रक्तातील ग्लुकोजच्या वाढलेल्या पातळीमुळे मधुमेह होतो. गर्भारपणात होणाऱ्या मधुमेहाला जेस्टेशनल मधुमेह म्हणतात. अशा प्रकारच्या मधुमेहात रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य पातळीवर राखणाऱ्या इन्सुलिन नामक हार्मोनला मिळणारा पेशींचा प्रतिसाद कमी होतो. रक्तातील वाढलेल्या ग्लुकोजच्या पातळीला पूर्ववत करण्याकरिता हे हार्मोन स्रवले जाते. इन्सुलिनची गरज प्रचंड असेल तर इन्सुलिन स्रवणारा अवयव म्हणजे स्वादुिपड या मागणीची पूर्तता करण्यास अपयशी ठरतो आणि लवकर त्याची दमछाक होते. त्यामुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण तुलनेत वाढून त्याची परिणती जेस्टेशनल मधुमेहात होते.
अशा प्रकारच्या मधुमेहाचे कारण अज्ञात आहे. पण अभ्यासातून असे समोर आले आहे की, हा गर्भारपणातील हार्मोन्सच्या पातळीमध्ये होणाऱ्या बदलामुळे होत असावा. नाळेच्या माध्यमातून बाळापर्यंत पोषण पुरवण्याकरिता काही हार्मोन कारणीभूत असतात. पण या प्रक्रियेत हे हार्मोन इन्सुलिनची क्रिया रोखतात, ज्याची परिणती ‘इन्सुलिन रेझिस्टन्स’मध्ये होते, ज्यामध्ये पुरेशा प्रमाणात इन्सुलिन वापरण्यात व निर्माण करण्यात शरीर असमर्थ ठरते आणि त्यामुळे सीरम ग्लुकोजचे प्रमाण सातत्याने उच्च होते. त्यामुळे जेस्टेशनल मधुमेहाला तोंड द्यावे लागते.
अशा प्रकारच्या मधुमेहामध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे नसतात, त्यामुळे डॉक्टर तुम्हाला गर्भारपणाच्या २४ व्या किंवा २८ व्या आठवडय़ामध्ये ग्लुकोज क्रीिनग टेस्ट करून घेण्याचा सल्ला देतात. अहवालात मधुमेह असल्याचे निदान झाले असल्यास त्याचा अर्थ तुम्हाला जेस्टेशनल मधुमेह असायलाच हवा असे नव्हे, तर त्याचा अर्थ असा आहे की, तुम्हाला त्याचा धोका आहे आणि त्याबद्दल खात्री करून घेण्यासाठी तुम्हाला ग्लुकोज टॉलेरन्स टेस्ट करून घ्यायची गरज आहे.
ग्लुकोशुरिया म्हणजेच ज्यांच्या लघवीमध्ये ग्लुकोजचे प्रमाण जास्त आहे. खासकरून लठ्ठ असलेल्या गर्भार स्त्रियांमध्ये हे प्रमाण आढळते किंवा कुटुंबामध्ये मधुमेहाचा इतिहास असलेल्या किंवा पहिल्या गर्भारपणात जेस्टेशनल मधुमेह झालेल्या आणि त्यातून बऱ्या झालेल्या गर्भार स्त्रियांना मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो.
जर रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण सातत्याने उच्च राहिले तर बाळाच्या शरीरात अतिशय जास्त प्रमाणात साखर जाण्याची शक्यता असते. ते प्रमाण पूर्वपदाला जावे याकरिता इन्सुलिनची निर्मिती करण्याकरिता स्वादुिपडावर अधिक ताण येतो. तसे न झाल्यास थोडेसे लठ्ठ बाळ जन्माला येते.
योग्य आहार आणि सौम्य व्यायाम यांच्या साहाय्याने रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढणे रोखले गेल्याने हा मधुमेह असलेल्या स्त्रियादेखील निरोगी बाळाला जन्म देऊ शकतात. रक्तातील ग्लुकोजची पातळी योग्य प्रमाणात ठेवण्याकरिता खालील आहारविषयक सूचनांचा अवलंब करता येईल.
१.    पुरेशा प्रमाणात आवश्यक ती पोषकतत्त्वे पुरवणारा संतुलित आहार घ्यावा
२.    जेवणाची वेळ टळू देऊ नये. दर २-३ तासांनी खाण्याने तुमचा चयापचयाचा दर वाढतो तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण राखले जाते.
३.    साखरेने युक्त असलेले मिठाई, पेस्ट्री, चॉकलेट्स, आईस्क्रीम्स इत्यादी पदार्थ तसेच तेलकट आणि तळलेले पदार्थ खाणे टाळावे.
४.    तुमच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी संतुलित राखण्यात मदत करणारे फायबर मोठय़ा प्रमाणात पुरवणाऱ्या ज्वारी, बाजरी आणि रागी यांसारख्या कबरेदकांचे सेवन करणे.
५.    आपल्या आहारात अंडी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, कॉटेज चीझ, डाळी आणि कडधान्ये, मांस आणि मांसापासून बनलेले पदार्थ यांसारख्या प्रथिनांचा समावेश करणे अतिशय लाभदायक ठरते. एल-काíनटिन हे असे अमिनो आम्ल आहे, जे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी करते आणि अतिशय गंभीर प्रकरणांमध्ये ते पूरक आहार म्हणून दिले जाते.
६.    खूप प्रमाणावर हिरवी तसेच लिंबूवर्गीय फळे खाणे. केळी, चिकू आणि आंबे यांसारख्या साखरेने परिपूर्ण अशा फळांचे सेवन आठवडय़ातून एकदाच करणे.
७.    दररोज सफरचंद खाण्याने शरीरातील विषारी तत्त्वे आणि धोकादायक पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे इन्सुलिनची गरज ३५ टक्क्यांनी कमी होते, असे निदर्शनास आले आहे.
८.    पपनसामुळे वजन कमी होण्यात मदत होते. त्यामुळे रोज थोडय़ा प्रमाणात पपनस खाण्याने तुमचे वजन कमी होण्यात मदत होते, तसेच रक्तातील साखरेचे प्रमाणही कमी होण्यास मदत होते!
९.    जांभळात मधुमेहविरोधी वैशिष्टय़े असतात आणि ते थेट स्वादुिपडावर परिणाम करते. जांभळाच्या बिया सुकवून, त्यांचे चूर्ण करून दोन २-३ चमचे इतक्या प्रमाणात सेवन करणे लाभदायक ठरते.
१०.    आपल्या भारतीय मसाल्यांमध्ये सर्वोत्तम वैद्यकीय वैशिष्टय़े असल्याचे दिसून आले आहे. तुमच्या आहारात दालचिनीचा समावेश केल्याने सीरम साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.
११.    शेवटचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या रक्तातील व्हिटॅमिन्सच्या पातळ्या राखण्याकरिता पिवळी, नािरगी फळे आणि भाज्या खाणे, ज्यामुळे जेस्टेशनल मधुमेहाचा धोका कमी होऊ शकेल.
३० मिनिटे सौम्य ते मध्यम प्रमाणावरील व्यायाम केल्याने ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याच्या शरीराच्या क्षमतेत सुधारणा होते. त्यामुळे चालणे, जॉिगग करणे, स्वििमग करणे, श्वसनक्रिया करणे अतिशय लाभदायक ठरू शकते. मधुमेहामुळे कधी-कधी मज्जासंस्थेला धक्का पोहोचू शकतो आणि त्यामुळे मज्जासंस्थेतील तीव्र वेदनेला तोंड द्यावे लागते. त्यामुळे डायबिटिक मसाज करून घ्यावा. हा त्रास नसणाऱ्यांनीदेखील १५ दिवसांतून एकदा डायबिटिक मसाज घ्यायला हरकत नाही. यामुळे शरीरातील नसíगक वेदनाशामक द्रव्ये स्रवून वेदनेला तोंड देण्याची क्षमता वाढते. आजकाल जास्त प्राधान्य मिळणारा योगासारखा व्यायाम मज्जासंस्थेला झालेली हानी भरून काढण्यात मदत करतो.
कोणत्याही प्रकारच्या पॅथोलॉजिकल समस्येचा सामना करण्याचा महत्त्वपूर्ण मार्ग म्हणजे शांत व स्थिरचित्त राहणे आणि आयुष्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे. ध्यान केल्याने तुमच्यामधील आशावाद उंचावतो आणि तुमचे शरीर पूर्वपदाला आणून निरोगी राखण्यात मदत होते!

Story img Loader