डाएट, वेट लॉस, काय खावं, काय टाळावं याबाबत आता सगळीकडून माहितीचा पूर वाहतोय. पण घोडं अडतं, ते प्रत्यक्ष आचरणात आणताना!
आता गौरीताई बारीक कशी होणार? चांगलंच वजन वाढवलंय तिचं. बाळ झाल्यानंतर २० किलोने जास्त झालीय! त्यात सुबक ठेंगणी म्हणत म्हणत चांगलंच गलबत दिसतंय तिचं. बाळ मात्र छान गुटगुटीत आहे. पण आता गौरीताई बारीक होणारच नाही, पूर्वीसारखी? माझे एक नाही अनेक प्रश्न होते. या सर्व प्रश्नांवर आई एकच उत्तर द्यायची – जरा थांब. विचार कर – सगळी उत्तरं कळतील तुला.
गौरीताई एकदम मोठी दिसायला लागली होती. नेहमीप्रमाणे तिच्या घरी बाळंतशोपा, िडकाचे लाडू, मेथीचे लाडू, अळिवाचे लाडू सर्व काही नातेवाईकांनी भरभरून आणलं. गौरीताईने पहिल्या महिन्यात सर्वाचा मान राखला. प्रत्येक गोष्ट प्रमाणात खाल्ली. प्रत्येक तीन तासाला ती खात होती. कुठलाही नवीन पदार्थ खाल्ल्यानंतर ती बाळाची शी तपासायची अर्थात हे गणित किंवा शास्त्र मला समजलं नाही. पण एकदा चुकीनं तिने चण्याच्या पिठाचं काही तरी खाल्लं आणि बाळाला जुलाब जास्त झाले तेव्हा ते कोडं मला उलगडलं. ती थंड खातपीत नव्हती, इथपर्यंत ठीक होतं. पण तिने कानात कापूसही घातला होता. बाळाला पाजायला बसायच्या आधी एक ग्लास पाणी किंवा ताक किंवा नारळपाणी कधी लस्सी प्यायची. आईच्या सांगण्यावरून ‘दुधात ८० टक्के पाणी असतं. आया बाळांना पाजतात पण स्वत: मात्र दूध किंवा पाणी घ्यायला विसरतात. खूप दमतात मग..’ आईनं हे दहादा गौरीताईला सांगितलं होतं.
सुकामेवा, दूध – दुधाचे वेगवेगळे पदार्थ, फळ, भाज्या हय़ा सर्व वेळेवर घेणे हे अत्यंत गरजेचे आहे. एवढं सगळं करून द्यायला कुणाची मदत नसेल तर खिचडीमध्येच या भाज्या घालून पौष्टिक खिचडी किंवा दलिया करून खाल्लं तर चांगलं. वेगवेगळे पदार्थ – ठेपले, पराठे खाणे उत्तम. बाळाबरोबर खायला हे सोपे पडतात. आईने बाळंतशोपा, शतावरी हे घ्यायला हरकत नाही. पण बाळाला स्तनपानाखेरीज काहीही न देणं हेच उत्तम आहे. आता हे सर्व ऐकल्यावर आणि गौरीताईच्या बारीक होण्याच्या प्रयत्नांना दाद देत, मी िडकाच्या लाडवातला शेवटचा लाडू तोंडात टाकला. नुसतं खाऊन-पिऊन तर वजन कमी होणार नव्हतं. तब्बल सहा आठवडय़ानंतर गौरीताईने योगासने करायला सुरुवात केली. बारा आठवडय़ांनंतर सूर्यनमस्कार घातले. अर्थात हे सर्व नॉर्मल डिलिवरी होती म्हणून शक्य होतं. पिल्लू सहा महिन्याचं झालं तेव्हापासून कथक क्लास चालू केला आणि माझ्याआधी ती मात्र बारीक झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा