द्राक्ष हा निर्सगाने भेट दिलेला उत्तम प्रकारचा मेवा आहे. उत्तम प्रतीच्या फळांमध्ये द्राक्षाची गणना होते. द्राक्षांचा स्वाद मधुर असतो. द्राक्षाची वेल असते. वेलीचा रंग लाल असतो. मांडव करून त्यावर वेल चढवला जातो. द्राक्षाला झुबकेदार फुले लागतात. युरोप-अमेरिकेमध्ये द्राक्षाची लागवड मोठय़ा प्रमाणात केली जाते. युरोपमध्ये फ्रान्स व इटली येथे आणि अमेरिकेत कॅलिफोर्निया येथे उत्तम द्राक्षांची लागवड मोठय़ा प्रमाणात केली जाते. जगामध्ये सर्वात अधिक द्राक्षे फ्रान्सच्या दक्षिण भागात होतात. तेथे द्राक्षांचे विशाल आणि भरपूर बगीचे आहेत. कॉकेशस पर्वत व कॅस्पिअन समुद्राच्या दक्षिण विस्तारात, आशिया खंडाच्या पश्चिम भागात व युरोपच्या दक्षिणेकडील भागात, अल्जेरिया, मोरोक्को इत्यादी देशांत द्राक्षाची वेल नसर्गिकरित्याच उगवलेले दिसून येतात. काबूल, कंदाहार आणि काश्मीरपासून िहदुकुश पर्वताच्या उत्तर भागातही द्राक्षाचे उत्पन्न चांगले होते. द्राक्षाचे वेल दोन-तीन वर्षांचे झाल्यानंतर त्यावर फळे येतात. विशेषत: फेब्रुवारी-मार्च महिन्यांत बाजारात ताजी द्राक्षे पुष्कळ प्रमाणात पाहावयास मिळतात. भारतामध्ये द्राक्षांची लागवड पंजाब, हरियाणा व महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात केली जाते. पुणे, सातारा, नाशिक, खानदेश व गुजरातमध्ये खेडा जिल्हय़ात द्राक्षे मोठय़ा प्रमाणात होतात. त्यात नाशिकची द्राक्षे अधिक प्रसिद्ध आहेत. काळी आणि पांढरी/ पिवळी अशा दोन प्रकारची द्राक्षे तयार होतात. काळय़ा द्राक्षांचा वापर औषधांसाठी मोठय़ा प्रमाणात केला जातो. बेदाणे, मनुके व किसमिस या द्राक्षांच्या मुख्य जाती आहेत. बेदाणा, मनुका व किसमिस ही नावे सुक्या द्राक्षांसाठी वापरली जातात. बेदाणे काही अंशी पांढरे असतात व त्यांच्यात बी नसते. मनुका काळय़ा रगांच्या असतात. किसमिस साधारणत: बेदाण्यासारखेच असतात. परंतु लहान जात असते. उष्ण प्रदेशांतील लोकांची भूक व तहान भागवण्यासाठी द्राक्षे अत्यंत उपयुक्त असतात. ती रक्तवर्धक असतात. भारतामध्ये सुकी द्राक्षे अरबस्तान, इराण व काबूल या देशांतून मागवितात. तेथे सुक्या द्राक्षांचे मोठय़ा प्रमाणात पीक होते. इतर देशांपेक्षा येथीत द्राक्षे अधिक चांगली असतात.
शास्त्रीय मताप्रमाणे, द्राक्षात जीवनसत्त्व ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ तसेच लोह आणि शरीरात शक्ती निर्माण करणारे पौष्टिक घटक असतात. याशिवाय त्यात पोटॅशियम, सेल्युलोज, शुगर व कार्बनिक आम्ल असल्याने द्राक्ष खाण्याने मलावरोध दूर होतो. द्राक्षामध्ये फ्रूटशुगर व काबरेहायड्रेट्स मोठय़ा प्रमाणात असते. त्यामुळे पौष्टिकतेच्या दृष्टीने इतर कोणत्याही फळांपेक्षा द्राक्षे अत्यंत उत्तम समजली जातात.
मेजवानीचे एपिसोड करताना मला सतत नवीन नवीन रेसिपीज् शोधाव्या लागायच्या. त्यामुळे एखाद्या पदार्थापासून प्रचलित खाद्यपदार्थाशिवाय दुसरे काय होईल याचा मी नेहमी विचार करतो. आणि यातूनच नवीन नवीन रेसिपीज् निर्माण झाल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा