नवरात्रीचा उत्सव आता ऐन रंगात आलाय. पाठोपाठ दसरा येतोय. या सणासुदीच्या परंपरेतून आपल्या देशाची संस्कृती उठून दिसते. परदेशातल्या लोकांना याच संस्कृतीचं आकर्षण असतं. अशाच काही परदेशी मैत्रिणींशी व्हिवानं संवाद साधला. या मत्रिणी भारतात आल्या त्या त्यांची संस्कृती घेऊन आणि आता त्या मेळ घालू पाहताहेत दोन संस्कृतींचा. बनू पाहताहेत ‘दिल से इंडियन’!
पार्कमधल्या बेंचवर बसून पार्थ मोबाइल वर ‘कौन बनेगा करोडपती’ खेळत बसला होता. एका प्रश्नावर तो अडला. मग त्याने आपला मोर्चा आपल्या दादाकडे वळवला. ‘‘ दादू डूड, मला एक प्रश्न अडलाय रे गेममधला. आयुर्वेद यातल्या कुठल्या वेदाची शाखा आहे? ऑप्शन्स आहेत ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद.. सांग ना दादू.’’ ‘‘नो आयडिया मॅन..’’ म्हणत दादू डूड फोनवर बोलायला पळाला. ‘‘आयुर्वेद ही अथर्ववेदाची शाखा आहे, पार्थ’’ पाठीवर थाप देत सुरीन उत्तरली. मी या सगळ्या प्रकाराकडे बाजूच्या बेंचवरून पाहत होते. छान मराठी बोलणारी, पण दिसायला ‘इंडियन’ नसणारी ही मुलगी आपल्या ‘कल्चर’बद्दल इतकं खोलवर कसं जाणते या कुतूहलाने मला सुरीनशी बोलायला भाग पाडलं. हय़ुंदाई, एल.जी.सारख्या आघाडीच्या कंपन्यांची मायभूमी असलेल्या ‘कोरिया’तून आलेल्या या मत्रिणीला भारतीय इतिहास, भारतीय संगीत यांनी प्रेमात पाडलं. तिथल्या ‘हायटेक’ जगण्यातून तिची सांस्कृतिक भूक भागली नाही आणि त्या भुकेनेच ती भारतात शिकायला म्हणून आली. एका गाण्याच्या कार्यक्रमात तिने तबला पाहिला, ऐकला आणि त्या तालवाद्याच्या प्रेमातच पडली. मग काय विचारता, तिने पुण्यात लक्ष्मी रोडवर तबल्याचा क्लास शोधून काढला आणि तिकडे जायला लागली. तिची ही ओढ तिच्या अभ्यासात पण दिसून आली. तिने अभ्यासाचा मुख्य विषय म्हणून इतिहासाची निवड केली पण त्यात तिला अडसर ठरली ती भाषा. इतिहासाची काही पुस्तकं फक्त मराठीमध्येच उपलब्ध होती आणि तिला तेव्हा मराठी येत नव्हती. मग तिने मराठीची शिकवणी लावून इतिहासाचा अभ्यास केला. आता दोन वर्षांनंतर ती उत्तम मराठी बोलते आहे. ‘‘उत्सवांपकी तुझा आवडता उत्सव कोणता?’’ असा विचारल्यावर म्हणते ‘‘गणेशोत्सव. कारण गणपती इतका क्युट देव अजून कोणताच नाही.’’ हट्टाने इंडियन कपडे घालणारी ही मत्रीण आता उकडीचे मोदक, रस्सम, छोले बनवायला आणि खायला शिकली आहे.
‘दिल से इंडियन’ असणारी दुसरी परदेशी मुलगी भेटली ती टांझानियाची मोना. घराबाहेर पडून एक नवी ओळख निर्माण करायला म्हणून बाहेर पडलेली मोना जवळजवळ भारतभर फिरली आहे. विविध ठिकाणी जाऊन तिने अगदी योगशास्त्र ते शिवणकलेपर्यंतचे वेगवेगळे कोस्रेस केले आहेत. भारतीय वातावरणातला ‘स्पिरिच्युअल आस्पेक्ट’ तिला फार आवडला. ती म्हणते, ‘‘भारतात यावंसं वाटायचं आणखी एक कारण म्हणजे इथली धार्मिक स्वतंत्रता. इथे मला माझ्या मनाप्रमाणे माझे बिलिफ्स पाळता येतात.’’ सतत उत्साही असणाऱ्या मोनाचा फेवरेट फेस्टिवल म्हणजे दिवाळी. आपल्याकडे असणारी दिवाळीची लगबग, रोषणाई, फराळ सगळं तिला मनापासून आवडलं. मागच्या दिवाळीत ती आपल्या घरी टांझानियाला होती तेव्हा तो ‘दिवाळी फिवर’ फार ‘मिस’ केला. भारतात घालवलेल्या तीन वर्षांनंतर मोनाला आता तितकं होमसिक नाही वाटत. याचं श्रेय ती तिच्या फ्रेंड्सना देते. तिच्या वेगळ्या रंगरूपामुळे सुरुवातीला तिला अनेक ‘ रेसिस्ट’ टिप्पण्या ऐकाव्या लागल्या. रस्त्याने येता-जाता शोपीसकडे बघावं तसे लोक पाहत राहायचे. पण आता मात्र तिला या सगळ्यांनी फरक पडत नाही.
स्कार्फ वापरण्यावरून, वेगळ्या ड्रेसिंग स्टाइलवरून मारलेले असे टोमणे फिरोजाने पण सहन केले आहेत. अफगाणिस्तानात वाढलेली फिरोजा, केवळ ‘सायकॉलॉजी’ शिकता यावं म्हणून पुण्यात आली. अफगाणिस्तानातली परिस्थिती लक्षात घेऊन तिने ‘सायकॉलॉजी’ शिकायचा निर्णय घेतला, तो घरच्यांचा विरोध सहन करतच. तिच्या मते दोन भारत आणि तिच्या देशातल्या कल्चरल सिमिलॅरिटीजमुळे इथे तिला होमली वाटतं.
‘इंडियन युथ’बद्दल विचारलं असताना म्हणते, ‘‘इथलं युथ खूप डायव्हर्स विचार करते. मात्र राजकीय घटनांबाबत, घडामोडींबाबत जरा उदासीन आहे. भारतातल्या यंग लोकांनी राजकारणात भाग घेऊन इथली परिस्थिती बदलायला हवी.’’ फिरोजा परखडपणे सांगते.
‘‘भारतात फक्त शिक्षणासाठीच लोक बाहेरून येतात, असं जर वाटत असेल तर ते चुकीचं आहे. भारतातही एम्प्लॉयमेंटचं पोटेन्शियल आहे,’’ असं इंग्लंडहून आलेली ओलिव्हिया सांगते. गेल्या सहा महिन्यांपासून ओलिव्हिया पुण्याजवळच्या पाबळच्या विज्ञान आश्रमात काम करते आहे. ‘वेस्ट मॅनेजमेंट’च्या एका प्रोजेक्टवर ती सध्या काम करते आहे, ज्याद्वारे तरुण मुलं सोशल आंत्रप्रेन्युअरशिप करू शकतील, असं तिचं मत आहे.
भारतीय संस्कृतीवरचा िहदू, बौद्ध, शीख आणि इस्लामिक संस्कृतींचा प्रभाव तिने खोलवर अभ्यासला आहे. युथबद्दल बोलताना ती म्हणाली, ‘‘ इथे भारतात नाती फार जपली जातात. आमच्या इथे विशीतच आई-बाबांचं घर सोडून आपापलं एकटं राहायची पद्धत आहे.’’ भारतातली लग्नांची पद्धत मात्र तिला मनापासून आवडली. ‘‘आमच्याकडे तिशीत पाऊल ठेवल्याशिवाय कुणी लग्नच करत नाहीत आणि इथल्यासारखा मोठ्ठा सोहळा, झगमगाट तिकडे नसतोच.’’ ती हसत सांगते. ओलिव्हियाच्या मते ‘इंडियन युथ’ त्यांच्या वयापेक्षा जास्त समजूतदार आहे आणि मेहनतीसुद्धा आहे.
आपल्या संस्कृतीशी जवळीक सांगणाऱ्या मॉरिशियसची असणारी करिश्मा म्हणजे अगदी स्कॉलर मत्रीण. बारावीमध्ये राष्ट्रीय पातळीवर मराठी विषयात पहिल्या पाचात येणारी ही मत्रीण भरभरून बोलते. तिच्या आईला करिश्माने मराठीची शिक्षिका व्हावं, असं फार वाटायचं आणि त्यासाठी तिला आईने, शिक्षकांनी प्रचंड प्रोत्साहन दिलं आहे. करिश्माचे आजोबा कधी काळी भारतातून तिकडे गेलेले, त्यामुळे मराठमोळ्या वातावरणात वाढलेल्या करिश्माला सण-उत्सव संतपरंपरा या गोष्टी नवीन नव्हत्या. आधीच भारताशी असलेले ऋणानुबंध घट्ट करत करिश्मा आता मराठी विषय घेऊन बी.ए. करते आहे. त्यानिमित्ताने संतपरंपरा, विविध लेखकांचे लिखाण यांचा अभ्यास जोमाने करते आहे.
महाराष्ट्रीय परंपरांवर, सणांवर प्रेम करत मोठय़ा झालेल्या या मत्रिणीला खटकतं ते पारंपरिक सणांचं बदलतं रूप. ‘‘गणपतीच्या वेळचे कर्णकर्कश आवाज, कसलीशी फालतू गाणी, नवरात्रीतही पुन्हा तेच. दिवाळीतले बेसुमार फटाक्यांचे आवाज, दहीहंडीच्या वेळी चालणारी छेडछाड या सगळ्यात त्या सणाचं पावित्र्य कुठेतरी हरवतं, त्यातला साधेपणा उरत नाही.’’ करिश्मा गंभीरपणे सांगते.
या सगळ्या मत्रिणींकडे बघून एक गोष्ट जाणवते की, फक्त सणावाराला नऊवारी नेसून फेसबुकवर पिक टाकून संस्कृती जपायचं आपलं काम संपत नाही. आपण कधी आपल्या पूर्वजांनी कष्ट करून निर्माण केलेल्या ठेव्याकडे लक्ष पुरवणार? आपण आपल्यातला ‘इंडियननेस’ कसा टिकवणार? या मत्रिणी भारतात आल्या त्या त्यांची संस्कृती घेऊन आणि आता त्या मेळ घालू पाहताहेत दोन संस्कृतींचा. बनू पाहताहेत ‘दिल से इंडियन’..
भारत आणि अफगाणिस्तानमध्ये सांस्कृतिक साम्य बरंच आहे
फिरोजा, अफगाणिस्तान
मराठी विषयातून एम ए करायचंय
करीश्मा, मॉरिशस
भारतातला स्पिरिच्युअल आस्पेक्ट भावला
मोना, टांझानिया
इंडियन युथ’बद्दल विचारलं असताना म्हणते, ‘‘इथलं युथ खूप डायव्हर्स विचार करते. मात्र राजकीय घटनांबाबत, घडामोडींबाबत जरा उदासीन आहे. भारतातल्या यंग लोकांनी राजकारणात भाग घेऊन इथली परिस्थिती बदलायला हवी.’’ फिरोजा परखडपणे सांगते.