भारतात ऑनलाईन शॉपिंग सुरू होऊन अनेक वर्ष झाली असली तरी अद्याप ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांची संख्या फार मोठी नाही. भारतातील शॉपर्सना ऑनलाईनची सवय लावायला आणि त्यांना ऑनलाईन शॉपिंगकडे आकर्षित करून घेण्यासाठी गूगलनं खास भारतीयांसाठी गेल्या वर्षीपासून हा शॉपिंग फेस्टिवल सुरू केला. यंदा ७२ तासांसाठी हा ऑनलाईन शॉपिंग फेस्टिवल सुरू आहे.
गूगल इंडियाचा हा ‘ग्रेटऑनलाईन शॉपिंग फेस्टिवल’ सध्या सुरू आहे.  ११ ते १३ डिसेंबर दरम्यान सुरू राहणाऱ्या या शॉपिंग फेस्टमध्ये ऑनलाईन शॉपर्ससाठी खूप ऑफर्स उपलब्ध आहेत. २४१ कंपन्यांनी यात भाग घेऊन आपल्या प्रॉडक्टसवर ऑफर दिलेल्या आहेत. ऑनलाईन शॉपर्सकडून सगळ्यात जास्त मागणी मोबाईलला असते. भारतीय ग्राहक इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या खरेदीसाठी ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय निवडतात.
या वेळच्या गूगल ऑनलाईन शॉपिंग फेस्टिवलमध्ये मोबाईल, टीव्ही, कॅमेरे आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंबरोबरच फूटवेअर, मेन्स आणि विमेन्स वेअर, इम्पोर्टेड कार यावरदेखील २० ते ८० टक्के सवलत देण्यात येत आहे. याशिवाय ऑनलाईन शॉपर्ससाठी या फेस्टिवलमध्ये इन्शुरन्स, स्पा पॅकेजेस, काही कार्यक्रमांची तिकिटं, हॉलिडे पॅकेज, ग्रोसरी कूपन्स, पुस्तकं अशी वेगळी खरेदीही करता येणार आहे आणि त्यासाठी खास ऑफर देण्यात येत आहेत.

Story img Loader