जपानमध्ये टीनएजर्ससाठी ‘इंटरनेट फास्टिंग कँप्स’ आयोजित करण्यात येताहेत. इंटरनेट उपासाची ही कल्पना कशी वाटते, ते मुंबईतल्या तरुणाईलाच ‘विवा’नं विचारलं.
सारं जग सध्या एका जाळ्यात अडकलं आहे, ते म्हणजे इंटरनेटचं मायाजाल. पूर्वी फक्त कॉम्प्युटरपुरतंच मर्यादित असलेलं इंटरनेट कनेक्शन सध्याची तरुण पिढी खिशात घेऊन फिरतेय. २४ बाय ७ मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर ‘पडिक’ असणाऱ्या तरुण पिढीचं इंटरनेटशिवाय पान हलत नाही, हे खरंय. अभ्यासाच्या नोट्ससुद्धा हल्ली व्हॉट्सअॅपवरून शेअर होतात. जगभरातल्या तरुणाईची सध्या ही अशीच अवस्था आहे. या मायाजालातून बाहेर येऊन तरुणाईनं त्याशिवाय जगणं शिकायला हवं, यासाठी जपानच्या शिक्षण मंत्रालयानं ‘इंटरनेटचा उपास’हा उपक्रम हाती घेतल्याची बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली. म्हणजे जपानी सरकार काही दिवस मुलांसाठी इंटरनेट बंद करणार म्हणे.
‘मॅककफे ट्विन्स अँन्ड टेक्नॉलॉजी’ने इंटरनेट वापरणाऱ्या भारतीयांचं सर्वेक्षण केलं. त्यांच्या या २०१३ च्या अहवालात असं म्हटलंय की, भारतात आता सगळ्यात जास्त इंटरनेटचा वापर मोबाइलवरून होतो. त्यांच्या आकडेवारीनुसार भारतात सध्या लॅपटॉप, मोबाइल आणि डेस्कटॉप या सगळ्या उपकरणांवरून इंटरनेट अॅक्सेस केलं जातं. यामध्ये ६० टक्के लोक दररोज १ ते ४ तास डेस्कटॉपवर इंटरनेट सर्फ करण्यात घालवतात. ४० टक्के टॅबलेटवरून अॅक्सेस करतात आणि ६८ टक्के मोबाइलचा वापर करतात. मोबाइलवर आणि अन्य उपकरणांवरून इंटरनेटवर साधारण ४ तासांपेक्षा अधिक वेळ घालवला जातो. या सर्व निरीक्षणातून असं दिसून आलंय की इंटरनेट यूजर्समध्ये तरुण पिढी मोठय़ा प्रमाणावर आहे आणि तिच्यावर इंटरनेटचा मोठा प्रभाव आहे.
खरंच आजची पिढी इंटरनेटशिवाय जगू शकेल का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा