शब्दांकन : राधिका कुंटे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अश्विनी मसलेकर, M. S. Ed International Educational Development Program, युनिव्हर्सिटी ऑफ पेनसेलव्हेनिया ग्रॅज्युएट स्कूल ऑफ एज्युकेशन, फिलेडेल्फिया, यू.एस.ए.
सध्या मी वॉशिंग्टनच्या ‘FHI360’मध्ये ऑनलाइन इंटर्नशिप करते आहे. तिथल्या बऱ्याच प्रकल्पांत सहभागी होते आहे. शिक्षण आणि जागतिक हवामान बदल कसे जोडलेले आहे आणि शिक्षणातून हवामान बदलाविषयी काय उपाय निघू शकेल यावर संशोधन करते आहे. त्याचबरोबर पूर्व युरोपातील देशातल्या एका प्रोजेक्टचं मूल्यमापन करण्याचं कामही सुरू आहे. काम संपल्यावर लॉगआऊट करताना स्क्रीनवरचा एक फोटो दिसला आणि उलगडला गेला अनेक आठवणींचा खजिनाङ्घ
मुंबई विद्यापीठातून मी एम.ए. (अर्थशास्त्र) केलं. तेव्हापासून शिक्षण क्षेत्रात जायची इच्छा होती. पण तेव्हा हाती फारशी माहिती नव्हती. घरच्यांनी काळजीपोटी शिक्षण घेतलं त्याच क्षेत्रात नोकरी करायचा सल्ला दिला. मुळात आमच्या घरात शिक्षक-प्राध्यापक असल्याने शिक्षणाचं वातावरण होतंच. बाबा भारतीय वायूसेनेत असल्याने त्यांची अनेक ठिकाणी बदली झाल्याने बऱ्याच शाळांमध्ये शिक्षण झालं होतं. या सगळय़ा गोष्टी डोक्यात कुठंतरी होत्या. पुढे प्लेसमेंट सुरू झाली, पण ते काही माझ्या मनास येईना. दरम्यान, मला ‘टीच फॉर इंडिया’ची जाहिरात दिसली. त्या अंतर्गत पालिका शाळेतील मुलांना शिकवायची संधी मिळते. शिक्षण क्षेत्रात येण्यासाठी छोटंसं दार किलकिलं झाल्यासारखं वाटल्याने मी अर्ज केला आणि माझी निवड झाली. मी विक्रोळीच्या पालिका शाळेत सातवी-आठवीच्या मुलांना इंग्रजी आणि सामाजिक शास्त्र हे विषय शिकवले. वाटलं की सरकारी शाळा सर्वदूर पोहोचू शकतात. त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं. तिथली मुलं आणि प्रसंगी शिक्षकही खूप कठीण परिस्थितीतून जात असतात. त्यासाठी काम करणाऱ्या संस्थेत आपण काम करावं, असंही दोन र्वष संपताना डोक्यात होतं. नंतर पुण्यातल्या ‘लीडरशिप फॉर इक्विटी’ संस्थेमध्ये काम करू लागले. तिथली तीन र्वष प्राथमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भात आणि शिक्षणाधिकाऱ्यांसोबत काम केलं. मात्र, ‘आपण काम करत असलो तरी आपलं ‘शिक्षण’ या क्षेत्रातलं नाही. आपण एका चौकटीचाच विचार करतो आहोत. जगभरात याविषयी काय सुरू आहे, ते फारसं कळत नाही’, हा विचार सतत मनात येत होता. ‘आपण शिक्षण क्षेत्रातच पदव्युत्तर शिकायचं का’ असं वाटू लागलं. सहज सर्च करताना ‘इंटरनॅशनल एज्युकेशन डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ची माहिती कळली. मग त्या दृष्टीने मी आणखी विद्यापीठांचा शोध घेऊ लागले. या क्षेत्रातलं भारतातलं शिक्षण चौकटीतलं होतं आणि मुख्यत्वे शिक्षक घडवण्यावर भर देणारं होतं. अमेरिकेत खूप पर्याय होते आणि आर्थिकदृष्टय़ा ते चांगले होते. तेव्हा तिथेच शिकायला जावं, हा निर्णय घेतला.
पुढचं शिक्षण घेण्यासाठी नोकरी सोडणं, हा खूप मोठा निर्णय होता. कारण माझं काम चांगलं सुरू होतं. तरीही मी परदेशी शिक्षणासाठी गेले तर मला स्वयंसिद्ध होण्यासाठी ही एक सुसंधी होती, असं ताईने सुचवलं. सखोल विचारपूर्वक निर्णय घेतल्यानं मला आई-बाबांनी ठामपणे पाठिंबा दिला. पाच विद्यापीठांमध्ये अर्ज केल्यावर सगळीकडूनच होकार आला. तरीही मला मनातून फिलाडेल्फियामधल्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ पेनसेलव्हेनिया ग्रॅज्युएट स्कूल ऑफ एज्युकेशन’मधल्या ‘M. S. Ed International Educational Development Program’ साठी प्रवेश मिळावा, असं प्रकर्षांने वाटत होतं. २०१८ पासून त्याबद्दल वाचत आले होते. तिथले प्राध्यापक, शिक्षणपद्धत याविषयी ओढ वाटत होती. पाचपैकी एके ठिकाणी होकार कळवला होताही, पण सगळय़ात शेवटी या विद्यापीठाचा होकार आल्यावर आधीच्या विद्यापीठाला नकार कळवून लगेच इथे फेब्रुवारी २०२० मध्ये प्रवेश घेतला. सप्टेंबरमध्ये अमेरिकेत जायचा बेत ठरला होता, पण मार्चमधल्या कोव्हिडच्या संकटामुळे सगळय़ा गोष्टी फिस्कटल्या.
आमच्या विद्यापीठाने जूनपर्यंत शिक्षण ऑनलाइन की ऑफलाइन हा निर्णय कळवला नव्हता. सुदैवानं माझं ऑनलाइन काम करणं सुरू होतं. तो काळ खूपच कठीण होता. सगळं अधांतरी होतं. शेवटी डिसेंबपर्यंत ऑनलाइन शिक्षण होणार हा निर्णय कळला. ‘तसं चालणार असेल तर होकार कळवा नाहीतर पुढल्या वर्षांसाठी अर्ज करा,’ असं विद्यापीठाने सांगितलं. दुसरा पर्याय मी बादच केला. घरच्यांशी सविस्तर चर्चा केली आणि होकार कळवला. ऑनलाइन वर्ग आणि अर्धवेळ काम ही तारेवरची कसरत होती. माझं पदव्युत्तर शिक्षण वर्षभरात किंवा दोन वर्षांत करता येण्याची मुभा होती. तो निर्णय विद्यार्थ्यांना घेता येतो. ऑनलाइन वर्ग भरवणं, ही गोष्ट विद्यापीठाने खूप चांगल्या पद्धतीने प्रत्यक्षात घडवली. कॅनव्हास सॉफ्टवेअरमध्ये रििडग्ज, व्हीडिओज, ऑनलाइन लेक्चर्स होती. लाइव्ह लेक्चर्स असायची. आशियामधल्या विद्यार्थ्यांच्या वेळाही लक्षात घेतल्या गेल्या. दर शुक्रवारी दोन तास रिसायटेशन अवर असायचा. जगभरातले आम्ही ३८ विद्यार्थी एकाच वेळी झूमवर भेटायचो. एकमेकांची ओळख, देशाची संस्कृती आणि परंपरांची माहिती द्यायचो. त्यातून टीम बििल्डग व्हायचं. एकमेकांविषयी माहिती कळायची. कधी तज्ज्ञ मंडळींचं मार्गदर्शन असायचं. त्या मिटिंग्जमधून काही मित्र-मैत्रिण झाले. काही टाइम झोन्सचे ग्रुप झाले. एकत्र प्रकल्प करणं, वाचन करणं अशा गोष्टी घडल्या. त्यासाठी प्राध्यापकांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिलं. संचालक डॉ. अमीन गफार-कुहेर खूपच छान शिकवायचे. इंटरॅक्टिव्ह सेशन्स घ्यायचे. ऑनलाइन वर्गात अभ्यासक्रमातलं काही हुकलं नाही, पण प्रत्यक्षातलं शिकणं, वर्गातली धमाल मिस केली, ही हुरहुर राहणारच.
दहावीच्या परीक्षेत आला नसेल इतका व्हिसाचा ताण आला होता. तेव्हा आपल्याकडे लस आली नव्हती. काळ होता ऑक्टोबर २०२०. आपल्याकडचा लॉकडाऊन नुकताच उघडला होता. अमेरिकेत परिस्थिती निवळली नव्हती. मग रोज बातम्या बघायचे. दोन्ही देशांतले कोव्हिडसंदर्भातले बदलते नियम, विमान व्यवस्था याकडे सतत लक्ष ठेवून होते. मग एअर इंडियाने एअर बबल सुरू केलं होतं. मर्यादित लोकांना व्हिसा मिळू लागल्याचं कळलं. तेव्हा समाजमाध्यमांवर परदेशी जाऊ इच्छिणाऱ्यांचे ग्रुप तयार झाले. एकमेकांशी माहितीची देवाणघेवाण होऊ लागली. आम्ही चौघींनी एकत्र जायचं, राहायचं ठरवलं होतं. व्हिसाची मुलाखत होऊन व्हिसा मिळेपर्यंतचा काळ खूप ताणात गेला. मी इथे जानेवारी २०२१ मध्ये आले. ऑनलाइन भेटल्यामुळे सगळय़ांशी ओळख झाली होती. तसं नसतं तर ओळख करून घेण्यापासून सुरुवात करावी लागली असती. इथल्या आर्थिक आणि व्यावहारिक गोष्टींचा विचार न केल्यामुळे ते माहिती करून घेण्यात थोडासा वेळ गेला. आले तेव्हाही ऑनलाइन लेक्चर्स सुरू होती. तरी बरंच काही एक्सप्लोर करता आलं. जिममध्ये जाता आलं. ग्रंथालयाचा वापर करता आला. मेपर्यंत लेक्चर्स ऑनलाइनच सुरू होतं. इथे आल्यावर लसीकरण सुरू झालं होतं. ‘सगळय़ांचं समरच्या सुट्टीत लसीकरण पूर्ण झाल्यास त्यानंतर सप्टेंबरपासून ऑफलाइन सुरळीत होईल,’ असं विद्यापीठाने सांगितलं, ते तसं झालं. चीनमधल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइनच शिक्षण घ्यावं लागत होतं. शिवाय काही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या व्हिसाचा प्रश्न होता, त्यांना ऑनलाइन लेक्चर्सची परवानगी मिळाली. पूर्ण लसीकरण आणि मास्कशिवाय विद्यापीठात प्रवेश नाही. आता मी दोन वर्षांचं शेडय़ुल घेतलं आहे. सगळय़ांच्या सोबत बसून अभ्यास करणं, ही वेगळीच गोष्ट वाटत होती. मास्कमुळे काही वेळा मजेशीर प्रसंग घडतात. वर्गातले मित्र-मैत्रिणी आणि प्राध्यापकांशी प्रत्यक्ष बोलायला मिळणं, शंका विचारायला मिळणं ही गोष्ट मोठी वाटली. प्रत्यक्ष प्रकल्पांचा अभ्यास, सादरीकरण आणि संदर्भाचा वापर करता येणं शक्य झालं. प्रत्यक्ष भेटींतून कधी प्रेरणा मिळते. कधी दुसऱ्या अभ्यासक्रमाची माहिती मिळते. नकळत आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत राहतो.
जानेवारी २०२१ मध्ये मी क्वालिटेटिव्ह रिसर्चचा कोर्स करत होते. प्राध्यापक डॉ. नकुला यांनी आम्हाला पुढल्या आठवडय़ात संशोधनाचा विषय चर्चा करून ठरवायला सांगितला होता. दरम्यान, दुसऱ्या कोर्समधली माझी व्हिएतनामची मैत्रीण मिकेला हिने व्हिएतनाममधल्या बारावीच्या विद्यार्थ्यांशी बोलून त्यांचे करिअरविषयक विचार जाणून घ्यायचं ठरवलं होतं. त्यासाठी त्यांना कोणाचं कसं किती मार्गदर्शन मिळतं, करिअरशोधासाठी ते कोणती संसाधनं वापरतात, पाठिंबा कसा मिळतो आदी मुद्दय़ांचा ती मागोवा घेणार आहे. विचारांती हा विषय मला खूप भावला. तिलाही चालणार होतं आणि डॉ. नकुलांनी खूप प्रोत्साहन दिलं. त्यांनी या प्रकल्पाचा आवाका वाढवायला संमती दिली आणि सतत मार्गदर्शन केलं. मग दुसऱ्या एका प्रोग्रॅममधली तुर्कीची डेनीझ ही मैत्रीणही आमच्या संशोधनात सामील झाली. तिने तुर्कीमध्ये मुलाखती घेतल्या. ‘मेंटिरग सोर्सेस इन फ्युचर प्लॅनिंग फॉर स्टुडन्ट्स इन व्हिएतनाम अॅण्ड अॅम्प तुर्की – अ क्वॉलिटेटिव्ह स्टडी’ या आमच्या संशोधनाचं विश्लेषण झालं आहे. लिखाण मेपर्यंत पूर्ण करायचं आहे. हे संशोधन पूर्ण व्हायला किमान एक-दोन र्वष लागतील. दरम्यान, आपल्याकडच्या दहावी-बारावीच्या मुलांना विषय निवडीचे पर्याय असतात का, कुणाचा, कसा पाठिंबा मिळतो, याचा आपण शोध घ्यावा, असा माझ्या डोक्यात एक विचार आला. मिताली ही भारतीय मैत्रीण माझ्या या प्रकल्पात सहभागी झाली. आता आम्हाला एसएस्सी बोर्डातल्या विद्यार्थ्यांची मुलाखत घ्यायची आहे. बराच वेळ या सगळय़ासाठी द्यावा लागतो आहे. भारतातील संशोधनाला नुकतीच सुरुवात झाली असून ते पूर्ण व्हायला साधारण वर्ष लागेल.
वर्गातल्या या प्रकल्पाचा विचार करून कामाला लागलो आणि समर व्हेकेशन सुरू झाली. आम्ही एकमेकींच्या संपर्कात होतो. ग्लोबल पॉसिबिलिटी नेटवर्क या प्लॅटफॉर्मविषयी डॉ. नकुला यांच्याकडून कळलं. या व्यासपीठाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत आणि स्तरांवर काम करणाऱ्यांना एकत्र आणत आहेत. विद्यार्थ्यांच्या करिअर घडणीवर चर्चा करण्यासाठी एका परिषदेचं आयोजन करण्यात येणार होतं. त्यात आम्हाला सादरीकरण करता येऊ शकेल, असं डॉ. नकुला यांनी सांगितलं. आम्ही झपाटून जाऊन सुट्टी असल्याने आपापल्या घरून ऑनलाइन तयारी आणि सादरीकरण केलं. बाकी सगळी मंडळी त्या त्या क्षेत्रांतली मातब्बर मंडळी होती. त्यांच्यापैकी काहींनी थेट मुलांचा आवाज आणि मत सगळय़ांपर्यंत पोहोचवल्याबद्दल आमचं कौतुक केलं. तेव्हा आपण योग्य दिशेनं वाटचाल करतो आहोत, हे अधोरेखित झालं आणि काम करायला हुरूप आला. हा अभ्यासक्रम संपल्यानंतर परदेशातल्या आंतरराष्ट्रीय संस्थेत आणखी कामाचा अनुभव गाठीशी बांधायच्या दृष्टीने नोकरीचा शोध घ्यायला मी सुरुवात केली आहे. त्यानंतर भारतात यायचा विचार आहे. चला, आता आठवणींचा खजिना आवरता घेते आणि संशोधनाकडं वळते.
कानमंत्र
- किमान दोन वर्ष कामाचा अनुभव घेऊन मग पदव्युत्तर शिक्षण घेतल्यास त्याचा निश्चित फायदा होतो.
- विद्यापीठ निवडताना जॉब व्हिसा, पुढच्या करिअरसाठी मिळणाऱ्या संसाधनांसह व्यावहारिक-आर्थिक बाबींचाही सखोल विचार करायला हवा.
viva@expressindia.com