आपल्या शरीराची रचना २०६ हाडांच्या एकात्म रचनेने झालेली असते. सांधे, लिगामेण्ट आणि पाठीचे आजार आणि त्या जोडीला दुर्लक्ष यामुळे मणका आणि सांध्यांवर अतिरिक्त भार येतो. ज्याचे दुष्परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. या आजारांपासून दूर राहण्यासाठी स्वत:ला कायम अॅक्टिव्ह ठेवणं हा उपाय आहे. आधुनिक जीवनशैली आणि त्यातून उद्भवणाऱ्या ताणतणावांमुळे आपण अनेकदा आपल्या आयुष्याला गृहीत धरतो आणि सांधे, हाडं आणि स्नायू इत्यादींकडे दुर्लक्ष करतो. गाडी, ऑफिसमधल्या खुच्र्या आणि एलिव्हेटर्सच्या सर्रास वापरामुळे या गोष्टींच्या वापराला आपण वावच देत नाही.
मानवी शरीराचा सांगाडा बनण्यात हाडांचा मुख्य सहभाग असतो. हाडांमुळे शरीरांतर्गत असणाऱ्या अवयवांचं संरक्षण होतं आणि आपल्याला हालचाल करणं सोपं जातं. जीवनशैलीमुळे हाडांना, त्यांच्या संरचनेला धोको पोहोचत असेल तर हाडांचं संरक्षण करणं आणि हे संभाव्य धोके उद्भवू न देणं, हे आपलं कर्तव्य आहे. हाडं, लिगामेण्ट आणि स्नायू निरोगी आणि बळकट ठेवल्याने सांध्यांना हानी पोहोचू शकत नाही आणि त्यापुढचे दुर्दैवी आजारही टाळता येतात.
हा आजार अनेकांमध्ये आढळतो. यात हाडांचं आकारमान हळूहळू कमी होत जातं आणि ती ठिसूळ बनतात. त्यामुळे ती मोडण्याची शक्यता बळावते. हा आजार स्त्री आणि पुरुष दोघांनाही होत असला तरी तो स्त्रियांमध्ये मोठय़ा प्रमाणावर आढळतो. पाळीच्या सुरुवातीच्या काळात हाडांची इस्ट्रोजिनच्या पातळीत चढउतार होत असल्याने स्त्रियांच्या हाडांची मोठय़ा प्रमाणात झीज होते. त्यामुळे त्यांना ऑस्टिओपोरॉसिस होण्याची शक्यता पुरुषांच्या तुलनेत जास्त असते. हाडं अधिक सच्छिद्र आणि ठिसूळ बनल्याने शरीराच्या सांगाडय़ाची बळकटीही कमी होते.
ऑस्टिओपोरॉसिसवरचे उपचार
ऑस्टिओपोरॉसिस तसेच वयामुळे जडणाऱ्या इतर व्याधी टाळण्याचा राजमार्ग म्हणजे निरोगी जीवनशैली. त्यात भरपूर कॅल्शिअम आणि जीवनसत्त्वंयुक्त आहाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या आजारावरच्या उपचारांमध्ये पुढील घटक विचारात घेणं आवश्यक आहे.
१) आहार, व्यायाम आणि जीवनशैलीत बदल करून हाडांचं आरोग्य सांभाळणं.
२) हाडांची पुढली हानी रोखणं.
३) अपघात होण्याची संभाव्यता टाळणं.
प्रतिबंध
१) ऑस्टिओपोरॉसिस रोखण्याचा महत्त्वाचा मार्ग म्हणजे शरीराला आवश्यक पोषण पुरवणं. आहारात कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, प्रथिनं, जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असावं. हाच ऑस्टिओपोरॉसिस रोखण्याचा तसंच त्यावरचा रामबाण उपाय आहे. आयुष्यभर पुरेसं कॅल्शिअम आणि जीवनयुक्त आहार घेतल्यास हाडं बळकट राहतात.
२) कॅल्शिअमचा उत्तम स्रोत म्हणजे हिरव्या भाज्या, मासे, सुकामेवा, बिया, दूध इत्यादी.  आहारात मुबलक जीवनसत्त्व असावं जे शरीराची कॅल्शिअम शोषून घेण्याची क्षमता वाढवतं तसंच हाडांसाठीही ते उपकारक असतं.
३) प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, अॅण्टासिडचं अतिसेवन, मटण, मद्य, काबरेनेटेड पेयं आणि कॅफिनचं सेवन टाळावं. या पदार्थामुळे आपल्या शरीरातल्या कॅल्शिअमचा नाश होतो.
४) अख्खी धान्यं, डाळी, हिरव्या भाज्या, इतर भाज्या, दूध, सोया आणि सोया मिल्क, सुकामेवा आणि टोफू यांचा आहारातला समावेश वाढवावा. रिफाइण्ड साखर, मदा, चरबी तसंच ट्रान्सफॅट्स असलेले वेफर्स, चिप्स, कुकीज आदींसारख्या पदार्थाचं सेवन टाळावं, कारण त्यांच्या सेवनाने शरीराच्या कॅल्शिअम शोषून घेण्याला आळा बसतो.
५) स्वत:ला अॅक्टिव्ह ठेवा आणि नियमितपणे व्यायाम करा. व्यायामाच्या अभावामुळे कॅल्शिअमचा नाश होतो. योगसाधना किंवा पोहणं, चालणं, सायकिलग, लाइट वेट्स आदींच्या माध्यमातून हा नाश भरून काढता येतो. स्नायूंप्रमाणे हाडं म्हणजे जिवंत ऊती असतात ज्या व्यायामागणिक बळकट बनतात.
६) योगसाधनेत स्ट्रेचिंग, बेंिडग, कìलग घडवणाऱ्या आसनांचा समावेश असतो. हाडांची झीज थांबविण्यासाठी तसंच त्यांची मूळ लवचीकता अबाधित ठेवण्यासाठी योगसाधना अवश्य करावी. सूर्यनमस्कारातले विविध टप्पे तसंच वीरभद्रासन, अर्ध चंद्रासन, पाश्र्वकोनासन, उष्ट्रासन, भुजंगासन यांसारख्या आसनांच्या मदतीने मांडी, नितंब, योनी, गुडघे, मणक्याच्या हाडांना व्यायाम होतो आणि गतिशीलता वाढते. स्नायू बळकट होतात आणि हाडांची झीज होत नाही.
तरुणपणापासूनच हाडांची नीट निगा राखून त्यांना बळकट आणि निरोगी बनवणं हे आपलं कर्तव्य आहे, ज्यामुळे पुढच्या आयुष्यात हाडांची हानी होत नाही.
५्र५ं.’‘२ं३३ं@ॠें्र’.ूे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा