‘मॉडेल म्हणून कारकीर्द सुरू केल्याने मला आपली मानसिक शांतता किती आणि कशी महत्त्वाची आहे, याची पुरेपूर जाणीव आहे. व्यायामाने शरीराची काळजी कशी घ्यावी आणि याचा आपल्या कारकिर्दीसाठी कसा उपयोग होतो याचीही कल्पना मला करिअरच्या सुरुवातीलाच आली होती. तेव्हा जे माझ्या मनात रुजले ते मला कायम उपयोगी पडले. आपल्या मनाची आणि शरिराची काळजी ही पहिली प्रायोरिटी असंच मी नेहमी स्वतला बजावत आलेय’, बिपाशा मनमोकळेपणानं बोलत होती.
आपल्या शरीराची काळजी हा व्यक्तिगत गरजेचा भाग मानला पाहिजे, असं बिपाशाचं मत आहे. ‘सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी असे दोन वेळा आपण दात घासतो, तसाच दिवसातून किमान एक तास आपण स्वत:साठी वेळ काढावाच आणि त्यात व्यायाम व योगा करावं, असं मला वाटतं’, ती सांगते. ‘ स्वत:वर प्रेम करायला शिकलं पाहिजे, म्हणजे मग हे सगळंच व्यवस्थित होतं. मी, माझं, मला, माझ्यासाठी ही भावना मनात घट्ट रुजवायला हवी. म्हणजे बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. शेवटी सगळं काही आपल्या चांगल्या तब्येतीवरच तर अवलंबून असतं ना!’- इति बिपाशा.
व्यायामाला वेळ नाही, अशी अनेकींची तक्रार असते. पण स्वतसाठी वेळ काढणं, स्वतवर प्रेम करणं कसं आवश्यक आहे, हे सांगताना बिपाशा सांगते, ‘व्यायामामुळे शरिराबरोबर मनही प्रसन्न राहतं, चेहरा छान खुलतो, तो फ्रेशनेस दिवसभर टिकतो. शरीर प्रमाणबद्ध राहिल्यामुळे तुम्हाला सर्व प्रकारची वस्त्रं शोभून दिसतात, तुम्ही आकर्षक राहता, त्यातूनच तुमचा आत्मविश्वास वाढता राहतो.. असं सगळं एकावर एक अवलंबून आहे.. आणि मी तर अशा क्षेत्रात आहे, जिथे ‘आकर्षक दिसणं’ ही पहिली गरज असते.’
छान दिसायचंय? .. स्वत:वर प्रेम करा बिपाशा बसूचा फिटनेस फंडा
‘फिटनेस फ्रीक’ अभिनेत्री बिपाशा बासूने व्यायामाचं महत्त्व पटवून देणारे काही व्हिडिओज प्रसिद्ध केले. सोशल नेटवर्किंग साईटवर ते हिट आहेत. तिच्या ‘रुटीन एक्सरसाईज’च्या डीव्हीडीदेखील लोकप्रिय आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 31-10-2014 at 01:20 IST
TOPICSबिपाशा बासू
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fitness mantras of bipasha basu