गल्लोगाल्लीतली दुकानं रंगतात रंगीबेरंगी बँड्सने रंगली आहेत. ती फ्रेन्डशिप डे आल्याची वर्दी देताहेत. व्यक्ती व्यक्तीतली मैत्री जपण्याचा हा दिवस. पण व्यक्तीपलिकडचं मैत्र जपणारेही कित्येकजण आपल्याला आसपास दिसतात. नेहमीच्या संकल्पनेच्या बाहेरची मैत्री शोधण्याचा प्रयत्न व्हिवानं या फ्रेंडशिप डेच्या
दोस्त मित्र फ्रेंड. नावं कितीही बदला ह्या नात्यातली मजाच काही और आहे. तुमच्या मत्रीला तुम्ही कोणत्या चौकटीत बांधू शकत नाही. त्याला ना कुठल्या कंडीशन्स असतात, ना कोणती नियमावली. सकाळचा चहा, चहा बरोबर येणारा पेपर, तुम्ही शाळेत कॉलेजात ज्याच्याबरोबर जाता ती बाईक किंवा बस लोकल किंवा अगदी टकाटक ठेवलेली सायकल, तुमच्या आठवणी जपणारी एक छोटीशी डायरी, कौतुकाने पाळलेलं एक कुत्र्याचं पिल्लू, दारावर येणारा भाजीवाला किंवा पोस्टमन, अश्या एक ना अनेक गोष्टी. या सगळ्यांशी आपलं
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सगळ्या मित्र मत्रीणींनी एकत्र येऊन ‘अॅप्रॉच.. हेिल्पग हॅन्ड’ ही संस्था चालू केली. आम्ही ह्या संस्थेकडेच मत्रीचं सेलीब्रेशन म्हणून बघतो. – पायल
मैत्री फक्त दोन व्यक्तींमध्येच असू शकते का ? निसर्ग, प्राणी, पुस्तकं अशा निर्जीव गोष्टींशीही मैत्रीचे बंध जुळतातच ना. मैत्रीचं नातं त्या पलिकडे जाणारंही असू शकतं ना, याच विचारानं थोडा शोध घेतला तेव्हा मैत्रीच्या नात्याचे अनेक पदर दिसायला लागले. कोणाची मत्री प्राण्यांशी ,कोणाची निसर्ग -वृक्षांशी ,कोणाची पुस्तकांशी तर कोणाची आकाशातील ग्रह ताऱ्यांशी. वैयक्तिक मत्री पल्याड जाऊन अनेक जणांनी अशाप्रकारचे वेगळे मित्र जोडले आहेत. अशीच आगळी मत्री जपणाऱ्या काही दोस्तांविषयी..
पुण्यात इकॉलॉजिस्ट असणारी अमृता जोगळेकर म्हणते, माझा मित्र-सह्याद्री आहे. ‘माझ्या वयाच्या १२ व्या दिवसापासून माझी आणि त्याची ओळख झाली.. कोकणात उतरताना! पश्चिम किनारपट्टीला समांतर
निसर्गसुद्धा आपला मित्र कसा असतो हे युथ हॉस्टेल या ट्रेकर्स ग्रुपची मनाली कापरेकर सांगते. मानली सध्या लॉ चा अभ्यास करतेय. पण कोर्ट कचेरीतून ती आपल्या निसर्ग मित्रासाठी हमखास वेळ काढते. मनाली म्हणते, ‘निसर्ग मला माझ्या खूप जवळचा मित्र वाटतो. कधी मूड डाऊन असेल आणि निसर्गाच्या सानिध्यात गेले की मी लग्गेच रिफ्रेश होते. निसर्ग,पशु पक्षी ,समुद्र ,धबधबे ,जंगल,किल्ले यांच्या सौदर्याचा अनुभव घेतांना हरवून जायला होतं. एखाद्या मित्राकडे जायला आमंत्रणाची गरज नसते. तसं निसर्गाशी कनेक्ट व्हायलाही वेळ लागत नाही’. मनालीने विविध किल्ल्यांवर भ्रमंती केली आहे. कळसुबाई शिखरावर प्रचंड वीऱ्याच्या वेगाबरोबर दरीतून वर येणारा पाऊस पाहणं हा तिच्यासाठी चित्तथरारक अनुभव होता. एकदा का निसर्ग सफरीला निघालो की सेल फोन बंद ठेवून फक्त निसर्ग मित्राशी संवाद साधणं हा मनालीचा कटाक्ष असतो. कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता निसर्ग एखाद्या मित्राप्रमाणे भरभरून देत असतो त्यामुळे
प्राणी माणसांचे चांगले मित्र असतात.माणसांकडेही नाही एवढी विश्वासार्हता प्राण्यांपाशी असते. – मानसी
इंजिनियरींगचा अभ्यास करणारी पायल मुजुमदार मैत्रीची एक वेगळी कथा सांगते. पायल आणि तिच्या मित्रांचा पुण्यात एक ग्रूप आहे. त्याबद्दल सांगताना पायल म्हणाली, ‘आपण ज्या समाजात एकत्र राहतो. त्या समाजाकडे वेगळ्या नजरेतून पाहण्याचं आम्ही ठरवलं. त्यातूनच मग २००७ साली म्हणजे माझ्या दहावी अकरावीत सगळ्या मित्र मत्रीणींनी एकत्र येऊन ‘अॅप्रॉच.. हेिल्पग हॅन्ड’ ही संस्था चालू केली. आपण जल्लोषात साजरा करतो त्या वाढदिवसाच्या खर्चातून संस्थेच्या उभारणीसाठी रक्कम गोळा केली. आम्ही पुण्यात सुमारे २० वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. ज्यात रक्तदानापासून ते कुष्टरोग्यांना मदत करण्यापर्यत वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आमचं काम खूप मोठं नाही पण ते करताना मिळणारा आनंद खूप चांगला असतो. आत्तापर्यत इंजिनियरिंग पूर्ण करता करता ह्या उपक्रमात अनेक नवे मित्र जोडले गेले आहेत. आम्ही ह्या संस्थेकडेच मत्रीचं सेलीब्रेशन म्हणून बघतो. ज्यात आम्ही आमच्याच आयुष्यातला एक दिवस समाजाकरता सेलीब्रेट करतो आणि मत्रीच्या नव्या आठवणीही गोळा करतो.’
आपल्या सभोवतालच्या व्यक्तींसोबत आपली फ्रेन्डशिप होतेच. पण या पृथ्वीपासून लाखो करोडो मल दूर असलेल्या ग्रह ताऱ्यांशीही मत्र जोडता येतं. ‘आकाशाशी जडले नाते’, असं म्हणत ग्रह ताऱ्यांशी मत्री करणाऱ्या आकाशमित्र’ संस्थेतील अमेय देशपांडे या विद्यार्थ्यांने खगोलशास्त्राशी मत्री केली आहे. खगोलशास्त्राच्या आवडीविषयी सांगतांना तो म्हणाला, ‘मी सातवी- आठवीत असल्यापासून आकाशमित्र या संस्थेत जातो. आमच्या हेमंत मोने सरांच्या मार्गदर्शनाखाली दर रविवारी न चुकता मी आणि माझे इतर आकाशमित्र एकत्र जमून अॅस्ट्रॉनॉमी संदर्भातल्या विविध विषयांवर चर्चा करतो.’ आकाशातल्या ग्रह ताऱ्यांशी इतर विद्यार्थ्यांनीही मत्री करावी यासाठी अमेयही स्वत: अभ्यासवर्ग घेतो. त्याचप्रमाणे विविध लेख लिहितो. आकाशदर्शनाच्या वेळी सगळ्याच ग्रहांना टेलिस्कोपमधून पाहणे हा अमेयासाठी एक आनंददायी अनुभव असतो. तो म्हणतो, ‘आकाशदर्शनामुळे प्रत्यक्ष ताऱ्यांच्या जवळ जाऊन या मित्रांशी एक प्रकारचा संवाद साधल्यासारखा वाटतो. प्रत्येक जण बेस्ट फ्रेंड साठी वेळ राखीव ठेवतो त्याप्रमाणे मी पण माझ्या इंजिनिअरींगच्या अभ्यासातून वेळ काढून माझी ही आवड जोपासत आहे. आमच्या संस्थेच्या उपक्रमांमुळे अनेक शालेय तसेच महाविद्यालयीन मुलं संस्थेशी जोडली जाऊन खऱ्या अर्थाने माझा मित्रपरिवारही वाढतो आहे.’ अधिकाधिक मुलांनी खगोलशास्त्रातील गोडी वाढवून ग्रह ताऱ्यांशी मत्री करावी असं अमेयला वाटतं.
यश पाटस्कर हा पुण्यातला एक प्राणीमित्र आहे. तो म्हणतो, ‘आपण आपल्या सोयीनं एखादा भाग राहण्यासाठी साफ करतो, तेव्हा तिथलं पर्यावरण एकप्रकारे डिस्टर्ब होत असतं. या पर्यावरणावर आपण केलेलं ते अतिक्रमणच म्हणावं लागेल. त्यामुळे ज्यांचं हे मूळ घरटं होतं, अशा नाग, साप, पक्षी या जिवांकरता आपल्या अतीक्रमणाने खूप मोठा धोक निर्माण झाला आहे. या प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी सोडण्याचा प्रयत्न मी आणि माझा मित्र संकेत सुमंत करतो. आजपर्यत आम्ही अनेक साप आणि नाग वाचवण्यात यशस्वी झालो आहोत. माझ्याकडे अनेक फोन योतात फक्षी जखमी झाला आहे. पिल्लू घरट्यातून पडलं आहे. अशा पक्ष्यांचं संगोपन करण्याचा प्रयत्नही आम्ही करतो. आतासुध्दा माझ्याकडे एक जखमी कावळा आहे. मी आणि माझा मित्र आम्ही दोघही ठरवून या कामासाठी वेळ काढतो.’
मानसी आमडेकर या प्राणीमित्र – खरं तर प्राणीमत्रिणीला लहानपणी प्राण्यांची खूप भीती वाटायची . हे वाचून आश्चर्य वाटलं खर. पण आता कुत्रे,मांजरी ,साप ,उंदीर ,घुबड ,विविध पक्षी ,कोंबड्या ,फुलपाखर ,खारुताई हे प्राणी म्हणजे तिच्या घरातलेच सदस्य झालेत!! मानसशास्त्रातून एम.ए. करणाऱ्या मानसीला प्राण्यांचीही सायकॉलॉजी चांगलीच कळते. प्राणी माणसांचे चांगले मित्र असतात.माणसांकडेही नाही एवढी विश्वासार्हता प्राण्यांपाशी असते, असा मानसीचा अनुभव आहे. प्राण्यांविषयीची एक खास आठवण सांगतांना मानसी म्हणाली, ‘मी एकदा खूप अपसेट होते. जेव्हा मी घरी आले तेव्हा एरवी मस्ती करणारया माझ्या माऊनं मला त्रास दिला नाही. कारण मी अपसेट आहे हे तिने बरोबर ओळखलं आणि शांतपणे माझ्यासमोर येउन ’म्याव’ केलं. ते म्याव ऐकताना मला ती’काय झालं?’ असं विचारल्यासारखंच वाटलं. एखाद्या मित्राला मनातलं जसं काहीही न सांगता कळतं त्याप्रमाणे मानसीच्या मनीमाऊ मत्रिणीलाही ते जाणवलं. मानसीने अनेक साप देखील पकडले आहेत. चुकून घरात, मानवी वस्तीत आलेला साप ती पकडून निसर्गात पुन्हा सोडून देते. मानसी म्हणते , ‘जोपर्यंत आपण प्राण्यांना त्रास देत नाही तोपर्यंत तेही आपल्याला कोणतीही इजा करत नाहीत.प्राण्यांची काळजी घ्या, त्याचं संरक्षण करा. त्यांच्यासोबत मत्री वाढवली तर त्या मैत्रीतून नक्कीच एक वेगळं समाधान मिळेल. माझ्या अनुभवावरून सांगते.’
आगळ्या मैत्रीसाठी
या फ्रेन्डशिपडेला असं काही वेगळं मैत्र जोडावंसं वाटलं तर या संस्था मदत करू शकतात.
आस्था संस्था : रुईया महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येउन एन एस एस च्या माध्यमातून आस्था ची स्थापना २०१० मध्ये केली. ही संस्था आदिवासी पाड्यावर काम करते . अनेक विद्यार्थी मित्रांची त्यांना या उपक्रमात गरज आहे . संपर्क -उमेश तरे -९८७००७२९९५
अॅप्रोच हेल्पिंग हँड – रक्तदानापासून कुष्ठरोग्यांना मदत करण्यापर्यंत अनेक उपक्रम करणारी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी स्थापन केलेली संस्था.
संपर्क : https://www.facebook.com/ApproachHelpingHands
रानवाटा : दुर्ग मत्री म्हणजे काय हे अनुभवायचं असल्यास तुम्ही रानवाटा या संस्थेशी मत्री करू शकता .ही संस्था किल्ले संवर्धनाच कार्य करते .
संपर्क – http://www.raanvata.com
याशिवाय विविध कॉलेजमध्ये ‘एन एस एस’ युनिट असतात. त्यांच्या माध्यमातून तुम्ही अंध विद्यार्थ्यांसाठी काम करू शकता. त्यांना पुस्तक वाचून दाखवणं, त्यांच्या परीक्षेसाठी राईटर म्हणून जाणे या गोष्टी या स्पेशल मित्रांसाठी करू शकता .
फ्रेन्डशिपडे जवळ येतोच आहे तर या दिवशी सेलिब्रेशनचे प्लॅन आपण सगळेच करतो किवा तुम्ही एव्हाना केलेही असतील; पण हे सगळ करत असतांना समाजात अशीही की स्पेशली चालेन्ज मुलं आहेत की ज्यांना आपण या सेलेब्रेशन मध्ये सामावून घ्यायल हवं . अशा मुलांशी मत्री करणारी एक मत्रीण म्हणजे अनुजा जोशी. मतीमंद मुलांसाठी काम करणाऱ्या अमेय पालक संघटनेशी अनुजाने मत्री केली आहे. ही संघटना खोणी येथे असून ठाण्यातील अविनाश बर्वे यांनी या संस्थेची स्थापना केली आहे. अनुजा जे जे कॉलेज ची विद्याíथनी आहे.पण तिच्या क्षेत्रापेक्षा काहीतरी वेगळ काम ती या मुलांसाठी करतेय़ याविषयी बोलतांना ती म्हणाली, ‘गेली चार वर्ष मी या संघटनेशी जोडली आहे. इथल्या मुलांसोबत वेळ घालवायला, त्यांच्याशी गप्पा मारायला मला खूप आवडतं. आपल्याला कोणीतरी भेटायला आल्यावर त्या मुलांना होणारा आनंद पाहतांना एक वेगळं समाधान मला मिळतं . समाजात अशा बऱ्याच संस्था आहेत आणि अनुजासारख्या मित्र मत्रिणीची त्यांना गरज आहे.