जीवन की मधुता तो तेरे ऊपर कब का वार चुका
आज निछावर कर दूँगा मैं तुझ पर जग की मधुशाला
हरिवंशराय बच्चन

स्पॉस्टिफायवर प्रसारित होणारा ‘मधुशाला’ हा पॉडकास्ट हरिवंशराय बच्चन यांचा कवितांवर आधारित एक प्रसिद्ध पॉडकास्ट आहे. आर. जे. अरिसुदन यादव हा हरिवंशराय बच्चन यांच्या कविता सादर करून त्या प्रत्येक कवितेमागील गोष्ट सांगतो. ‘मधुशाला’ या पॉडकास्टच्या ‘मधुशाला जैसे शिव का नृत्य’ या भागात ही कविता आर. जे. अरिसुदन याने ऐकवली होती. हरिवंशराय बच्चन यांनी कविता सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हाचा त्यांचा अनुभवही त्याने या वेळी सांगितला. १९३३ मध्ये जेव्हा बच्चन पायोनियर प्रेसच्या नोकरीसाठी निघाले होते, तेव्हा त्यांनी कविता सोडण्याचा निर्णय घेतला आणि स्वत:जवळील कागद-पेन ठेवून दिले; परंतु त्या कागद आणि पेनकडे बघूनच त्यांना ‘जीवन की मधुता तो तेरे ऊपर कब का वार चुका, आज निछावर कर दूँगा मैं तुझ पर जग की मधुशाला’ या दोन ओळी तत्क्षणी सुचल्या.

Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
amitabh bachchan
विकी कौशलच्या वडिलांनी सांगितली अमिताभ बच्चन यांची आठवण; म्हणाले, “चिखलाने माखलेल्या अवस्थेत…”
Narendra modi Rahul Gandhi Bal Thackeray
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”
Bhool Bhulaiyaa 3 Vs Singham Again Collection
‘सिंघम अगेन’च्या दमदार स्टारकास्टवर एकटा कार्तिक आर्यन पडला भारी! ‘भुलै भुलैया ३’ने नवव्या दिवशी कमावले तब्बल…
Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो

आणि त्यांनी त्या ओळी त्या बाजूला ठेवलेल्या त्याच कागदावर लिहून काढल्या.मी आर. जे. अरिसुदन यादव याचे पॉडकास्ट नेहमी ऐकते. ‘मधुशाला’ ही हरिवंशराय बच्चन यांची खूप प्रसिद्ध कविता आहे. भाषा शिक्षक असूनही मला ही कविता पूर्णपणे समजली नाही. या कवितेचा अर्थ आणि या कवितेच्या मागची कथा जाणून घेण्यासाठी मी हा पॉडकास्ट ऐकायला सुरुवात केली. आपण आयुष्यात कोणतेही काम केले तरी कला ही एकमेव गोष्ट आहे ज्यापासून आपण कधीच लांब राहू शकत नाही याची जाणीव मला हा खास भाग आणि त्यातील हरिवंशराय यांची आठवण ऐकल्यानंतर झाली. हा भाग ऐकल्यापासून मी माझ्या अनेक विद्यार्थाना त्यांची कला जोपासण्याचा सल्ला आर्वजून देत असते. कारण कलेमुळेच आपल्या जीवनाला खरा अर्थ येतो ही आता माझीही धारणा आहे. – साक्षी जाधव (शिक्षिका)

शब्दांकन: श्रुती कदम