास्टचे प्रमुख प्रकार. त्यातला काँटिनेंटल ब्रेकफास्ट म्हणजे काय ते पाहिल्यानंतर आता अमेरिकन ब्रेकफस्टकडे वळू या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतासारख्या छोटय़ा देशात नाश्त्यात एवढी विविधता आहे तर अमेरिकेसारख्या, आपल्या देशापेक्षा जवळ जवळ तिप्पट मोठय़ा असलेल्या देशात, पण विविधता येणारच. तर अमेरिकन ब्रेकफस्टमध्ये काय काय असतं ते पाहू या.

ऑरेंज ज्यूस, फ्राइड एग्स (बरेचदा ‘सनी साइड अप’ म्हणजे आपल्या भारतीयांसाठी ‘सिंगल फ्राय’) विथ सॉसेज/ बेकन, टोस्ट आणि कॉफी (सहसा कोरीच आणि नाही तर क्रीमसोबत) हा सर्वसाधारणत: हॉट अमेरिकन ब्रेकफस्ट मानला जातो. कॉर्नफ्लेक्स, व्हीटफ्लेक्स, ग्रॅनोला (म्युसलीचाच एक प्रकार) आणि इतर सीरिअल्स विथ कोल्ड मिल्क, हा झाला कोल्ड ब्रेकफस्ट. आज अमेरिकेत प्रचंड प्रमाणात नानाविध प्रकारची सीरिअल्स (cereals) मिळतात आणि हीच  सीरिअल्स आज त्यांचा मुख्य नाश्ता झाला आहे.

पण प्रांतीय पदार्थाचीही अमेरिकन नाश्त्यावर छाप आहे. अमेरिकेच्या पूर्व-उत्तरी भागात ब्रेकफस्टसाठी डोनट, मफिन्स असतात. (मफिन्स म्हणजे कपकेक्सचा मोठा भाऊ! यात निरनिराळे फ्लेवर्स असतात. ब्रेकफस्टसाठी ब्लूबेरी मफिन्सची पसंती जास्त आहे.) किंवा बेगल् (bagel), हा ज्युईश ब्रेडचा एक प्रकार, खाल्ला जातो. दिसायला डोनटसारखा पण तळलेला नसतो, तर बेक्ड असतो. बेगल्स सोबत क्रीम चीज खातात. याशिवाय पॅनकेक्स (pancakes म्हणजे मैद्याची धिरडी) विथ मेपल सिरप (किंवा मध), वॉफल्स(waffls)  धिरडी पीठ चौकडय़ा असलेल्या साच्यात भाजलं जातं आणि ते बटर आणि मधाबरोबर खाल्ले जातात) हे ‘क्लासिक अमेरिकन ब्रेकफस्ट’मध्ये गणले जातात.

दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये कॉर्न ग्रिट्स (मक्याची घट्टसर लापशी), बिस्किट्स विथ ग्रेवी (ही बिस्किट्स आपल्याकडे मिळणाऱ्या कडक बिस्किटसारखी नसून मऊसर, खुसखुशीत असतात आणि ग्रेवी व्हाइट सॉससारखी असते ज्यात बेकनचे तुकडे असतात.) शेतात कामाला जायच्या आधी भरपूर खाऊन जायच्या उद्देशाने हा नाश्ता खाल्ला जायचा. कॅलिफोर्निया भागात हेल्थ कॉन्शस ब्रेकफस्टला प्राधान्य दिलं जात. ग्रॅनोला, योगर्ट (दही), फळ आणि दूध (तेही स्कीम्ड!) पॉप्युलर आहे.

ब्रेकफस्टचंच काय, अमेरिकनांचं पूर्ण दिवसाचं पेय, कॉफी आहे. कॉफीचेही विविध प्रकार मिळतात. डीकॅफिनेटेड कॉफीचा खप सर्वात जास्त अमेरिकेतच आहे!

मराठीतील सर्व फाइन डाइन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Things to know about american breakfast