भारतीय संगीत, कला, संस्कृती यांना अभिजाततेचे वरदान लाभलेले आहे. प्रत्येक प्रांतागणिक, ऋतुमानानुसार बदलणाऱ्या फॅशनच्या विश्वाला हा अभिजात वारसा पोचवणाऱ्या काही निवडक फॅशन डिझाईनर्सच्या मांदियाळीतील अग्रगण्य नाव म्हणजे अबू जानी आणि संदीप खोसला. त्यांचं नाव आत्ता चर्चेत यायचं कारण म्हणजे मुंबई एअरपोर्टचं नवं टर्मिनल (टी २) सजवण्यात या दोघांचा मोठा वाटा आहे. गारमेंट डिझायनर्स म्हणून नावारुपाला आले तरी त्यांनी आपली इंटिरिअर डेकोरेटर म्हणून ओळख कायम ठेवली आहे. टी २ च्या इंटिरिअरमधले कमळाच्या आकाराचे दिवे, झुंबरं, मोरपीसाच्या नक्षीचे खांब अशा प्रत्येक गोष्टीतून अस्सल भारतीय अभिजात सौंदर्य दाखवायचा त्यांनी प्रयत्न केला आहे. पडद्याच्या मागून प्रकाश सोडत साधलेला ‘दिया वॉल’ इफेक्ट असो किंवा फुल्कारी आणि तत्सम एम्ब्रोयडरीच्या बुट्यांनी सजवलेले छत असो. प्रत्येकातून अभिजात भारतीयत्व झळकताना पाहायला मिळते.
 गेली २५ र्वष ही जोडगोळी फॅशनच्या विश्वात आपले पाय घट्ट रोवून उभी आहे. आपली पहिली सेलेब्रिटी क्लायंट डिम्पल कपाडियापासून फॅशनमधील प्रवास सुरू करणाऱ्या या जोडगोळीला बच्चन आणि अंबानी कुटुंबीयांनी घराणेशाहीची ओळख दिली. पेहरावातील शाही रुबाब ही काय चीज असते याची झलक त्यांच्या प्रत्येक कलेक्शनमधून पाहायला मिळते. नुकतेच ‘द गोल्डन पिकॉक’ नावाचे ब्रायडल कलेक्शन त्यांनी सादर केले. तसे भारतीय संस्कृती आणि मोर यांचे फार जुने नाते आहे. पारंपरिक एम्ब्रोयडरीमध्ये आढळणाऱ्या काही मोजक्या प्रमुख बुट्टय़ामधील एक म्हणजे मोर. पण याच मोराला वेगळं रूप द्यायचं काम या डिझायनर द्वयीनं केलंय.
भारतीय नववधू ही अबू जानी आणि संदीप खोसलाच्या प्रत्येक कलेक्शनच्या केंद्रस्थानी असते. तिच्या सौंदर्यातली नजाकत, चंचलता आणि स्त्रीसुलभ लज्जा जिवंत ठेवण्याची त्यांची धडपड त्यांच्या प्रत्येक कलेक्शनमधून दिसून येते. भारतीय स्त्रियांच्या अभिजात लावण्याशी जुळणारं कलेक्शन त्यांनी नेहमी सादर केलं. या जोडगोळीशी ‘व्हिवा’नं केलेली खास बातचीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जगातील इतर टर्मिनल्स सारखं टर्मिनल बनवत असतानाही ‘मुंबईचे टर्मिनल’ म्हणून त्याची खास ओळख निर्माण करण्यासाठी काय केलं?
यामागची संकल्पना अशी होती कि, या टर्मिनलवर पाहिलं पाउल ठेवताच क्षणी, प्रत्येकाला हे लक्षात आलं पाहिजे कि आपण विविधतेत नटलेल्या भारताच्या भूमीवर पाय ठेवले आहेत. आणि त्या क्षणापासून या विविधतेच्या प्रेमात ते पडले पाहिजेत.’

मागच्या वर्षी तुमची फॅशन इंडस्ट्रीत २५ र्वष पूर्ण झालीत. तुमचा हा प्रवास तुम्ही कसा वर्णन कराल?
जेव्हा आम्ही या इंडस्ट्रीत पहिले पाऊल टाकले त्यावेळेस ना आमच्याकडे कोणते व्यावसायिक प्रशिक्षण होते ना पुरेशी आíथक मदत. आमच्याकडे होते ते फक्त एक स्वच्छ स्वप्न आणि ते पूर्णत्वात आणण्याचे मनोधर्य. आम्ही कुटुर कलेक्शनपासून आमच्या प्रवासाची सुरुवात केली होती आणि कायम कुटुर कलेक्शनशी प्रामाणिक राहिलो. मौखिक प्रसिद्धीतूनच आमचा ब्रॅण्ड घडत गेला. आमचे ग्राहक हेच नकळतपणे आमच्या ब्रॅण्डचे मुख्य जाहिरातदार बनले. आम्ही डिझाईन तयार करताना कोणताही व्यावहारिक दृष्टिकोन समोर न ठेवता स्वत:चे व्हिजन लोकांसमोर मांडले. कोणत्याही व्यावसायिक स्वार्थाला आमच्या सर्जनशीलतेच्या आड येऊ दिले नाही. व्यावसायिकदृष्टय़ा कोणतेही प्रमुख उद्दिष्ट न ठेवताही सुयोगाने आमच्या सर्जनतेला योग्य दाद देणारे दर्दी करियरच्या प्रत्येक टप्प्यात आम्हाला भेटत गेले. त्यामुळेच आज आमच्या ग्राहकांची यादी संपूर्ण जगभर पसरली आहे.

गेल्या २५ वर्षांत भारतीय नववधूमधील कोणकोणते बदल तुमच्या पाहण्यात आले आहेत? त्यांच्या पेहरावातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कोणते पलू तुम्हाला लक्षात आलेत?
आत्ताची तरुणी प्रयोगशील आहे आणि आपल्या वॉर्डरोबमध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न ती सतत करत असते. हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आणि राहणीमानात आलेल्या स्वच्छंद वृत्तीचे प्रतििबब आहे. यातूनच विविध रंगांचा आणि पेहरावांचा तिच्या लग्नाच्या वॉर्डरोबमध्ये समावेश झालेला आहे.

या २५ वर्षांतील भारतीय फॅशन विश्वातील प्रत्येक घटनेचे तुम्ही साक्षीदार आहात. भारतीय फॅशन विश्वातील कोणते मुख्य बदल तुमच्या नजरेत आले आहेत?
भारतीय फॅशन विश्वातील प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे त्यातील प्रयोगशीलता. जागतिक बाजारपेठ आपल्यासाठी खुली झाली तेव्हापासून आपल्या पारंपरिक पोशाखाला पाश्चात्त्य पेहरावाचा परिसस्पर्श लाभत गेला आहे. पण हा बदल जितका नावीन्यपूर्ण आहे तितकाच चिंताजनकही आहे. नावीन्याच्या अति हव्यासापोटी आपण आपल्या जुन्या परंपरा आणि वारसा कुठे तरी गमावतोय. विवाह सोहळ्यातील बॉलगाऊन आणि कन्सेप्ट साडीसारखे प्रकार आम्हाला अस्वस्थ करतात.

भारतातील वाढते फॅशन शोज आणि मीडियामुळे पेहरावातील इक्स्क्लुजीविटी आणि क्लासिकनेस कमी होत आहे असे तुम्हाला वाटते का?
मीडिया आणि फॅशन शोज हे आजच्या घडीला फॅशन विश्वातील चक्र फिरते ठेवण्यासाठी गरजेचे आहेत. तरीही त्यामूळे गुणवत्तेचा बळी जाता कामा नये. आपल्याला अशा फॅशन पत्रकारितेची गरज आहे जे प्रत्येक छुप्या प्रतिभेला जगासमोर आणतील. आपल्याकडे प्रतिभेची, डिझाईन्सची आणि कलाकुसरीची कमतरता अजिबात नाही आहे. भारतीय फॅशन विश्वातील आíथक आणि इतर पायाभूत सुविधांमध्ये समाधानकारक वाढ झाली आहे. एक बाजारपेठ म्हणून आज भारतीय फॅशन उद्योगाला एकत्रित येऊन जागतिक स्पध्रेत ठामपणे उभे राहायची गरज आहे. तरच एक स्वतंत्र बाजारपेठ म्हणून आपण आपले स्थान प्रस्थापित करू शकतो.

चिकनकारी एम्ब्रोयडरीचे पुन्नरुजीवन करण्याचे श्रेय तुम्हाला दिले जाते. तुमचा ब्रॅण्ड घडवण्यात चिकनकारीची भूमिका काय आहे?
या एम्ब्रोयडरीचा उगम १८व्या शतकात लखनौमध्ये झाला होता. एकेकाळी राजघराण्यांच्या शाही पोशाखात वापरली जाणारी ही एम्ब्रोयडरी आज लोकांना आकर्षति करते ती त्याच्यातील गुंतागुंतीच्या पण तितक्याच नजाकतपूर्ण कलाकुसरीमुळे. आमचे प्रमुख उद्दिष्ट यांच्यातील जुने वैभव परत आणणे हे होते, तर दुसरे या एम्ब्रोयडरीला एका नवीन उंचीवर नेऊन पोचवणे. आम्ही चिकनकारीचा उपयोग दैनंदिन पेहरावात करण्याऐवजी आम्ही त्याला कुटुरचा दर्जा देऊन ब्राईडल कलेक्शनमध्ये त्याचा समावेश करून घेतला आहे.