मतदान हा पवित्र अधिकार. आपल्या आयुष्यावर दृष्य- अदृष्य परिणाम करणारा.. मतदान करणं हे जबाबदार नागरिकाचं नैतिक कर्तव्य. आपल्यापैकी काहीजण या वेळी प्रथमच हे कर्तव्य बजावायला तयार झाले असतील किंवा काहींचा हा दुसरा- तिसरा अनुभव असेल. २०१४ ची लोकसभा निवडणूक खऱ्या अर्थाने वेगळी ठरणार आहे ती या नवमतदारांमुळे आणि तरुण मतदारांमुळेच! तुम्हीही त्यापैकी एक आहात? मग आपला मतदान करण्यासाठीचा उत्साह शब्दबद्ध करून आमच्यापर्यंत पोचवा. तुम्हाला मतदान का करायचंय,  तुमची प्रेरणा काय, तुमच्या अपेक्षा काय? याबाबतची तुमची मतं आम्हाला कळवा. याआधी मतदान केलं असेल तर काही प्रेरणादायी प्रसंगही आमच्याशी शेअर करा. त्यातील निवडक अनुभवांना आम्ही प्रसिद्धी देऊ.
शब्दमर्यादा – १५० शब्द. सोबत आपला फोटोही मेल करा.  आमचा ईमेल आयडी – viva.loksatta@gmail.com
मेल करताना सब्जेक्टलाईनमध्ये ‘यंग व्होटर’ असं जरुर लिहा.  टपाल पाठवायचं असल्यास आमचा पत्ता
लोकसत्ता संपादकीय विभाग-  प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४००७१०. फॅक्स : ०२२-२७६३३००८.

Story img Loader