आपल्या स्किनची काळजी आपण नेहमीच घेत असतो. पण दसरा, दिवाळी यासारख्या नवीन कपडे घालून मिरवायची संधी देणाऱ्या फेस्टिवलमध्ये आपण जास्त जागरूक होतो. आपल्याच नजरेत आपण स्वतला निरखायला सुरुवात करतो. तेव्हा कधीतरी असं वाटतं की, अरे बापरे आपण सुटलोय, जाडं झालोय, आपली स्किन काळवंडलीय ! .. आणि मग ब्युटी पार्लरकडे किंवा स्किन स्पेशालिस्टकडे आपले पाय वळतात. सगळ्याच मुलींना या फेस्टिवल सीझनमध्ये एकदम सुंदर दिसायचं असतं. त्यामुळे कुठल्या ड्रेसवर काय ज्वेलरी घालायची इथपासून तयारीला सुरुवात असते. सध्या बॅकलेस ड्रेस, चनिया-चोली, अशी फॅशन आल्यामुळे मग फक्त चेहरा सुंदर दिसून भागत नाही. पाठसुद्धा चांगलीच दिसली पाहिजे. मग स्पेशल ट्रीटमेंट्स घेतल्या जातात. मुंबईतल्या काही स्किन क्लिनिक आणि त्वचारोगतज्ज्ञांकडे चौकशी केली असता या सीझनमध्ये बॅक पॉलििशग, आर्टिफिशिअल टॅटूज, स्किन व्हाइटिनग यासारख्या ट्रीटमेंट्सना खास डिमांड असलेली दिसून आली.
नितळ आणि तेजस्वी चेहरा हे प्रत्येक मुलीचं स्वप्नं असतं. त्यासाठी वेगवेगळ्या क्रीम्सचा उपयोग केला जातो. चेहऱ्याबरोबरच हाताची स्किन, पाठीची स्किन, पाय याकडेही विशेष लक्ष देण्याची गरज जाणवते. त्यामुळेच या सीझनमध्ये बॅक पॉलिशिंगबरोबरच हँड पॉलिशिंग, पेडिक्युअर ट्रीटमेंट करून घेण्याकडे तरुणींचा कल आहे, असं सौंदर्यतज्ज्ञांनी सांगितलं. बॅक पॉलिशिंग म्हणजे पाठीची स्किन स्मूथ आणि शायनी होण्यासाठीची ट्रीटमेंट असते. पाठीवर असणारे चट्टे, खुणा, उन्हामुळे आलेला काळपटपणा, ब्लॅक हेड्स, पिंपल्स हे जाण्यासाठी मिड-लाइट लेसर ट्रीटमेंट दिली जाते. ‘बॅक पॉलििशगमध्ये ठरावीक प्रॉडक्ट वापरून ड्राय लेयर दूर केला जातो. अगदी लवकरात-लवकर आपला चेहरा ‘फेस्टिवल-रेडी’ करण्यासाठी हायड्रा फेशिअल हा उपाय सुचवला जातो. जंक फूड, हेवी मेक-अप आणि झोपेत असणारा अनियमितपणा यामुळे चेहऱ्यावर होणारे परिणाम टाळण्यासाठी या फेशिअलचा वापर केला जातो, असं डरमॅटॉलॉजिस्ट डॉ. गीता ओबेरॉय यांनी सांगितलं. याच तीन ट्रीटमेंट्ससाठी मुली या सीझनमध्ये येतात, असंही त्या म्हणाल्या. सध्या फळांच्या सालाद्वारे दिली जाणारी फेशिअल्स आणि त्वचेचा कोरडेपणा घालवण्यासाठी ऑक्सिजन ट्रीटमेंटचा वापर वाढला आहे. सध्या बॅक पॉलिशिंगमध्ये अॅल्युमिनियम क्रिस्टल्सचा वापर केला जातो, असे त्यांनी सांगितले.
सध्या सगळ्यात जास्त क्रेझ आहे टॅटूज्ची. पण शरीरावर कायमचं काही चितारून घेण्याऐवजी टेम्पररी टॅटू करून घेण्याला मुली हल्ली प्राधान्य देत आहेत. नेहमी काळा, लाल, निळा, हिरवा, ग्रे, पांढरा अशा रंगाचा वापर केला जातो. परंतु टेम्पररी टॅटूसाठी काळा, निळा, हिरवा, ग्रे अशा रंगाचा वापर होतो. सगळ्यात सोईस्कर म्हणून निळी आणि काळी इंक एक्सपर्ट सुचवितात. काही वेळा टेम्पररी टॅटूज् कालावधीनुसार पुसट होत जातात. पांढऱ्या रंगाची इंक कधीच टेम्पररी टॅटूसाठी वापरली जात नाही. टॅटू रिमूव्हलमध्ये कोणत्या रंगाची इंक वापरली आहे यावरून रिमूव्हलसाठी कोणती ट्रीटमेंट करायची हे ठरवलं जातं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा