हॅलो अनमोल, तू सध्या काय करतोस? म्हणजे शिकतो आहेस की जॉब वगैरे? तुझ्या वजनामुळे, अॅपियरन्समुळे तुला तुझ्या रोजच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स येतात का? कुणाकडून हिणवलं जातं का?
तू लिहिलं आहेस की व्यायाम करताना एखादा हीरो डोळ्यासमोर येतो. अगदी खरं आहे ते. मिडीयानं आपल्या आयुष्यात इतकी ढवळाढवळ केली आहे की कुठल्याही गोष्टीचं स्टँडर्ड म्हणून आपल्या डोळ्यांसमोर पहिल्यांदा एखादा हीरो किंवा हिरॉइनच येतात. त्यांची पिळदार, कमनीय शरीरयष्टी, चमकदार केस, फेश दिसणारी स्क्रीन, सगळंच भयंकर अॅट्रॅक्टिव्ह वाटतं. पण मिडीयामध्ये दिसणारे हे पूर्णपुरुष हाताच्या बोटावर मोजण्याइतके असतात. तुझ्या आजुबाजूला पाहिलंस तर वेगवेगळ्या आकारमानाची माणसं दिसतील. एकजण दुसऱ्यासारखा नसतो. इन फॅक्ट, ही व्हरायटी फार वैशिष्टय़पूर्ण आणि युनिक असते. नाहीतर सगळेच फॅक्टरीतून निघणाऱ्या रोबोजसारखे दिसले असते.
तुझं वजन का कमी आहे हेही आपल्याला पाहायला हवं. तुझी उंची किती आहे? तुझ्या आईवडिलांचं वजन कसं आहे, नॉर्मल की कमी? तुला इतर कोणता आजार आहे का? वजन का वाढत नाही हे शोधण्यासाठी एखाद्या डॉक्टरची मदत घ्यायला हरकत नाही.
तुझ्या पत्रावरून दिसतंय की तू वजन वाढवण्यासाठी फार सिरीयसली व्यायाम अजून केलेला नाहीस, तो सुरू करण्याआधीच तू खचतोस. सिनेमातल्या हीरोंचं काम काय असतं, तर चांगलं दिसणं. त्यासाठी त्यांना पैसे मिळत असतात, तो जॉब आहे त्यांचा. तुला वजन कशासाठी वाढवायचंय, तर हेल्दी आणि फिट राहाण्यासाठी. सध्या तू तितकंच एम ठेव. मी तर तुला सांगेन की तू दंड किती वाढले, वजन किती वाढलं हे रोज रोज बघत बसू नको. त्यानं फस्ट्रेशन येण्याची शक्यता जास्त. फक्त तुझ्या दोषांवर कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा तुझ्यातल्या चांगल्या गोष्टी काय आहेत याचा आढावा घेतलास तर तुला स्वत:विषयी जो कमीपणा वाटायला लागला आहे तो नक्कीच सुधारेल. तू आपोआप आत्मविश्वासानं वावरायला लागशील.
सगळे प्रयत्न करूनही कदाचित तुझी शरीरयष्टी बारीकच राहू शकेल हे स्वीकारून प्रयत्न केलेस तर रिझल्टसचं टेन्शन न घेता व्यायाम करण्याचा तुला उत्साह येईल.
‘Success comes before work only in the dictionary’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा