नवरात्रोत्सवाची चाहूल लागताच गरबा-दांडियाची तयारी सुरू होते. याच काळात ‘गरबा-दांडिया’ शिकवणारे काही हंगामी क्लासेसही सुरू होतात.‘पंखीडा..’, ‘ढोलीडा..’अशा गाण्यांचा आवाज, मोठमोठे ऑर्केस्ट्रा सोबत खास गुजराती पद्धतीच्या पेहरावाला अधिक खुलवतो तो म्हणजे पारंपरिक नृत्य प्रकारांनी नटलेला गरबा.. आणि असाच हा तालांच्या अद्भुत किमयेचा आविष्कार असणारा ‘गरबा-दांडिया’ शिकण्यासाठी गरबाप्रेमी ‘डिक्टो गुजराती’ स्टाइलचा गरबा शिकवणाऱ्या क्लासेसमध्ये गर्दी करू लागले आहेत.
नवरात्र म्हटलं की, ‘गरबा-दांडिया’चा रंग खऱ्या अर्थानं चढू लागतो. या रंगात न्हाऊन निघण्याचा मोह लहानांपासून-मोठय़ांपर्यंत कुणालाही काही केल्या आवरत नाही. मूळचा गुजरातचा असणारा हा ‘गरबा-दांडिया’आता महाराष्ट्रातही चांगलाच रुजला आहे. गुजरातमध्ये असलेल्या या सणाचं अत्याधुनिक स्वरूप आपल्याकडे पाहायला मिळत असलं तरीही नवरात्रीची खरी लज्जत गुजरातमध्ये अजूनही टिकून आहे. विशेष म्हणजे आता त्याची पाळंमुळं महाराष्ट्राच्या मातीतही रुजत आहेत.
मराठी असलो तरीही मुंबईत सगळ्यांना ‘गरबा-दांडिया’ खेळायची भारी हौस असते. पण डिक्टो गुजराथी स्टाइलने ‘गरबा-दांडिया’ खेळायचं म्हणजे झाली ना पंचाईत. एकटं-दुकटं गेलं तर पचका होणारच. ‘बट नॉट टु वरी..’ नवरात्रामध्ये गुजराती स्टाइलने ‘गरबा-दांडिया’ खेळून इम्प्रेशन जमवायचं असेल तर डिक्टो गुजराथी ‘गरबा-दांडिया’ शिकवणाऱ्या खाजगी क्लासेसशिवाय दुसरा पर्याय नाही.अशाच या क्लासेसच्या मदतीने गेली अनेक र्वष मुंबईतील तरुणांना गुजराती ठेक्यांचा फिल असणाऱ्या पारंपरिक दांडियाच्या वेडानं मंत्रमुग्ध केलं आहे. चतन्यानं ओसंडून वाहणाऱ्या अशा या गुज्जू दांडियात तरुणाईचा सहभाग मोठा आहे. प्रत्येक वर्षी पारंपरिक ‘गरबा-दांडिया’च्या रंगात रंगून जाण्यासाठी, नवनवीन गरब्याचे प्रकार शिकण्यासाठी ही तरुण पिढी आतुर झालेली असते.
घटस्थापनेच्या महिनाभर तर काही ठिकाणी पंधरा दिवस आधी विविध प्रकारचे डान्स शिकवणाऱ्या खाजगी क्लासेसमार्फत ‘गरबा-दांडिया’साठी शिबीर तसेच वर्क शॉप्स घेऊन ट्रेडिशनल नृत्याचा बाज असणाऱ्या गुजराती गरब्याचं मार्गदर्शन दिलं जात. जसं गरबा खेळताना अनेक गोष्टी लक्षात घेण्यासारख्या असतात. गरब्याच्या भोवती अनेक रिंगण असतात. जो जितक्या वेगाने रिंगणात खेळू शकेल तो त्या रिंगणात उभा असतो जर आपल्याला त्या रिंगणातील वेगानुसार खेळता येत नसेल तर रिंगणही बिघडते आणि इतरांचा
लोकनृत्य टिप्पणी, हल्लीसका, डांगी नृत्य, हुडो, ढोली नृत्य, मुतुकडी, मंजिरा किंवा पधार नृत्य येथे मुलांकडून विशेष मेहनत घेऊन प्रशिक्षिकांमार्फत शिकवली जातात. सध्या तरुणाईमध्ये विशेष पसंती दर्शवणारा फिल्मी गाण्यांच्या ठेक्यावर ताल धरणारा ‘मॉडर्न गरबा’, याशिवाय सरळ दांडी, उलटी दांडी,चार दांडी, आठ दांडी, बारा दांडी, धमाल दांडी या दांडियाच्या विविध प्रकारांसोबत ‘फोक’ दांडिया डान्स, ‘साल्सा’ दांडिया डान्स, पल्ली जग गरबो, गोप रास वगरे दांडिया नृत्याचे प्रकार येथे आलेल्या गरबा प्रेमींना शिकवले जातात. गरबा नृत्याला अधिक फुलवणाऱ्या पेहरावाबाबतही या शिबिरांमध्ये चोख मार्गदर्शन केले जाते. गरबा-दांडिया खेळतानाचा पेहराव कसा असावा, तो कसा परिधान करावा इथपासून ते त्या पेहरावाच्या रंगापर्यंत अचूक मार्गदर्शन मुलांना दिलं जातं. चनिया चोळी, ओढणी किंवा दुपट्टा असा कॉमन पेहराव तर गुजराती परंपरेपासून चालत आलेला कमखा, सोबत घालावयाचा चुडा, तर पुरुषांसाठी केडिया आणि त्यावर घालायच्या लेदर ने बनवलेल्या मोजडी याबाबतही पुरेपूर मार्गदर्शन केलं जातं. ‘गरबा-दांडिया’ शिकवणाऱ्या या क्लासेसमध्ये ४ वर्षांपासून ते अगदी ७५ र्वष वयोगटापर्यंत गरबाप्रेमी हौसेने प्रवेश घेतात. गरबा शिकवणाऱ्या या क्लासेसमध्ये तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी १२०० रुपये, ७ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी ३५० रुपये, तर काही ठिकाणी आठवडाभरासाठी लहान मुलांचे ७५० रुपये, मिडल एज ग्रुपसाठी ९५० रुपये तर ज्येष्ठ बायकांसाठी ११५० रुपये इतकी फीज घेतली जाते. दिवसेंदिवस ‘गरबा-दांडियाचं’ तरूणाईतील वाढतं क्रेझ यामुळे त्याचा मोठा प्रसार होत आहे.केवळ शहरांमध्येच त्याच प्रस्थ आहे असं नाही तर गावांमध्येही यास तितकाच चांगला प्रतिसाद मिळतोय अर्थात शहरांमध्ये त्याला आता व्यावसायिक रूप प्राप्त झालं असून आधुनिकतेची जोडही त्यास मिळत आहे. आज जिकडे तिकडे मोठ्या मदानावर गरबा-दांडिया रंगलेला दिसतो. तो काही ठिकाणी सर्वासाठी खुला तर काही ठिकाणी असा दांडिया रंगतो जिथे सर्वाना मुक्त प्रवेश नसतो. अनेकदा मोठ मोठ्या हॉटेल्स मध्ये, ग्राउंड्सवर बाहेरील ग्रुप्स ना बोलावून गरबा अरेंज केलेला असतो. मुंबईमध्ये गरब्यासाठी ऑर्गनायजर आहेत. सेलिब्रिटीजनाही येथे नेहमीच बोलावले जाते मात्र असे ग्लॅमरस गरबेही पारंपरिकता टिकून आहेत. इथे नऊ दिवसांच्या जोरदार गरब्यासाठी मोठाली प्राइजेस यांचीही रेलचेल असते अशा स्पर्धात्मक दांडियात सहभागी होण्यासाठीही गरबाप्रेमी खाजगी क्लासेस मधून प्रशिक्षण घेत असतात. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रामध्ये गरबा शिकलेल्या किंवा न शिकलेल्यांच शरीरही गाण्यातील सूर, ताल, लय यावर नकळत ठेका धरू लागेल. तरुणाईला दांडियाची धुंदी चढलेली दिसेल त्यामध्ये डिक्टो गुजराथी दांडियाचा येणारा तालबद्ध निनाद गरबाप्रेमींना आणखीनच मोहित करू लागेल. हाती टिपऱ्या घेऊन समोरच्याच्या टिपरीवर त्याचा नाद करीत लहानांपासून जेष्ठांपर्यंत प्रत्येकाची पावलं आपसूक तालात घुमायला लागतील आणि पुन्हा दुसऱ्या सायंकाळच्या गरब्यासाठी आतुर होतील.तालांच्या या बेधुंद अविष्कारात नऊ रात्री केव्हा संपतील याचा पत्ताही लागणार नाही. गरबा-दांडिया बद्दल आणखी खूप काही जाणण्यासारखं आहे. पण हे सगळं अनुभवायचं असेल तर गरबा शिकल्याशिवाय तो खेळल्याशिवाय या सगळ्याला कोरडेपणाच आल्यासारखा वाटेल. मग विचार कसला करताय ! गुजराती गरबा शिका आणि बिनधास्त गरबा खेळायला चला.
डिक्टो गुजराती…
नवरात्रोत्सवाची चाहूल लागताच गरबा-दांडियाची तयारी सुरू होते. याच काळात ‘गरबा-दांडिया’ शिकवणारे काही हंगामी क्लासेसही सुरू होतात.‘पंखीडा..’, ‘ढोलीडा..’अशा गाण्यांचा आवाज, मोठमोठे ऑर्केस्ट्रा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-10-2012 at 07:59 IST
मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarati garba dandiya