वर्ष संपत आलंय आणि नवीन वर्षांच्या स्वागताची तयारी आपल्या सगळ्यांचीच चालू आहे. कोणी मित्राकडे, कोणी परदेशी, कोणी आऊट स्टेशन तर कोणी घरीच असे सेलिब्रेशन्सचे प्लॅन चालू आहेत. आपली या नवीन वर्षांच्या स्वागताची पार्टी जास्त बहारदार करायला या आठवडय़ात देतो काही टेस्टी टेस्टी पार्टीसाठीच्या रेसिपीज. अर्थात इतर वेळीही करायला काहीच हरकत नाही.
गेले वर्षभर ‘टेस्टी टेस्टी’च्या निमित्ताने आपली संपूर्ण अन्नविश्वाची आनंददायी सफर झाली. आता ‘अलविदा’ म्हणण्याची ही वेळ आहे. येत्या वर्षांत अधून मधून आपली भेट होईलच पण तोपर्यंत.. गुड बाय, हॅपी न्यू इयर!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

क्रिस्पी चिकन लॉलीपॉप
साहित्य : चिकन विंग्स- १२ (बोन्सपासून एका बाजूने सुटे करून घेतलेले), मदा- १ वाटी, कॉर्नफ्लॉवर- १ वाटी, चिरलेले आले- १ चमचा, चिरलेले लसूण- २ चमचे, हिरवी मिरची – १ चमचा, अंडे- १, लाल मिरची पेस्ट- २ चमचे, व्हाइट पेपर पावडर- चिमूटभर, मीठ- चवीनुसार, पाणी- आवश्यकतेनुसार, साखर- चिमूटभर, लिंबाचा रस- १ चमचा. टेस्टमेकर क्यूब-) (असल्यास)
कृती : एका बाऊलमध्ये मदा, कॉर्नफ्लॉवर, अंड, लसूण, आलं, हिरवी मिरची, लाल मिरची पेस्ट, व्हाइट पेपर पावडर, मीठ, साखर व लिंबाचा रस एकत्र करून त्यात थोडे पाणी टाकून त्याचे मिश्रण तयार करा. चिकन विंग्ज या मिश्रणात टाका आणि मिश्रण एकत्र करून घ्या. १५ ते २० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. काढून गरम तेलात मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्या. सॉसबरोबर गरमागरम सव्‍‌र्ह करा.

शामी कबाब
साहित्य : मटण खिमा- २०० ग्रॅम, काजू तुकडा ३ ते ४ चमचे, तेल- २ ते ३ चमचे, चिरलेले आले- १ चमचा, चिरलेले लसूण- १ चमचा, हिरवी मिरची- १ चमचा, चिरलेली कोथिंबीर- २ चमचे, चणाडाळ (भिजवून ठेवलेली)- १ वाटी, चिरलेला कांदा- १, चिरलेला पुदिना- २ ते ३ चमचे, अंडे- १, गरम मसाला- १ चमचा, जिरे पावडर, धणे पावडर, रोस्टेड चणा पावडर- २ ते ३ चमचे, लवंग- ३ ते ४, दालचिनी- १ छोटा तुकडा, मीठ- चवीनुसार, पाणी- आवश्यकतेनुसार.
कृती : एका कढईमध्ये तेल गरम करा. त्यात कांदा थोडा परतून घ्या. नंतर आले, लसूण व हिरवी मिरची टाकून चांगलं परतून घ्या. नंतर त्यात लवंग, दालचिनी टाका व परतून घ्या. नंतर खिमा, काजूचे तुकडे व भिजवलेली चणाडाळ टाकून चांगले परतून घ्या. मटण पूर्ण शिजेपर्यंत सारखे हलवत राहा. साधारण २०-२५ मिनिटे ते मिश्रण हलवत राहा. त्यानंतर ते काढून घ्या व मिक्सरमधून फिरवून बारीक करून घ्या. नंतर त्यात जिरे पावडर, धणे पावडर, रोस्टेड चणा पावडर, मीठ, कोथिंबीर, बारीक चिरलेला पुदिना, अंडे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. नंतर त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून हातावर दाबून गरम तेलामध्ये तांबूस होईपर्यंत तळून घ्या. हिरवी चटणी किंवा सॉससोबत गरमागरम सव्‍‌र्ह करा.

मकाई पनीर के पकोडे
साहित्य : अमेरिकन कॉर्न (उकडून एकदा मिक्सरमध्ये फिरवून), पनीर (किसलेले), कॉर्नफ्लॉवर, साखर, चिरलेली हिरवी मिरची, सिमला मिरची (बारीक चिरलेली), मदा, व्हाइट पेपर पावडर, ब्रेडक्रम पावडर, मीठ- चवीनुसार, पाणी- आवश्यकतेनुसार.
कृती : एका बाऊलमध्ये मदा घेऊन त्यामध्ये किसलेले पनीर, अमेरिकन कॉर्न, हिरवी मिरची, सिमला मिरची, पेपर पावडर, मीठ टाकून थोडं पाणी टाकून मिश्रण तयार करा. त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून ते ब्रेडक्रम्समध्ये फिरवून कोटिंग करून घ्या. नंतर ते गरम तेलामध्ये तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्या. हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर गरमागरम सव्‍‌र्ह करा.