तेजश्री गायकवाड
‘डिझायनर मंत्रा’या सदराची सुरुवात केली तेव्हा इथल्या मातीत घडलेल्या आणि इंटरनॅशनली नावलौकिक मिळवलेल्या फॅ शन डिझायनर्सची मांदियाळी डोळ्यासमोर होती. फॅ शन डिझायनिंग क्षेत्रात येण्याचे त्यांचे स्वप्न नेमकं कधी, कुठल्या क्षणी आणि कसं अंकुरलं ते प्रत्यक्षात त्या क्षेत्रातील प्रस्थापित होण्यापर्यंतचा या प्रत्येकाचा प्रवास अनुभवणं हे शेवटी फॅ शन कुठे, कशी आपला प्रवाह शोधत पुढे जाते याचाच अनुभव म्हणता येईल. आजच्या गोष्टीतला डिझायनर फॅ शनसाठीनेमका उलट रस्ता शोधत स्वीडनमधून इथे भारतात आलाआणि इथल्या खादीच्या प्रेमात पडला. हे खादीप्रेम मानाने मिरवत इथेच फॅ शन डिझायनर म्हणून ओळख मिळवणाऱ्या लार्स अँडर्सन याची रंजक गोष्ट फॅ शनला कुठलीच सीमा नसते, याची पुन्हा एकदा प्रचीती देते.
लार्स अँडर्सनला फॅ शन क्षेत्राची भूल कशी पडली? याची गोष्टही एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही, किंबहुना चित्रपटामुळेच या क्षेत्राशी त्याचे अनुबंध जोडले गेले हे म्हणणं जास्त योग्य ठरेल. कुठला तरी एक चित्रपट पाहताना त्याच्या अगदी शेवटी फॅ शन शो दाखवण्यात आला होता. हा फॅ शन शो पाहूनच त्याच्या प्रेमात पडलेल्या एका नजरेने मनाशी निर्धार केला, की मला फॅ शन डिझायनरच व्हायचं आहे. ती व्यक्ती म्हणजे इंटरनॅशनल फॅ शन डिझायनर अशी ओळख असलेला लार्स अँडर्सन. मूळचा स्वीडिश फॅ शनडिझायनर असलेल्या लार्सने गेल्या वर्षी पार पडलेल्या ‘लॅक्मे फॅशनवीक’मध्ये सरकारच्या खादी आणि ग्रामोद्योग समितीशी हातमिळवणी करत ‘अ खादी मटका लव्ह स्टोरी’ नावाचं कलेक्शन सादर केलं आणि भारतीय लोकांची मनं जिंकली.
त्याचा एकूणच डिझायनर म्हणून झालेला प्रवास आणि भारतात येऊन सुरू झालेलं खादीप्रेम या सगळ्याच गोष्टी नवलाईच्या आहेत. त्याच्या या डिझायनर बनण्याच्या प्रवासाबद्दल तो सांगतो, ‘‘मी लिंडसेबर्ग नावाच्या एका लहानशा गावात स्वीडनमध्ये जन्मलो आणि तिथेच मोठा झालो. सुरुवातीला मला फॅ शनडिझायनर म्हणून काम करायचं आहे, असा विचार कधीच मनात आला नव्हता; परंतु मी ‘स्लेव्हज ऑफ न्यू यॉर्क’ नामक एक चित्रपट पाहिला आणि सिनेमाच्या शेवटी दाखवलेल्या फॅ शन शोच्या प्रेमात पडलो. ते पाहताना हे क्षेत्र काय आहे, याची कल्पना नव्हती, पण मला असं करायचं आहे इतकंच मनाशी पक्कं झालं.’’ सुरुवातीला मी दोन वर्ष जाहिराती आणि सजावटीचा अभ्यास केला. नंतर दोन वर्ष स्वीडनमध्ये फॅ शनस्टडी केलं. त्यानंतर दोन वर्षांसाठी न्यू यॉर्क शहरात फॅ शनडिझायनिंगचा अभ्यास केला, अशी माहिती लार्सने दिली.
शिक्षण ते प्रत्यक्षात या क्षेत्रात येण्याचा काळ यातही खूप गॅप गेल्याचं तो सांगतो. शिक्षण संपल्यावर साधारण १० वर्ष तरी मी माझा स्वत:चा व्यवसाय किंवा ब्रँड सुरू केला नाही. मी एफआयटी, एनवायसी येथे निटिंग मशीनवरच एक सेमिनार घेतलं आणि मी स्वत:च त्याच्या प्रेमात पडलो. मला डिझायनिंगमधला क्राफ्ट हा भाग खूप आवडतो. मी निटिंगच्या कपडापासून बनवलेले कपडे माझ्या मित्रांना विकायला सुरुवात केली आणि बघता बघता मी स्वत:चे स्टोअर्स उघडले, असं लार्स सांगतो. प्रत्यक्ष अनुभवातून फॅ शन डिझायनर म्हणून मायदेशात बस्तान बसवल्यानंतरभारतीय फॅ शनइंडस्ट्रीमध्ये स्वत:चा ब्रँड लाँच होणं हे आपल्यासाठी स्वप्न सत्यात उतरल्यासारखं होतं, असं लार्स म्हणतो. ‘‘२०१६ साली प्रसाद बिदापा यांनी खादी फॅब्रिकची ओळख करून दिली आणि मी खादी कपडय़ाच्या प्रेमातच पडलो. मी ते कापड बघून खादी कशी तयार झाली, त्याचं क्राफ्ट काय आहे, ड्रेप, खादी चळवळीच्या मागे असलेल्या कथा या सगळ्याला जोडून पाहू लागलो. माझं काम बघून ऑगस्ट २०१८ मध्ये मला तीन अतिशय अमेझिंग भारतीय फॅ शन डिझायनर्ससमवेत काम करण्याची संधी मिळाली. मला त्यांनी सस्टेनेबल फॅ शनडेच्या दिवशी ‘केव्हीआयसी’साठी कलेक्शन सादर करायला बोलावलं. हा अनुभव विलक्षण होता. मी तिथे अनेक मोठय़ा डिझायनर्सना भेटलो. तेव्हा मला खूप चांगली आणि नवीन फॅ शनही जवळून बघायला मिळाली. माझ्या ब्रँडला भारतातील सर्व टॉप स्टोअर्समध्ये माझं कलेक्शन दाखवण्याची संधी मिळाली. मी लंडनमध्ये राहत असलो तरी मी अजूनही भारतीय बाजारपेठेतून उत्पादन कसे मिळवायचे ते पाहातो आहे. भारतीय बाजारपेठेत स्वत:चा स्टुडिओ उघडायचे माझे स्वप्न आहे,’’ असं लार्स सांगतो.
सध्या भारतीय फॅ शनडिझायनर्स सातत्याने खादी कपडय़ाचा डिझायनिंगसाठी वापर करत असल्यानेच खादीला फॅ शनफॅब्रिक म्हणून ओळख मिळते आहे, असं तो ठामपणे सांगतो. अगदी आता इंटरनॅशनल स्तरावरदेखील लार्ससारखे काही डिझायनर खादीवर काम करत आहेत. लार्सने त्याचा प्रवास सांगताना त्याच्या या प्रवासातील एक खास आठवणही सांगितली. ‘‘न्यू यॉर्क शहराचं नाइटलाइफ खूप अमेझिंग आणि वेगळंच आहे. हे शहर नेहमीच सुरू असतं. पार्टी आणि क्लब हे या शहराचं आकर्षण आहे, असं म्हणायला हरकत नाही. मी तिकडे शिकत असताना रात्री बाहेर फिरायला जायचो. स्क्वेझबॉक्स नावाचा एका क्लब होता तिकडे मी प्रत्येक शुक्रवारी जायचो. हे ‘गे रॉक एन रोल’ क्लब होतं जे काही वर्षांपासून एनवायसीमध्ये सर्वात लोकप्रिय क्लब होतं. सर्व सेलेब्रिटी तिकडे जात. त्यामुळेच मलाही तिकडे जायला फार आवडायचं. त्यांनी घातलेले कपडे, तो मेकअप, तिकडचं वातावरण हे सगळं मला इन्स्पायर करणारं होतं आणि यातूनच मी पुढे कलाकारांसाठी कपडे डिझाईन करायला सुरुवात केली,’’ असं त्याने सांगितलं. न्यू यॉर्क सिटीमधला तो काळ माझ्यासाठी खूपच रोमांचक होता, असं सांगणारा लार्स एखाद्या फॅ शनडिझायनरला त्याच्या पुढच्या कलेक्शनसाठी कधी कशात इन्स्पिरेशन मिळेल हे सांगता येत नाही. लार्सच्या कलेक्शनमागे अगदी भटक्या आदिवासीपासून ते एखादं शहरही असतं, हेही सांगतो.
या क्षेत्रात काम करू पाहणाऱ्यांसाठी लार्स मोलाचा सल्ला देतो. तो ठामपणे सांगतो की, खूप काम करा, पण काम स्मार्टरीत्या करा. आपल्या स्वत:च्या दृष्टिकोनावर आपण स्वत:च विश्वास ठेवला नाही तर आपण आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही, हेही तो तितक्याच ठामपणे सांगतो.
viva@expressindia.com