सिनेमातल्या फॅशनचा लगेच ट्रेण्ड बनतो; पण चंदेरी पडद्यावरचं हे स्टाइल स्टेटमेंट प्रत्यक्षात कसं मिरवावं यासाठी हा कॉलम.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘मिक्स मॅच करण्याचा जमाना गेला’ असं अगदी आत्तापर्यंत म्हटलं जायचं, पण हा ट्रेंड आता परत आलाय. क्रॉप टॉप आणि पलॅझो पँट असा सिम्पल लूक कॅरी करणाऱ्या जॅकलिन फर्नाडिसचा लूक याचं उत्तम उदाहरण आहे. तसं पाहायला हा लूक फसायची शक्यता अधिक होती. पण फ्लोलर प्रिंट जॅकलिनने ग्रेसफुली कॅरी केले आहेत.

कसा कॅरी कराल
मिक्स मॅच लूक घालताना बरीच सावधगिरी बाळगण्याची गरज असते. सर्वप्रथम या ड्रेसिंगमुळे तुमच्या शरीराचा कोणताही भाग उठावदार होत नाही. त्यामुळे लुक फसतो. म्हणून एक सोप्पा नियम पाळायचा म्हणजे एक आऊटफिट फिटेड आणि दुसरा फ्लोयी असला पाहिजे. जॅकलिननेही तेच केले आहे. क्रॉप टॉप आणि पलॅझो किंवा पेन्सिल स्कर्ट हा लूक या स्टाइलमध्ये उत्तम दिसतो. सोबत पारदर्शक केप असल्यास क्या बात.. अधिक ज्वेलरीची गरज नाही. मोठय़ा इअररिंग्स किंवा स्टेटमेंट नेकपीस पुरेसा असतो. इतर लूक जितका साधा ठेवाल तितका उत्तम.
मृणाल भगत- viva.loksatta@gmail.com