कॉलेजचा पहिला दिवस महत्त्वाचा. कारण फर्स्ट इम्प्रेशन लास्ट्स. ट्रेण्डी तरीही कॉलेजच्या ड्रेसकोडमध्ये बसणारं स्टायलिंग कसं असावं?
कॉलेजच्या पहिल्या दिवशी सगळ्यांनाच अप टू डेट राहायचं असतं. फर्स्ट इम्प्रेशनचं महत्त्व आहेच ना.. त्यामुळे ते उत्तम असावं यासाठी प्रयत्न करायलाच हवा. अगदी पार्टीला आल्यासारखं नटून-सजून जायची आवश्यकता नाही, पण नीटनेटके आणि ट्रेण्डी कपडे, मोजक्या अ‍ॅक्सेसरीज हव्यातच.
कॉलेज सुरू होण्याचा आणि पावसाने जोर धरण्याचा मुहूर्त एकदमच लागतो. त्यामुळे या पावसाशी आधी जुळवून घ्यावं लागतं. त्याच्या मूडनुसारच गेटअप करावा लागतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे कपडे घालू ते आपल्याला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. म्हणजे बुटक्या व तब्येतीने हेल्दी असणाऱ्या मुलींनी आडव्या व जाडय़ा रेषांवाले टॉप बिलकूल घालू नयेत. याउलट अंगकाठीने बारीक आणि उंच असणाऱ्या मुलींने उभ्या आणि बारीक रेषांचे टॉप्स घालू नयेत. गोरा वर्ण असणाऱ्या मुलींनी लाल- निळा -हिरवा असे गडद रंग वापरावेत. त्यामुळे त्यांचा लुक चारचौघींमध्ये अजून उठून दिसेल. सावळा वर्ण असणाऱ्या मुला-मुलींनी क्रीम, सफेद, पिवळा किंवा पेस्टल शेड्स वापराव्यात. फूटवेअरच्या बाबतीत हा नियम अगदी अवश्य पाळावा. ट्रेण्डी दिसतं म्हणून हाय हिल्स घातल्या आणि सवय नसेल तर पहिल्या दिवशीच पाय दुखतील आणि ती वेदना चेहऱ्यावर दिसेल. अवघडलेपण जाणवेल.
अनेक कॉलेजमध्ये ड्रेस कोड असतो. शॉर्ट्स किंवा आखूड पँट्स स्कर्ट्सना परवानगी नसते. कॉलेजचे नियम माहिती करून घ्या आणि मगच पहिल्या दिवशीचा ड्रेस निवडा. लाँग टाइट फिटेड टँक टॉपवर तुमचा आवडता क्रॉप टॉप घालता येईल. (कॉलेजच्या ड्रेसकोडमध्ये बसणारं असेल तर) तुम्ही क्रॉप टॉप सोबत केप्रीज घालून बघायलाही काही हरकत नाही. शिवाय पावसाळ्यात नेहमीच चलतीत असलेले स्कर्ट्स ट्राय करू शकता. ते इन फॅशन दिसेल आणि सुंदरदेखील. जम्पसूट पावसाळयासाठी चांगला ऑप्शन ठरेल. काही मुली नेहमीच जीन्स प्रीफर करतात. त्यांनी कुठल्याही गडद रंगाची जीन्स घालून (उदाहरणार्थ क्लासिक ब्लू, त्यावर कट वर्क किंवा पैच वर्क असेल तर आणखी उत्तम) त्यावर कुर्ती, टी टॉप्स, बलून टॉप, शर्ट, टी-शर्ट काहीही घालू शकता आणि एक हटके लुक म्हणून स्कार्फचा वापर करू शकता. वेगवेगळ्या प्रकारे स्कार्फ ड्रेप करून आपण आपल्या लुकमध्ये एक चेंज आणू शकतो.
अ‍ॅक्सेसरीज वापरल्याने लुकला एक उठाव येतो. पण त्याचा अतिरेक नसावा. कॉलेज गोइंग गर्ल्ससाठी सिल्वर अँकलेट्स, वाटल्यास एखादं फंकी ब्रेसलेट, ब्राइट कॉटनचे स्कार्फ (जे आपण हेडगिअर म्हणून देखील वापरू शकतो) स्टाइलीश बॅग, इअरकफ्स, ग्लेअर्स एवढय़ा अक्सेसरीज खूप झाल्या. त्याचबरोबर तुम्हाला सूट होणारी हेअरस्टाइल. अ‍ॅण्ड देन यू आर रेडी टू गो टू द कॉलेज!
viva.loksatta@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा