स्क्रीनवर आकाशी-पांढऱ्या रंगांच्या कॉम्बिनेशनवर गुलाबी रंगातली नि इटालिक ढंगातली पाच अक्षरं उमटली.. १‘४३.. मग पटापटा अकाऊंट ओपिनगसाठीचे डिटेल्स भरले होते. क्षणार्धात एक वॉल ओपन झाली.. ‘वेलकम टू ऑर्कुट’.. तेव्हा ‘लई भारी’ वाटलेलं ‘वेलकम’ होतं.. तसं नि तेवढंच भारी वाटण्याचा तो काळ होता. ‘तू ऑर्कुटवर आहेस?’ या प्रश्नाला ‘हो’ असं ताठ मानेनं मोठय़ा आवाजात उत्तर देणं किंवा ‘ना२२२ही’ असा खंतावलेली नकार लांबवत गुळमुळीतपणं खाली मान घालून म्हणणं. मग त्या होकारा-नकारानुसार पुढची गप्पाष्टक रंगणं हे अगदी स्वाभाविक होतं.
ही गोष्ट आहे दशकभरापूर्वी तरुणाईला वेड लावणाऱ्या नि सोशल नेटवìकग साइटमधल्या पहिल्यावहिल्या मानल्या जाणाऱ्या ‘ऑर्कुट’ची. ‘गुगल’नं ही सोशल साईट सप्टेंबरअखेर बंद करण्याचा निर्णय घेतलाय. एकेकाळी ‘नेटवरील तरुणाईचा कट्टा’ अशी ‘ऑर्कुट’ची ओळख होती. ती आता आठवणीतच राहील. ‘आर्कुट’ अकाउंट म्हणजे नेटवर अॅक्टिव्ह असल्याचं लक्षण. नंतर इतर सोशल साईटसच्या तुलनेनं आर्कुट मागं पडलं. एवढं की, एके काळी त्यावर रोज ‘साईन इन’ करणाऱ्यांना आपण त्यावर शेवटचं ‘साईन आऊट’ कधी केलं होतं, हे आठवायला फार फार कष्ट पडावेत.
नवीन फ्रेण्डस् बनवण्यासाठी नि जुन्या फ्रेण्डसच्या कॉन्टॅक्टमध्ये राहण्यासाठी ही साईट निर्माण करण्यात आली होती. ऑर्कुट बुयुक्कोकटेन या ‘गुगल’मधील स्टाफ मेंबरनं ‘ऑर्कुट’ची रचना केली होती. त्याच्याच नावावरून ‘ऑर्कुट’ हे नाव या साईटला दिलं गेलं. हे उद्दिष्ट गाठण्यात ‘ऑर्कुट’ला सुरुवातीला चांगलं यश मिळालं होतं. तेव्हा सोशल नेटवर्किंगबाबत वाटणारं आकर्षण, इंटरनेट सर्रास उपलब्ध नसणं नि ‘ऑर्कुट’च्या निमित्तानं तरुणाईनं नेटसॅव्ही होणं या आता फुटकळ वाटू शकणाऱ्या गोष्टीत बरंच काही घडलं होतं. एक प्रकारची ती ‘सोशल ई क्रांती’च होती..
एका आयटी कंपनीत काम करणारी सुरभी सांगते, ‘शाळा-कॉलेजमधून पास आऊट झाल्यानंतर दुरावलेल्या मित्रमंडळीशी नि काहीअंशी शिक्षकांशीही पुन्हा कॉन्टॅक्ट झाला तो ‘ऑर्कुट’मुळंच. परदेशातल्या काका-मामांशी किंवा शेजारच्या माहेरवाशिणीच्या परदेशात राहणाऱ्या मुलीशी, अशा आपल्याच परिचितांची नव्यानं ओळख झाली ती ‘ऑर्कुट’मुळं. आवडत्या गायकांपासून ते कलावंतांपर्यंत, चांगल्या अर्थानं आदर्श व्यक्तिमत्त्वांपासून ते विद्यमान सन्यदलांपर्यंत, साहित्य-कुकरीपासून ते क्रीडा-संस्थांपर्यंत, कला-छंदांपासून ते कुलदैवतापासून-आडनावांपर्यंत, खादाडीपासून ते ट्रेकिंगपर्यंत ‘ऑर्कुट’वर ढीगभर विषयांच्या ‘कम्युनिटीज’ क्रिएट झाल्या. फोटो नि व्हिडिओजवर ‘स्क्रॅप्स’ टाकण्यात (पोस्टसाठी ऑर्कुटवरचा शब्द) अनेकजणं माहीर झाले. ‘ऑर्कुट’वर चॅटिंग करता करता चॅटिंगच्या पलीकडं जाऊन भेटीगाठी होऊन काहींना लाईफपार्टनर मिळाला, अशी उदाहरणं ऐकिवात आहेत. ‘ऑर्कुट’मुळं कितीतरी हात ‘लिहिते’ झाले. काहींनी स्वतंत्र ब्लॉग्ज लिहिणं सुरू केलं.
एके काळी भरभरून केलं जाणारं हे सगळं शेअिरग हळूहळू कमी होत गेलं. कारण इतर सोशल साईट्सचं आकर्षण वाढलं. तांत्रिकदृष्टय़ ‘ऑर्कुट’ पार मागं पडलं ते पडलंच. आता ते बंद होणार असल्याची बातमी येताच सध्याच्या ‘इन साईटस’वर ‘ऑर्कुट’विषयीच्या पोस्ट भसाभसा पडल्या. काहींनी या साईट्सवरचे अनेक फ्रेण्डस् नि कम्युनिटीज आधी ‘ऑर्कुटकर’ होत्या हे झटकन मान्यच करून टाकलं, तर काहींची ‘ऑर्कुट’नंतर ‘आता या साईटची पाळी का?’ असा सवाल केला. बऱ्याचजणांनी ‘बाय बाय ऑर्कुट’ अशा अर्थाच्या पोस्ट केल्या. एखादी सोशल साईट बंद होताना तिची एवढी चर्चा होणं हे आजच्या ‘ई-चावडी’वरच्या रिवाजांना धरूनच आहे. तरीही ज्या साईटचा हात धरून आपण सोशल साईटची मुळाक्षरं गिरवली, तिला रीतसर ‘अलविदा’ करायलाच हवं.. ‘गुड बाय ऑर्कुट’!
अलविदा ऑर्कुट..
स्क्रीनवर आकाशी-पांढऱ्या रंगांच्या कॉम्बिनेशनवर गुलाबी रंगातली नि इटालिक ढंगातली पाच अक्षरं उमटली.. १‘४३.. मग पटापटा अकाऊंट ओपिनगसाठीचे डिटेल्स भरले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-07-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goodbye orkut