नवरात्रीला घागरा-चोलीचा विषय येणार नाही, असं होणंच अशक्य. गरबा, दांडियाला घागरा हवाच. नऊ दिवसांतला मनातला उत्साह, बेधुंदपणा पेहरावातून अर्थात घागऱ्यातूनही दिसतो. म्हणूनच तो घेरदार घागरा सप्तरंगांत रंगून गेलेला असतो. हजार रुपयांपासून ते लाखभर रुपयांपर्यंत किमतीच्या या घागऱ्याचं मूल्य नक्की शोधायचं कशात?.. घागऱ्यावरच्या कारागिरीची चित्तरकथा.
लेखाचं शीर्षक वाचून माधुरीचं ते नृत्य आणि तिच्याबरोबर गिरकी घेणारा तिचा चंदेरी सिक्वेन्सचा घागरा आला ना लगेच नजरेसमोर? घागऱ्याची महती इतकी आहे की,भारतीय पेहरावाबद्दल विषय निघाला की, घागऱ्याचा समावेश होणार नाही हे मुळातच अशक्य. लग्न, सण-समारंभ आणि पार्टीमध्ये साडीनंतर घागरा-चोलीला समस्त स्त्रीवर्गाची पसंती असते. तसा मुळात घागरा-चोली हा प्रकार उत्तर भारतीय आणि विशेषत: गुजराती-राजस्थानी समुदायाचा पेहराव; परंतु आजच्या घडीला बॉलीवूडमधल्या नायिकाच नाही तर देशभरातल्या अगदी मध्यमवर्गातील तरुणींनी घागरा-चोलीला आपलंसं केलंय. मराठी मुलीही आपल्या ट्रॅडिशनल कपडय़ांच्या कलेक्शनमध्ये एखादी घागरा-चोली ठेवतातच.
त्यात सध्या नवरात्रीचा उत्सव. नवरात्री आणि घागरा-चोली याची जोडी तर अनब्रेकेबल आहे. दरवर्षी गणेशोत्सव संपला की बाजारपेठा रंगीबेरंगी घागऱ्यांनी रंगून जातात. नवरात्रीत गरबा खेळताना घातल्या जाणाऱ्या घागऱ्यावर सगळ्यांचंच लक्ष असतं. प्रत्येक गिरकीगणिक उडणारा घागरा, टिकल्या आणि विविध रंगांत न्हाऊन निघालेली चोळी, बांगडय़ांनी गच्च भरलेला हात आणि पावलागणिक चढणारी मनस्वी धुंदी यांचा अनोखा मिलाफ प्रत्येक गरब्याच्या आणि दांडियाच्या मंडपात पाहायला मिळतो. मुळात घागरा-चोळीचे विविध समारंभानुसार आणि प्रांतानुसार चनिया-चोळी, शरारा, लेहेंगा असे प्रकार असतात.
कारागिरीचं मोल
नवरात्रीच्या नऊ दिवसांतील मनातला उत्साह, बेधुंदपणा तुमच्या घागऱ्यात उतरलेला असतो असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. नवरात्रीचा घागरा हा सप्तरंगांत रंगून गेलेला असतो. बांधणी, टाय एन डाय यांसारख्या डाइंग पद्धतींमुळे या घागऱ्याला रंगत आलेली असते. टिकल्या, मिरर वर्क, पिटा वर्कच्या कलाकुसरीने नटलेला असतो. घागऱ्याची किंमत त्याच्यावरच्या या कलाकुसरीनुसार ठरते. कारागिरांच्या मेहनतीचं, कलेचं ते मोल असतं.
नवरात्रीचा घागरा निवडताना मुख्य प्राधान्य रंगांना तसेच मिरर वर्कला दिलं जातं. रात्रीच्या अंधारात भरगच्च भरलेल्या या घागऱ्यातील चमचमणाऱ्या टिकल्या गरब्याची मजा वाढवतात. राजस्थानचे कारागीर वर्षांनुर्वष हाताने ही एम्ब्रॉयडरी घागऱ्यावर विणत आहेत. त्यांच्या कलेचं खरं चीज नवरात्रातच होतं. या घागऱ्यांना मिळणारी उंची किंमत पाहून त्यांच्या या कष्टाचं चीज होतंय असं म्हणायला हरकत नाही.
सिल्कच्या घागरा-चोलीवर पिटा वर्क एम्ब्रॉयडरी केली जाते. पिटा एम्ब्रॉयडरी ही जरदोसीचा एक प्रकार असून हाताने केल्या जाणाऱ्या एम्ब्रॉयडरीचाच हा एक प्रकार आहे. या एम्ब्रॉयडरीवर आणि त्यांच्या डिटेिलगवर घागरा-चोलीची किंमत ठरवली जाते. ही कलाकुसर जितकी जास्त तितकी किंमत अधिक. कॉटनच्या घागऱ्याची किंमत २००० ते ५००० रुपयांच्या घरात असते, तर प्युअर सिल्कच्या घागरा-चोलीची किंमत ७००० ते १०००० रुपयांच्या घरात असते.
राजस्थानची कारागिरी आणि सुरतचा बाजार
मुंबईतल्या बाजारपेठेत दिसणारे बहुतेक महागडे घागरे राजस्थानी कारागिरांनी केलेले असतात. अनेक व्यापारी सुरतहून माल आणत असले तरीही कलाकुसर राजस्थानी असते. नवरात्रीच्या दिवसांत सुरतचा बाजार या घागरा-चोलींनी नटलेला असतो. त्यांची किंमत काही लाखांच्या घरातही जाते. मुंबईतील काही खास दर्दी ग्राहक, घागराप्रेमी तरुणी या महागडय़ा घागऱ्याची खरेदी करायला सुरत गाठतात किंवा स्वत:च्या घरी दुकानदारांना बोलावून नातेवाइकांबरोबर घोळक्यामध्ये मनमुरादपणे घागरा-चोलीची शॉिपग करतात.
ब्रायडल घागरा लाखांच्या घरात
खास लग्नसमारंभासाठी आजकाल खास घागरा करून घेतला जातो. अशा खास ब्रायडल घागऱ्याची किंमत त्याच्या युनिकनेसवर अवलंबून असते. एकेका घागऱ्यावर लाखभर खर्च करणारी नववधू डिझायनरकडून खास घागरा-चोली डिझाईन करून घेते. त्यावरील एम्ब्रॉयडरी, त्याचा लुक यावर बारकाईने लक्ष देते. असाच्या असा घागरा बाजारात उपलब्ध होणार नाही याची काळजी घेतली जाते. कारण तीच त्याची स्पेशालिटी असते. त्याचंच ते मोल असतं.
साडी घागरा हा यातला नवा प्रकार. साडी घागरादेखील स्वत:च्या पसंतीनुसार आणि बॉडीटाइपनुसार शिवला जातो. कस्टमाइज्ड डिझाईन हे असते त्याच्या महागडय़ा किमतीचं रहस्य.
नववधूदेखील रिसेप्शनसाठी उंची डिझाईयनर आणि एम्ब्रॉयडर घागरा-चोलीला प्राधान्य देतात. वामांगीची डिझाईनर ईशा कपाडियाच्या मते, ‘अशा ब्रायडल घागरा-चोलीची मागणी लग्नात मोठय़ा प्रमाणात केली जाते. घागरा-चोलीच्या मूळ स्वरूपाला तुम्ही जास्त व्हेरिएशन देऊ शकत नाही, पण एम्ब्रॉयडरीच्या साहाय्याने त्याच्यात नावीन्य आणू शकता.’ ब्रायडल घागरा ५०,००० ते एक लाखाच्या रेंजमध्ये बाजारात उपलब्ध आहे.
तसेच बॉलीवूडच्या सिनेमात दाखवल्या गेलेल्या किंवा नटय़ांनी घातलेल्या घागऱ्यांची हुबेहूब नक्कल केलेल्या घागरांना देखील मोठी मागणी असते आणि हे घागरा-चोली बऱ्यापकी महाग किमतीत उपलब्ध असतात.
नवरात्रीतील चनिया चोली
चनिया चोली हादेखील घागरा-चोलीसारखाच प्रकार. याच्याही किमती ५ हजारांपासून सुरू होतात. मालाडच्या नटरंग मार्केटमध्ये ‘पर्पल द बांधणी स्टोर’सारख्या दुकानात या घागरा-चोली तुम्हाला पाहायला मिळतील. पर्पल स्टोअरच्या मालकांच्या म्हणण्यानुसार, या चनिया चोलीत जितके अधिक रंग तितकी त्याची मागणी जास्त असते. त्यामुळे रंगांची कमतरता या घागऱ्यात कधीच भासत नाही.’
लेहेंगा चोली
लेहेंगा चोलीतील लेहेंग्याचा घेर हा घागऱ्यापेक्षा कमी असतो. ए लाइन किंवा स्ट्रेट कटमध्ये हे लेहेंगा उपलब्ध आहेत. यांच्यावरील एम्ब्रॉयडरीला महत्त्व दिले जाते. नेट, शिफॉन, जॉर्जेट या फॅब्रिक्समध्ये लेहेंगा चोली उपलब्ध असतात.
शरारा
शरारा या प्रकाराला मुस्लीम समाजात जास्त पसंती दिली जाते. शराऱ्यात पॅण्टला गुढग्याच्या खाली घेर दिलेला असतो. याच्याबरोबर चोळीऐवजी कुर्ता घातला जातो.
घागरा साडी
खास पूजेला किंवा पार्टीला जाताना क्रेप, नेटच्या महागडय़ा घागरा साडीलादेखील पसंती देतात. मुळात घागरा साडी ही कल्पना साडीची नजाकतता आणि घागऱ्याचा सुटसुटीतपणा यांच्या मिलाफातून उदयाला आलेली आहे. एम्ब्रॉयडरीने गच्च भरलेल्या या घागरा साडय़ांची किंमत १८ हजार ते २५ हजारापर्यंत असते. दादरच्या बाजारात मोठय़ा दुकानांमधून या उंची घागरा साडी पाहायला मिळतील.
तर प्युअर सिल्कच्या घागरा-चोलीची किंमत ७००० ते १०००० रुपयांच्या घरात असते.
राजस्थानची कारागिरी आणि सुरतचा बाजार
मुंबईतल्या बाजारपेठेत दिसणारे बहुतेक महागडे घागरे राजस्थानी कारागिरांनी केलेले असतात. अनेक व्यापारी सुरतहून माल आणत असले तरीही कलाकुसर राजस्थानी असते. नवरात्रीच्या दिवसांत सुरतचा बाजार या घागरा-चोलींनी नटलेला असतो. त्यांची किंमत काही लाखांच्या घरातही जाते. मुंबईतील काही खास दर्दी ग्राहक, घागराप्रेमी तरुणी या महागडय़ा घागऱ्याची खरेदी करायला सुरत गाठतात किंवा स्वत:च्या घरी दुकानदारांना बोलावून नातेवाइकांबरोबर घोळक्यामध्ये मनमुरादपणे घागरा-चोलीची शॉिपग करतात.
हायरे मेरा घागरा
नवरात्रीला घागरा-चोलीचा विषय येणार नाही, असं होणंच अशक्य. गरबा, दांडियाला घागरा हवाच.
आणखी वाचा
First published on: 11-10-2013 at 10:54 IST
मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghagra woman wear an indian dress