आसिफ बागवान
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
काहीही माहिती लागली की, ‘गुगल’ करणं ही सवय सर्वानाच लागली आहे. स्मार्टफोनच्या एका क्लिकवर सगळी माहिती उपलब्ध होत असेल तर, त्यात काही वावगं नाही. मात्र, हे करताना काही गोष्टींचं तारतम्य आपण बाळगत नाही आणि मग..
स्मार्टफोनमुळे आपण किती आळशी झालोय? दहाएक वर्षांपूर्वी आपण नित्यनेमाने बँकेत जायचो. रांगेत उभे राहून पैसे काढायचो किंवा चेक भरायचो. कोणतीही नवी वस्तू घ्यायची झाली म्हटलं की, आपण बाजारपेठेत जायचो. चार दुकानांतून हिंडून, घासाघिस करून हवी ती वस्तू घ्यायचो. पण स्मार्टफोन आला आणि इंटरनेटच्या जोडीनं आपल्या भोवतालचं जगच बदलू लागला. वर सांगितलेली आणि इतरही अनेक कामे आपण स्मार्टफोनच्या माध्यमातून बसल्याजागी करू लागलो. स्मार्टफोनमुळे आपण इतके परावलंबी झालोय की अलिकडे आपण विचारही उसने घेऊ लागलो आहोत. व्हॉट्सअॅपवरून पसरवल्या जाणाऱ्या बातम्या, आरोग्य सल्ले, राजकीय मते यांवर विश्वास ठेवून आपण आपली विचारसरणी बदलू लागलो आहोत.
तंत्रज्ञान आपल्या सेवेसाठीच आहे. तंत्रज्ञानाची निर्मितीच मूळात मानवी जीवन अधिक सुखकर बनवण्यासाठी झाली आहे. त्यामुळे ‘स्मार्टफोनमुळे आपण परावलंबी झालो, त्यात वाईट ते काय’ असा प्रश्न कुणीही उपस्थित करू शकतं. नक्कीच, यात गैर काही नाही. मात्र, ज्यावेळी स्मार्टफोनचा वापर करताना आपण आपली बुद्धीही गहाण ठेवतो आणि त्याचा अन्य कुणीतरी गैरफायदा घेतो तेव्हा, आपल्या तर्कशून्य तंत्रस्नेहीपणाची गांभिर्यानं चर्चा करणं आवश्यक वाटतं. यातलंच एक उदाहरण म्हणजे ‘गुगल सर्च’च्या माध्यमातून वाढत असलेल्या आर्थिक फसवणुकीच्या घटना.
आपल्याला काहीही माहिती हवी असेल तर, गुगलवर सर्च करण्याची सवय आपल्याला जडली आहे. सर्दीपडसे झाले की औषधासाठी आपण ‘गुगल’वर सर्च करतो. विद्यार्थ्यांना शाळेचं प्रोजेक्ट बनवायचं असेल तर आपण ‘गुगल’ करतो. अगदी एखादी नवी रेसिपी माहित करून घ्यायची असेल तरीही आपण ‘गुगल’वर धुंडाळतो. ही सगळी माहिती गुगलवर उपलब्ध आहे. मात्र, या सर्चवर अंधविश्वास ठेवून जेव्हा आपण माहितीचा धांडोळा घेतो तेव्हा आपल्याला त्याचा त्रास सोसावा लागतो.
ही घटना दोन आठवडय़ांपूर्वी लखनऊमध्ये घडलेली. एका सदगृहस्थाने स्मार्टफोनवरील एका अॅपच्या माध्यमातून जेवणाची ऑर्डर दिली. जेवण आलं पण त्याची चव अतिशय वाईट होती. चिडून त्याने अॅपवरून कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो यशस्वी झाला नाही. मग त्याने गुगलवरून संबंधित कंपनीचे नाव टाकून त्यांचा संपर्क क्रमांक मिळवला. त्या क्रमांकवर संपर्क साधल्यानंतर पलिकडून बोलणाऱ्या व्यक्तीने खराब खाद्यपदार्थाबद्दल या महाशयांची माफी मागितली आणि त्यांना पैसे परत देण्यासाठी एक अॅप डाऊनलोड व इन्स्टॉल करण्यास सांगितले. या सदगृहस्थाने तातडीने ते अॅप इन्स्टॉल केले आणि कंपनीच्या ‘कर्मचाऱ्याने’ सांगितल्याप्रमाणे आपल्या बँकखात्याचा तपशीलही त्यात नोंदवला. त्यानंतर त्याला मोबाइलवर एसएमएसद्वारे आलेला ‘ओटीपी’ त्या कर्मचाऱ्याला दिला. आता काही मिनिटांत आपले खाद्यपदार्थाचे पैसे परत मिळतील, असा विचार तो करत असतानाच, त्याला मोबाइलवर त्याच्या बँकखात्यातून तब्बल चार लाख रुपये काढण्यात आल्याचा एसएमएस मिळाला. घडला प्रकार त्या व्यक्तीच्या लक्षात आला. पण तोपर्यंत उशीर झाला होता.
दिल्लीतील एका महिलेने गुरूद्वाऱ्यात नोंदणी करण्यासाठी गुगलवरून सर्च करून संपर्कक्रमांक मिळवला. त्यावर तिने फोन करताच पलिकडून बोलणाऱ्या व्यक्तीने ‘आता गुरूद्वाऱ्याची सर्व बुकिंग ऑनलाइन झाली आहे’ असं सांगून गुगल पेद्वारे पैसे भरावे लागतात, असे त्यांना कळवले. त्यासाठीचा अर्ज ऑनलाइन भरण्यासाठी त्या व्यक्तिने या महिलेला एक ‘वेब लिंक’ पाठवली व टोकन म्हणून पाच रूपये गुगल पेद्वारे भरण्यास सांगितले. महिलेने तो अर्ज भरून पाच रूपये पाठवताच काही मिनिटांत तिच्या खात्यातून एक लाख रुपये लंपास करण्यात आले.
‘गुगल सर्च’वरून प्रत्येक गोष्टीची माहिती आणि संपर्कक्रमांक मिळवण्याची नागरिकांची सवय आणि त्या माध्यमावर त्यांना वाटणारा विश्वास याचा पुरेपूर अंदाज घेत भामटय़ांनी आता ही पद्धत शोधली आहे. वेगवेगळय़ा नामांकित कंपन्या किंवा संकेतस्थळांच्या संपर्कक्रमांकांच्या यादीत आपला क्रमांक घुसवून ही मंडळी सावजाच्या प्रतीक्षेत बसतात. ‘गुगल’वरून मिळालेल्या या फोनक्रमांकांवर नागरिक फोन करतात आणि मग पुढे त्यांना गंडविणे सहज सोपे होते.
अशा प्रकारच्या घटना वाढू लागल्यानंतर नागरिकांनी गुगलवर दोष ढकलण्यास सुरुवात केली. मात्र, यातली एक मेख त्यांच्या लक्षात येत नाही ती म्हणजे, गुगलची सर्व व्यवस्था ‘ओपन सोर्स’ आहे. या मुक्त व्यवस्थेमुळे कुणीही सर्वसामान्य वापरकर्ता त्यावरील माहितीशी छेडछाड वा त्यात बदल करू शकतो. गुगल सर्चच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या कोणत्याही माहितीसोबत ‘सजेस्ट अॅन एडिट’ अर्थात ‘मजकूर संपादन करा’ असा पर्याय उपलब्ध असतो. आपल्या ‘सर्च’द्वारे दिली जाणारी माहिती अधिक बिनचूक व अद्ययावत राहावी, याकरिता ‘गुगल’ने हा पर्याय ठेवला आहे. पण त्याचा गैरफायदा ऑनलाइन भामटे किंवा सायबर हॅकरमंडळींनी घेण्यास सुरुवात केली. ‘सजेस्ट अॅन एडिट’च्या पर्यायाचा वापर करून ही मंडळी आपले संपर्क क्रमांक विविध कंपन्यांच्या संपर्क यादीत घुसवतात आणि आपला डाव साधतात. खाद्यपदार्थ, बँका, विमाकंपन्या, ऑनलाइन शॉपिंग, दूरध्वनी कंपन्या, ट्रॅव्हलिंग संकेतस्थळे किंवा अगदी रुग्णालयांच्या क्रमांकांमध्येही हे भामटे आपले क्रमांक पेरून ठेवतात.
हे सगळं कटकारस्थान गुगलच्या व्यासपीठावरून होत असल्याने त्या कंपनीने माहितीची पडताळणी आणि वापरकर्त्यांची सुरक्षा यांवर लक्ष देणे आवश्यक आहेच. अशा प्रकारच्या आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढल्यानंतर गुगलने त्यादृष्टीने काही पावले उचललीही. यासाठी बनवलेल्या गुगलच्या यंत्रणेने काही दिवसांपूर्वीच अडीच लाखहून अधिक बोगस संपर्कक्रमांक किंवा संकेतस्थळे हटवली. गेल्या काही महिन्यांत गुगलने अशाप्रकारे तीस लाखांहून अधिक बनावट व्यवसाय प्रोफाइल हटवल्या. यातील बहुतांश वापरकर्त्यांपर्यंत पोहोचूही दिल्या नाहीत, असा कंपनीचा दावा आहे. मात्र, तरीही आर्थिक फसवणुकीचे प्रकार कमी होत नाहीत.
खरंतर त्यापुढची जबाबदारी आपली आहे. ‘सर्च’वर मिळणारी माहिती अधिकृत आणि विश्वासार्ह आहे, हा समज सर्वप्रथम आपण मोडून काढणं आवश्यक आहे. माहितीचा शोध घेण्यासाठी ‘गुगल’हे आजघडीला त्यातल्यात्यात सर्वात प्रभावी आणि अधिक विश्वासार्ह माध्यम आहे. पण त्यावर उपलब्ध होणाऱ्या माहितीचं पृथ्थकरण आपण आपल्या पातळीवरही केलं पाहिजे. एखाद्या कंपनीचा संपर्कक्रमांक शोधायचा असेल तर केवळ सर्चच्या पानावर समोर आलेली माहिती न वापरता प्रत्यक्ष त्या कंपनीच्या संकेतस्थळावर जाऊन माहिती शोधली पाहिजे.
दुसरं म्हणजे, अलिकडे डिजिटल वॉलेटमुळे आपण पैसे ‘ट्रान्सफर’ करण्याबाबत कमालीचे बेफिकीर बनलो आहोत. कोणत्याही डिजिटल वॉलेटद्वारे अर्थव्यवहार करताना आपण सजगपणेच केला पाहिजे. त्यांचा वापर मर्यादित असायलाच हवा. अनोळखी माध्यमातून किंवा अनोळखी व्यक्तींद्वारे सुचवलेल्या अॅपशी आर्थिक व्यवहार करणं टाळलं पाहिजे. या सगळय़ा गोष्टींतून आपण डोळस बनलो तर आर्थिक फसवणुकीला वावच राहणार नाही.
viva@expressindia.com