राधिका कुंटे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वयाच्या सातव्या वर्षी माझी तालाशी ओळख झाली. अर्थात तेव्हा मी कांदिवलीतील तंजावूर नृत्यशाळेत गुरू अजिता पाटील यांच्याकडे भरतनाटयमचा श्रीगणेशा गिरवला. नववीत विशारद झाले. माझी आई व्हिज्युअल इफेक्ट्स तज्ज्ञ आणि बाबा लेखक- दिग्दर्शक आहेत. त्यामुळे घरात नेहमी कलात्मक वातावरण आणि कलेला प्राधान्य दिलं जातं. मी नृत्य, चित्रांसह शक्य तितक्या कला स्पर्धामध्ये सहभागी व्हायचे. मी नृत्यात करिअर करण्याचा विचार कधी केला नव्हता, पण माझी उपजत नृत्यकला अधिक बहरायला हवी, असं आई-बाबा आणि गुरूंना वाटलं. त्यांनी मला तसं विचारलं. मला चौकटीतलं काही करायला आवडलं नसतं आणि नृत्य करणं खूप आवडत होतं. ‘टॅलेंट अ‍ॅक्वायर करने का सोचो। पैसा उस के पिछे पिछे आ जाएगा।’ असं बाबा कायम सांगायचे. तिघांच्या मोठय़ा पाठिंब्यामुळे मला निर्णय घेणं सोपं गेलं. दहावीनंतर मी नालंदा नृत्यकला महाविद्यालयात प्रवेश घेतला. ते मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे. तिथे भरतनाटय़मसह संस्कृत, पुराणकथा, नाटय़शास्त्राचा अभ्यास केला. तिथे उमा रेळे मॅडमसह सगळय़ा प्राध्यापकांचं मागदर्शन लाभलं. तिथून बी.ए. इन परफॉर्मिग आर्ट्स (भरतनाटय़म) झाल्यावर मी पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून एम.ए. इन भरतनाटय़म केलं. या काळात गुरू कालिश्वरन के. पिल्लई यांचं मार्गदर्शन मिळालं. दरम्यान, काही कार्यशाळा घेणं, ‘लॅक्मे फॅशन वीक’सारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांतील सादरीकरण करणं सुरू होतं.  

सातत्याने नृत्याभ्यास करताना नृत्याकडे बघायचा जागतिक दृष्टिकोन काय आहे आणि तो अभ्यासत असताना मी भरतनाटय़म अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यात खारीचा वाटा उचलू शकते का?, हा विचार मनात डोकावला. त्या दृष्टीने ‘मास्टर्स ऑफ कल्चरल स्टडीज’ या अभ्यासक्रमाचा शोध घेतला. या अभ्यासक्रमात वेगवेगळय़ा क्षेत्रांतील लोक प्रवेश घेऊ शकतात. जगभरातली संस्कृती कशी आहे, काळानुसार ती कशी बदलते आहे याचा अभ्यास यात केला जातो. त्यानिमित्ताने विविध देशांतील लोकांशी ओळख होते, त्यांचे रीतीरिवाज, संस्कृती, परंपरा कळतात. परदेशात जायचं ठरल्यावर अनेकदा अनेकांच्या देशांचा शोध अमेरिका नि ब्रिटन यांच्यापाशीच संपतो. खरंतर त्याहीपलीकडे असणाऱ्या युरोपातील बऱ्याच विद्यापीठांचं रँकिंग खूप चांगलं असतं. भाषेचा अडसर वाटला तरी इंग्रजीत अभ्यासक्रम उपलब्ध असतात. मी पोर्तुगालमधल्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅटोलिका’ आणि नॉर्वेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ ऑस्लो’मध्ये अर्ज केला होता. जर्मनीतही मी हा अभ्यासक्रम शोधत होते, पण तो काळ होता करोनाच्या भारतातल्या सुरुवातीचाङ्घ जर्मनीतील विद्यापीठांमध्ये पोस्टाने हार्ड कॉपी पाठवावी लागणार होती. त्या काळात ते कठीण असल्याने तो नाद सोडून दिला. नंतर मुलाखतीच्या फेरीत माझी ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅटोलिका’मध्ये निवड झाली. तिथे मी ‘मास्टर्स इन कल्चरल स्टडीज’ या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला.

मी अर्ज जूनमध्ये केला होता आणि सप्टेंबर २०२० पासून अभ्यासक्रम सुरू होणार होता. तेव्हा आपल्याकडे रुग्णसंख्या लक्षणीय होती. पोर्तुगालमध्ये आपल्यापेक्षा बरी परिस्थिती होती. त्यामुळे त्यांना आपल्याकडची परिस्थिती समजवावी लागली. शक्य होईल तितकं ऑनलाइन टाळणं हे आमच्या विद्यापीठाचं धोरण होतं. आम्हाला मास्कसह यायला सांगितलं होतं. तेव्हा मुंबईतील पोर्तुगालचा दूतावास बंद असल्याने अर्ज स्वीकारला जात नव्हता. मग गोव्यातल्या पोर्तुगालच्या दूतावासाशी मी ईमेलने संपर्क साधून माझी परिस्थिती कळवली. त्यांनी लगेच कळवलं की, एक दिवस वाट बघा, नाहीतर गोव्याला येऊन पुढची प्रवेश प्रक्रिया सुरू होऊ शकेल. पण गोव्याला जाऊन प्रवेश घेणं तरी कुठं सोप्पं होतं? सुदैवाने मुंबईतला पोर्तुगालचा दूतावास सुरू झाला. फक्त विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जात होते. व्हिसा मिळण्याची प्रक्रिया बऱ्यापैकी लांबली. त्यातही कोविड होऊ नये, म्हणून काळजी घेणं आवश्यक होतं. व्हिसा मिळण्याची प्रक्रिया पूर्ण होत आली तोवर आमचा अभ्यासक्रम सुरू झाला होता. मग महिनाभर ऑनलाइन शिकण्याची परवानगी मागितली. माझ्यासह अमेरिका आणि ब्राझीलमधल्या दोघी जणींना ऑनलाइन शिकण्याची परवानगी मिळाली. भारतील वेळेनुसार तेव्हा मध्यरात्र असायची आणि मी शिकत असायचे. सकाळी उठून गृहपाठ, अभ्यास करायचे. कधी मध्येच नेटवर्क गेलं तर तितक्या शिकण्यावर पाणी सोडायला लागायचं. व्हिसा मिळाल्यावर लगेच कोविडची चाचणी करून इथे आले. 

सुरुवातीला ओळखीचं कुणीच नव्हतं, कारण तोपर्यंत इथे आलेल्या इतर विद्यार्थ्यांचा एकमेकांशी चांगला परिचय झाला होता. त्यामुळे इथे स्थिरावणं आणि अभ्यास करणं यासाठी मला जास्त मेहनत करावी लागली. पोहोचल्यावर आठवडयाभरात मला सादरीकरण करायचं होतं. भारतातून निघताना त्याची तयारी करून ठेवली होती. ‘मेटाकल्चर’ ही थीम असणाऱ्या त्या सादरीकरणाचं कौतुक झालं. इथे आल्यावर स्वयंसिद्ध व्हायचं होतं. हळूहळू मित्रमंडळींची ओळख झाली. नंतर एका ग्रुप प्रेझेंटेशनसाठी आधी ऑनलाइन तयारी केली आणि मग इथे आल्यावर केलेलं तेही सादरीकरण चांगलं झालं. आमच्या विद्यापीठाच्या ‘समरस्कूल युरोपियन युनियन’कडून अर्थसाहाय्य मिळतं. आमच्या विद्यापीठातील समरस्कूलची जुलै २०२१ची थीम होती कोविड. आमच्या पाच जणांच्या टीमने त्यावर लघुपट तयार करायचा विचार केला. तेव्हा लॉकडाऊनच्या वेळेच्या घोषणा व्हायच्या त्यानुसार वेळा ठरवून आम्ही सार्वजनिक बागेत सराव केला आणि नंतर रेकॉर्डिग केलं. त्यात कोविडमुळे कलाकारांची मन:स्थिती काय झाली आहे, याचं प्रतिबिंब दाखवलं. लघुपटाच्या प्रदर्शनानंतर आम्ही प्रेक्षकांशी संवाद साधला. त्यातील गाण्याचे हिंदी शब्द माझ्या बाबांनी लिहिले होते. त्या गाण्याचा टीममधल्या फिलिपाइन्समधल्या मित्राने फिलिपिनी भाषेत अनुवाद केला. नृत्यावर आधारलेला हा लघुपट सगळय़ांना आवडला. आम्ही तो ‘कोपेनहेगन समरस्कूल’मध्ये पाठवला आणि तो निवडला गेला. मित्र पीएचडीचा असल्याने त्याला फंडिंग होतं, पण आम्हा पदवीच्या विद्यार्थ्यांना नव्हतं. कोपेनहेगनला जायला अर्थसाहाय्य मिळण्यासाठी मी विद्यापीठातल्या विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांना ईमेल लिहिले. त्यांनी ६० टक्के अर्थसाहाय्य दिलं. मास्टर्सच्या अभ्यासक्रमासाठी असं अर्थसाहाय्य पहिल्यांदाच मिळत होतं. आम्ही तिथे हा लघुपट सादर केला. दरम्यान, मला हे जाणवलं की आपल्या समृद्ध भारतीय संस्कृतीची परदेशात तितकी माहिती नाही. त्यांना तिची झलक दिसते ती बॉलीवूडच्या चित्रपटांमधून. शास्त्रीय नृत्यकलेबद्दल त्यांना फारशी माहिती नाही. त्यांना आपली कला-संस्कृती जाणून घेण्यात रस आहे. फक्त ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. माझ्या अभ्यासक्रमात मी एकटीच भारतीय असल्याने माझी जबाबदारी अधिकच वाढते. भारतीय संस्कृती आणि कला योग्य तऱ्हेने त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, हे माझं कर्तव्य आहे. दोन्ही समरस्कूलमधला हा आठवडाभराचा काळ खूप काही शिकवून गेला.

आमच्या प्रत्येक विषयाचं एक सादरीकरण असतं. या २० ते ३० मिनिटांच्या सादरीकरणाच्या विषय निवडीचं स्वातंत्र्य आम्हाला असतं. सादरीकरणानंतर प्रश्नोत्तरं होतात. फायनल सबमिशनच्या वेळी त्या विषयावरचं सविस्तर टिपण लिहायचं असतं. मी घेतलेल्या एका विषयात भारतीय आणि युरोपीय चित्रांकडे बघून वाटणाऱ्या भावनेबद्दल देश-परदेशातल्या मित्रमैत्रिणींचे अभिप्राय विचारले होते. चित्र कोणतंही असलं तरी बघणाऱ्याच्या भावना सारख्याच असतात, हा माझा निष्कर्ष होता. दुसऱ्या ‘कॉग्निशन अ‍ॅण्ड क्रिएटिव्हिटी’ या विषयात कल्पना आणि मेंदूची सांगड कशी होते, ते बघायचं होतं. आणखी एक विषय होता- ‘परफॉर्मेटिव्हिटी अ‍ॅण्ड कल्चर’ (Performativity &  Culture). तर एकदा नाटक आणि परफॉर्मन्स असा विषय अभ्यासायचा होता. आम्ही शेक्सपिअरचं ‘The tempest’ वाचून तेव्हाची संस्कृती, परंपरा या विषयीची निरीक्षणं नोंदवली. शिवाय त्यातले काही मुद्दे त्यानंतर आणि आताच्या काळात कसे प्रतिबिंबित होतात, हेही अभ्यासलं. संस्कृतीच्या बदलाचे विविध टप्पे आणि वर्तमानात डिजिटल युगातल्या असंख्य गोष्टींमुळे होत असलेले आणि होऊ शकणारे बदल यांचा अभ्यास आम्ही करत आहोत. 

‘भरतनाटय़म : काल, आज, उद्याही’ हा माझ्या दुसऱ्या वर्षांच्या प्रबंधाचा विषय आहे. इतकी शतकं उलटूनही भरतनाटय़म लोकांना भावतं आहे. कोविडमुळे स्टेजवरच्या सादरीकरणाला मर्यादा आल्या, पण त्यात न अडकता विविध समाजमाध्यमांच्या साहाय्याने अनेकांनी आपली कला सादर केली. हे ‘ई सादरीकरण’ कसं झालं, त्याचा परिणाम काय झाला आणि पुढे काय होऊ शकतं, याचा वेध घ्यायचा प्रयत्न मी करते आहे. या प्रबंधाचे मार्गदर्शक प्रा. पीटर हेनेनबर्ग आहेत. माझ्या प्रेरणापत्रात (मोटिव्हेशन लेटर) त्यांच्यासोबत काम करायला मिळालं तर छान वाटेल, असं लिहिलं होतं. इथे आल्यावर ते प्रत्यक्षात घडेल, असा विचार केला नव्हता. त्यांचं मार्गदर्शन फार मोलाचं आहे. त्यांनी माझे विचार आणि लिखाणात समतोल साधला. माझ्या कल्पना समजून घेतल्या. कायम प्रोत्साहन दिलं. इथे अनेक मित्रमंडळी जोडली. या दोन वर्षांत माझा व्यक्तिमत्त्व विकास झाला. नवीन गोष्टी कळल्या. दृष्टिकोन बदलला. कोविड काळामुळे दोन वर्षांत मी घरी येऊ शकले नाही. हा कठीण काळ पालकांमुळे निभावून नेता आला.  

पोर्तुगालमधल्या भारतीय दूतावासात २६ जानेवारी २०२२ रोजी भरतनाटय़म सादरीकरणाची संधी मला मिळाली. इतर दूतावासांमधील राजदूत आणि अधिकारी तेव्हा उपस्थित होते. त्या भावना शब्दांत मांडता येणार नाही. इथे आपण भारताचं प्रतिनिधित्व करत आहोत, याचा फार अभिमान वाटला. मान्यवरांनी माझं कौतुक केलं, यापेक्षा त्यांच्यापर्यंत भरतनाटय़म अल्पशा रूपात पोहोचवता आलं, याचा आनंद वाटला. यंदाच्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने दूतावासात भरतनाटय़मचं आणखी एक सादरीकरण करायची संधी मिळाली. शिवाय, चित्रकला प्रदर्शनांच्या उद्घाटनप्रसंगी, कला मेळाव्यांमध्ये भरतनाटय़म सादर केलं. अलीकडेच लिस्बनमध्ये झालेल्या ‘रॉक इन रियो’ या जागतिक स्तरावरील जंगी म्युझिक फेस्टिव्हलमध्ये मी भरतनाटय़म सादर केलं. सप्टेंबरमध्ये मास्टर्स पूर्ण झाल्यानंतर मी पीएचडीसाठी तयारी करणार असून नंतर त्यासाठी अर्ज करणार आहे. पीएचडीला शास्त्रीय नृत्य हाच विषय घ्यायचा विचार आहे. विश मी लक. 

शब्दांकन – राधिका कुंटे