पुण्यातल्या सॉफ्टवेअर आणि आयटी फिल्डमध्ये काम करणाऱ्या काही उत्साही मंडळींनी एकत्र येऊन आयटी दिंडी सुरू केलीय. सॉफ्टवेअर कंपन्यांमधली तरुणाई यात सामील होते. यंदाच्या आयटी दिंडीत दोनशे जण सामील झाले होते.
पालख्या पुण्यात यायच्या अगोदर कंपन्यांमध्ये ऑनलाइन नोटिफिकेशन्स सुरू होतात. त्यात ट्रॅफिक डायव्हर्जन, कंपनीच्या बसचा बदललेला रुट वगैरेचीच माहिती असते, पण वारी म्हणजे गर्दी, वारी म्हणजे रस्ते बंद यापलीकडे जाऊन वारीतली स्पिरिच्युअॅलिटी, वारीमधली शिस्त, वारकऱ्यांचं ध्येय आणि तिथलं एकूण भारलेलं वातावरण तरुणांनी अनुभवावं, या उद्देशानं आयटी दिंडीची सुरुवात झाली, असं राघवेंद्र काटीकर सांगतात. ते गेली तीन र्वष या दिंडीशी जोडले गेलेले आहेत. राघवेंद्र विप्रोमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत.
आयटी दिंडीचं व्यवस्थापनही ऑनलाइनच चालतं. www.waari.org ही त्यांची वेबसाइटही आहे. फेसबुक पेजवरून वारी प्रोग्रॅमचे अपडेट्स दिले जातात. अगदी पंढरपूपर्यंत चालत जाणं सगळ्यांना शक्य होत नाही. तेवढी सुट्टीही नसते. मग आळंदी ते पुणे हा प्रवास आयटी दिंडी करते. गेली सात र्वष ही अॅक्टिव्हिटी सुरू आहे.
आयटी दिंडी
पुण्यातल्या सॉफ्टवेअर आणि आयटी फिल्डमध्ये काम करणाऱ्या काही उत्साही मंडळींनी एकत्र येऊन आयटी दिंडी सुरू केलीय. सॉफ्टवेअर कंपन्यांमधली तरुणाई यात सामील होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-07-2013 at 01:09 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It dindi