शब्दांकन : राधिका कुंटे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मी सेंट झेव्हिअर्स महाविद्यालयातून जिऑलॉजीमध्ये बीएस्सी केलं. सॅटेलाइट या विषयात खूप रस असल्याने त्याविषयी खूप वाचन केलं. माझी मीच ही वाट निवडली आणि त्या वाटेवर चालायचं ठरवलं. बीएस्सीनंतर आयआयटीची तयारी करण्यासाठी वर्षांचा ब्रेक घेतला होता. याच काळात सेंट झेव्हिअर्स महाविद्यालयात ‘डिप्लोमा इन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट’ केला. तेव्हा आपल्याला प्रोग्रॅमिंग आवडत आहे, हे कळलं. दरम्यान, जिओइन्फरेमॅटिक्स या विषयाची तोंडओळख झाली. तेव्हा या संदर्भातला अभ्यासक्रम फक्त मंगलोर विद्यापीठातच होता. तिथे प्रवेश घेऊन जिओलॉजी आणि सॅटेलाइट डेटा हे विषय अभ्यासत मी जिओइन्फरेमॅटिक्समध्ये एमएस्सी केलं. तत्कालीन विभागप्रमुख डॉक्टर एच. गंगाधर भट यांनी मला कायम प्रोत्साहन दिलं. त्यामुळे मी काही प्रशिक्षण कार्यशाळांमध्ये सहभागी होऊ शकले. हे नवीन तंत्रज्ञान शिकू शकले. अशीच एक संधी लाभल्यामुळे मी अहमदाबादमधल्या स्पेस अ‍ॅप्लिकेशन्स सेंटरमध्ये प्रशिक्षण घेऊ शकले. त्यानंतर तिथे इंटर्नशिपसाठी अर्ज केला आणि गुणवत्तेलाच महत्त्व दिलं जात असल्यामुळे तिथे दोन महिने काम करायला मिळालं. तेव्हा ज्यांच्यासोबत काम केलं ते डॉक्टर व्ही. सत्यमूर्ती यांनी मला पीएचडी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. खरं तर तेव्हा माझं मास्टर पूर्ण झालं नव्हतं तरीही मला इस्रोमधल्या आंतरराष्ट्रीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्राच्या परिषदेत सहभागी होता आलं. त्या वेळी संशोधन म्हणजे काय, ते कसे असावे अशा काही मुद्दय़ांची आणि काही विषयांची तोंडओळख झाली. तिथे डॉ. व्ही. सत्यमूर्ती यांच्यासोबत मी सादर केलेल्या ‘ट्रॉपिकल अ‍ॅण्ड मिड – लॅटिटय़ूड इंटरअ‍ॅक्शन्स डय़ुरिंग क्लाऊडबस्र्ट इव्हेन्ट ओव्हर वेस्टर्न हिमालयाज’ या पेपरला द बेस्ट पेपर म्हणून गौरवण्यात आलं. या अनुभवामुळे आणि प्राध्यापकांच्या प्रोत्साहनामुळे मी पीएचडीचा अधिक गांभीर्याने विचार करायला लागले. मला मास्टर्स प्रबंधानिमित्ताने संधी मिळाली ती गोव्यातील ‘नॅशनल सेंटर फॉर अंटाक्र्टिक अ‍ॅण्ड ओशन रिसर्च’च्या संदर्भात काम करायची. ‘फिजिकल प्रोसेस इन अंटाक्र्टिका’ हा माझा अभ्यास विषय होता. सहा महिने  NCAOR मध्ये राहून सॅटेलाइट डेटाचं तंत्र शिकून त्या संदर्भात मी काम केलं.  

मला पीएचडीसाठी अर्ज करायचा होता, पण ही प्रक्रिया खूप महाग आणि किचकट असते.  मग दोन वर्षे मी रिसर्च असिस्टंट म्हणून ‘बंगलोरच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ संस्थेत काम करू लागले. हे काम होतं हिमालयातील शिखरांसंदर्भात. ‘क्वाँटिफाइड ग्लेसियर रिट्रीट इन हिमालयाज युजिंग सॅटेलाइट डेटा फ्रॉम डिफरन्ट इयर्स’ हा माझा अभ्यास विषय होता. त्याच सुमारास मुंबईतील ‘Numer8’ या स्टार्टअपसाठी मी काम केलं. भारतातील कोळीबांधवांना दिशादर्शक म्हणून हे ‘OFish’ अ‍ॅप उपयुक्त आहे. या अ‍ॅपमध्ये सॅटेलाइट डेटाचा वापर खूप मोठय़ा प्रमाणावर केला गेला, त्यात मी मोलाची भूमिका बजावली. या दोन वर्षांतल्या कामाचा अनुभव गाठीशी बांधला. जीआरई आणि टोफेल या परीक्षा दिल्या. पीएचडीसाठी अर्ज करते आहे, अशा आशयाचा ई-मेल ज्यांच्यासोबत काम करायची माझी इच्छा आहे, अशा परदेशातील प्राध्यापकांना आणि मला अर्थसाहाय्य करू शकतील, अशा व्यक्तींना जानेवारी २०१९ मध्ये पाठवला. ऑगस्ट २०१९ मध्ये काही प्राध्यापकांनी मार्गदर्शनासाठी होकार दर्शवला. मी जवळपास सात विद्यापीठांमध्ये अर्ज पाठवले होते. त्यातल्या दोन ठिकाणी माझी मुलाखत घेतली गेली. त्यापैकी अमेरिकेतल्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास सॅन अँटानिओ’मध्ये माझी निवड झाली. मला विद्यापीठ आणि नासातर्फे निधी मिळणार होता. पैशांवरून आठवलं म्हणून सांगते की, आजूबाजूच्या काही लोकांनी पैशांवरून अगदी जिव्हारी लागणारे टोमणे मारले होते. या परिस्थितीला तोंड देत स्वत:च्या निर्णयावर ठाम राहायला मी शिकले. इन्स्टाग्रामवर वैज्ञानिकांचा ग्रुप फॉलो करत होते. त्यांच्यापैकी माझ्या विषयाशी संबंधित असणाऱ्या काहींशी मी कनेक्ट होऊन रिसर्च पेपर आणि एकूण सगळय़ा प्रक्रियेविषयी माहिती विचारली. त्यांनी मला खूप चांगली मदत आणि मार्गदर्शन केलं. आता मीही तो वसा पुढे सुरू ठेवला आहे. समाजमाध्यमांचा असाही सदुपयोग करता येतो, हे अनेकांना माहिती नसतं.

दरम्यान, मार्च २०२० मध्ये विद्यापीठाकडून होकार कळवण्यात आला तेव्हा आपल्याकडचा लॉकडाऊन सुरू झाला होता. आता आपल्या प्रवेशाचं काय, हा यक्षप्रश्न मनात डोकावलाच. कारण प्रवेश मिळवण्यात अडचणींचे डोंगर उभे होते आणि सतत बदलणारे देशपरत्वे कोव्हिडसंदर्भातले निर्णयही; पण माझे प्राध्यापक आणि विद्यापीठातले प्रशासकीय कर्मचारी यांनी मला वेळोवेळी खूपच सहकार्य दिलं. त्यांना केलेले ढीगभर ईमेल्स आणि त्यांच्यासोबतच्या मीटिंग्ज आताही आठवत आहेत. त्यांच्या साहाय्याने मी पेपरवर्क पूर्ण करू शकले. I20 हा फॉर्म विद्यापीठ पाठवतं आणि तो भरल्यानंतर व्हिसाची प्रक्रिया सुरू होणार होती. पण तेव्हा विद्यापीठातली पोस्टाची सेवा बंद होती. जवळपास २-३ महिन्यांनी मला  I20 फॉर्म मिळाला; पण तेव्हा आपल्याकडची व्हिसा कार्यालयं बंद होती. तत्कालीन अमेरिकन सरकारने व्हिसाच्या धोरणात काही बदल केल्याने पुन्हा प्रवेश मिळायचीच काळजी वाढली. तेव्हा विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची ऑनलाइन मीटिंग घेऊन शंकानिरसन करण्यात आलं.

माझे मार्गदर्शक प्राध्यापक स्टीफन् अ‍ॅकले आणि अल्बर्टो मेस्टास यांनी खूपच पाठिंबा देत सहकार्य केलं. मी मुंबईतून पहिली सेमिस्टर ऑनलाइन केली ती व्हिसा कार्यालय लवकर सुरू होईल या आशेवर. सुदैवाने फक्त विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी व्हिसा कार्यालय सुरू झालं. मला नोव्हेंबर २०२० मध्ये व्हिसा मिळाला आणि डिसेंबर २०२० मधलं तिकीट काढलं. तिकीट बुकिंगसाठीही अडचणी आल्या. दिल्लीहून जावं लागणार होतं आणि दोनच विमान कंपन्यांचे पर्याय उपलब्ध होते. मी युनायटेड एअरलाइन्सचं बुकिंग केलं. त्या वेळी या कंपनीच्या प्रवाशांना फक्त एकच बॅग न्यायला परवानगी असल्याचं कळल्यावर मोठा पेच पडला. तोही निभावला आणि मोजक्या सामानासह मी अमेरिकेत पाऊल ठेवलं.

इथे आल्यावर सेमिस्टर ऑनलाइनच असणार होती. कॅम्पस जवळपास निर्मनुष्य होता. इथे येणं, राहणं, स्थिरावणं आणि ऑनलाइन लेक्चर अटेंड करणं हे सुरुवातीला अवघड वाटलं. अनोळखी माणसं आणि नैराश्य येईल तर नवल अशी भोवतालची परिस्थिती भासत होती. माझे मार्गदर्शक आणि लॅबमधल्या सहकाऱ्यांनी मला जीवनावश्यक गोष्टी आणून दिल्या. देशात सगळे व्यवहार सुरू झाले तरी आमच्या विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा दिवस विलग व्हायला सांगितलं होतं. तसं मलाही विलग राहावं लागलं. टेक्सासपासून लांब राहणाऱ्या माझ्या आत्याची खूप मदत झाली. तिने दैनंदिन जीवनासाठी आवश्यक अशा अनेक वस्तू पाठवून दिल्या. इथे सोशल सिक्युरिटी नंबर मिळाला नाही तर बँक अकाऊंट उघडता येत नाही. कोव्हिडच्या परिस्थितीमुळे मला जवळपास तीन महिन्यांनी हा नंबर मिळाला. सुदैवाने परिस्थितीनुरूप निर्णय घेऊन आणि सगळय़ा कागदपत्रांची पूर्तता केल्यावर बँकेने खातं उघडायला परवानगी दिली आणि मला विद्यावेतन मिळू लागलं. या सगळय़ा प्रक्रियेला जवळपास महिना लागला आणि चिक्कार पेपरवर्क करावं लागलं. एकूणच, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आणि विशेषत: अर्थसाहाय्य घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमीच खूप पेपरवर्क करावं लागतं. 

इथे आल्यावर जेमतेम महिनाभरातच टेक्सासमध्ये हिमवादळ आलं. जवळपास उणे चौदा अंश तापमानात विजेविना माझ्या अपार्टमेंटमध्ये एकटीच होते. जेमतेम आईला सुखरूप असल्याचं कळवता आलं. शेजाऱ्यांनी तत्परतेने मदतीचा हात दिला. कोव्हिडमुळे सोशल लाइफवर खूप परिणाम झाला होता. एरवी नवीन विद्यार्थ्यांच्या गाठीभेटी घडतात; पण आमच्या गाठीभेटी कोव्हिडच्या संकटामुळे झाल्याच नाहीत. ऑनलाइन शिकताना अनेकांचा कॅमेरा ऑफ असल्याने त्यांचे चेहरे दिसले नाही. काही दिवसांनी माझ्याबरोबरीने पीएचडी करणाऱ्या दोन-तीन भारतीयांची ओळख झाली. अशा छोटय़ा-मोठय़ा अडीअडचणींवर मात करत पीएचडीचा अभ्यास करायला लागले. संशोधन करायचं, ही वाटते तितकी सोप्पी गोष्ट नाही. अशा वेळी आई किंवा मित्रमैत्रिणींशी चार शब्द बोलल्यावर बरं वाटतं. फावला वेळ मिळाला तर पेंटिंगसारख्या अ‍ॅक्टिव्हिटीज करते. क्वचित कधी अधिकच ताणतणाव वाटला तर विद्यापीठातील समुपदेशकांची मदत घेते. 

इथे दोन सेमिस्टर ऑनलाइन झाल्या, तरी माझं काम इथलं सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्याने सुरळीतपणे करता आलं. नवीन टूल्स आणि अभ्यास साहित्य वापरायला मिळालं. सध्या चौथं सेमिस्टर सुरू असून सगळे क्लासेस आणि व्यवहार नेहमीसारखे सुरू आहेत. विद्यापीठातल्या ग्रंथालयासह अनेक सोयीसुविधांचा लाभ घेता येतो. स्टुडंट अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये आणि ग्रुप्समध्ये सहभागी होता येतं. अनेक स्पर्धा, परीक्षा देता येतात. त्यानिमित्ताने अनेकांशी ओळख होते. त्यापैकी ऑनलाइन झालेल्या ‘ट्रान्सडिसिप्लिनरी टीम ग्रॅण्ड चॅलेंज’मध्ये विविध विद्याशाखांमधल्या विद्यार्थ्यांची आमची पाच जणांची टीम जिंकली. आम्हाला दुसरं पारितोषिक मिळालं. ‘वॉटर अ‍ॅट यूटीएसए’ ही स्पर्धेची थीम होती आणि ‘मेथड टु इम्प्रुव्ह वॉटर क्वॉलिटी युजिंग ग्राफिटिक स्ट्रक्चर्स’ हा आमचा विषय होता. नासा सेंटरमध्ये झालेल्या  CAMEE स्टुडन्ट रिसर्च स्प्रिंग शोकेसमध्ये मला तिसरं पारितोषिक मिळालं. त्यात आपला अभ्यासविषय अन्य विद्याशाखांतील विद्यार्थ्यांना समजावून द्यायचा असतो. या सेंटरतर्फे शालेय विद्यार्थी, सामान्यांसाठी आयोजल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये मी सहभागी होते.

  पीएचडीसाठी अंटाक्र्टिकातील सी आइसचा सॅटेलाइट डेटाचा वापर करून या भागातल्या बदलत्या हवामानाचा अभ्यास करायचा होता. समुद्रकिनारी सापडणाऱ्या माशांवर हवामान बदलांचा काही परिणाम झालेला दिसत नाही. मात्र समुद्रात बर्फ वितळण्याची प्रक्रिया सुरू झाल्यावर हा परिणाम होतो का, गेल्या काही वर्षांत असं झालं आहे का आणि येत्या काही काळात तसं होऊ शकतं का, यामुळे काय परिणाम होऊ शकतील याचा अभ्यास मी करते आहे. माझे मार्गदर्शक प्राध्यापक स्टीफन् अ‍ॅकले यांच्या नावाने अंटाक्र्टिकातील रॉस आयलंडमधील अ‍ॅकले पॉइंट ओळखला जातो. आमच्या क्षेत्रातील अनेक मान्यवर अभ्यासकांची मतं त्यांच्यामुळे ऐकता येतात, तज्ज्ञांशी संवाद साधता येतो. नासामध्येही मला अ‍ॅकले यांच्या सहकार्यामुळे जाता आलं. माझ्या पीएचडीचा एकूण कालावधी पाच वर्षांचा असून तो ऑगस्ट २०२५ मध्ये संपणं अपेक्षित आहे. पहिलं वर्ष संपल्यावर लेखी परीक्षा द्यायची असते, ती मी गेल्या वर्षी दिली. ऑगस्टमध्ये प्रपोजल डिफेन्स करायचं असून कमिटीपुढे माझ्या प्रबंधाची उद्दिष्टं मांडायची आहेत. आतापर्यंत झालेल्या कामाचा लेखाजोखा मांडायचा आहे. त्यात सफल झाल्यावर माझ्या प्रबंधावर पुढे काम करू शकते. पीएचडीचा कालावधी संपायच्या आधी ‘इंडस्ट्री रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’मध्ये इंटर्नशिप करायचा विचार आहे. 

रोज सकाळी सगळं आवरून मला लॅबमध्ये जावं लागतं. यायला संध्याकाळ होते. घरच्यांशी फोनवर पोटभर गप्पा मारून उद्याच्या विचारांत झोपून जाते. माझा भाऊ- किंजल जोशी याने मला पीएचडीसाठी तात्त्विक आणि आर्थिकदृष्टय़ा भक्कम पाठिंबा दिला. त्याने नॉर्वेमधील ओस्लो युनिव्हर्सिटीमधून पीएचडी केली असून तो भाषाशास्त्रज्ञ आहे. त्याचं मार्गदर्शन आणि पाठिंब्यामुळे मी परदेशात पीएचडीसाठी अर्ज करायचा विचार करू शकले. माझे आई-बाबा, आजी-आजोबा यांचाही भक्कम पाठिंबा मला मिळाला आणि मिळतो आहे. माझ्या वयाच्या अनेकांना विशेषत: मुलींना लग्नासाठी तयार व्हावं लागतं किंवा केलं जातं. सुदैवाने माझ्या कुटुंबाने अशी सक्ती कधी केली नाही. माझ्या आनंदाला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिलं. माझ्या क्षेत्रातलं त्यांना सगळं कळतं असं नाही, पण मी त्यांना सोप्या रीतीनं समजावते. ते समजून घेतल्यावर त्यांना माझा सार्थ अभिमान वाटतो. तेही त्यांच्या ग्रुपमध्ये हवामानबदलाची चर्चा करतात. माझ्या कुटुंबाचा पाठिंबा आणि विश्वास, हीच माझी खूप मोठी ताकद असून त्या जोरावर मी पुढचे अनेक मैल चालणार आहे, हे मात्र निश्चित. 

कानमंत्र

  • परदेशी जाण्यासाठी स्कॉलरशिप आणि फंडिंगसारख्या पर्यायांचा विचार जरूर करून त्यासाठी लगेच अर्ज करा.
  • आपला प्राधान्यक्रम असेल त्या विद्यापीठात आपली निवड न झाल्यास निराश व्हायचं कारण नाही. कारण अन्य विद्यापीठात प्रवेश मिळाल्यानेदेखील तुम्हाला एक्स्पोजर मिळतं. तिथे नवीन तंत्र शिकायला मिळतं, ही अधिक महत्त्वाची गोष्ट आहे, हे लक्षात ठेवा. 

viva@expressindia.com