vv08नव्या पिढीचा गायक, संगीतकार, रिअ‍ॅलिटी शोचं व्यासपीठ गाजवणारा, रॉक म्युझिक बॅण्डमध्ये झोकून देऊन गाणारा आणि शास्त्रीय संगीताच्या तानाही तितक्याच नजाकतीनं घेणारा हरहुन्नरी कलाकार जसराज जोशी सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!

२७ जानेवारी. जागतिक मराठी दिन. यानिमित्ताने माझ्या लहानपणी माझ्यावर सांगीतिक संस्कार करणाऱ्या मराठी कलाकारांची प्लेलिस्ट..
लहानपणी मी सर्वात जास्त कोणाची गाणी ऐकली, बसविली असतील, तर ती बाबूजी म्हणजेच सुधीर फडके आणि अण्णा म्हणजेच भीमसेन जोशी यांची. स्वत: बाबूजी, राम फाटक, प्रभाकर जोग, यशवंत देव या संगीतकारांची बाबूजींनी गायलेली भावगीते उदाहरणार्थ- ‘दिसलीस तू फुलले ऋतू’, ‘तोच चंद्रमा नभात’, ‘आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको’,  ‘प्रिया आज माझी नसे साथ द्याया’, ‘सखी मंद झाल्या तारका’ अशी गाणी सतत माझ्या कानांमध्ये आणि जिभेवर तयार असायची. तीच गोष्ट अण्णांच्या अभंगवाणीबाबत. भीमसेनी थाटातील ते ‘तीर्थ विठ्ठ्ल क्षेत्र विठ्ठ्ल’, ‘पंढरी निवासा सख्या पांडुरंगा’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘याजसाठी केला होता अट्टहास’, ‘मन रामरंगी रंगले’, ‘इंद्रायणी काठी’ आजही कानात रुंजी घालत राहतात.
लहानपणी ही गाणी भरपूर ऐकल्यामुळेच बाबूजी आणि अण्णा यांचा माझ्या गायकीवर आपोआपच खूप प्रभाव पडलेला आहे; त्याचबरोबर वेगळा विचार करायची इच्छा जागृत झाली; ती अभिषेकी बुवांमुळे! पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांच्या शिष्यांनी त्यांच्या रचनांचा एक कार्यक्रम केला होता. या कार्यक्रमाच्या रेकॉìडगची कॅसेट मला माझ्या आजोबांनी तेव्हा आणून दिली होती. ती ऐकून माझा नाटय़गीत या प्रकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. खासकरून त्या कॅसेटमध्ये शौनक अभिषेकी यांनी गायलेल्या ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ (नाटक : ययाती-देवयानी)चा तर मी फॅनच झालो! तसेच ‘रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी..’ आणि ‘कशी तुज समजावू सांग’ ही भावगीते ऐकून भावगीत या शब्दाची माझ्या मनातली व्याख्याच बदलून गेली! ‘छेडून गेले मधुर स्वर विमल’ (नाटक-कधी तरी कुठे तरी); तुझ्या अंगसंगाने..’(नाटक : मीरा मधुरा) ‘कधी भेटेंन वनवासी वियोगी रामचंद्राला’ (धाडीला राम तिने का वनी) हे वेगळ्याच आर्त, आद्र्र भावाचे नाटय़गीत, ‘महानंदा’ मधील ठुमरीवजा गाणं- ‘तुझीया गे चरणीचा झालो मृगनयनी दास’ अशीच गुंतवून ठेवणारी गाणी. ‘मत्स्यगंधा’मधील ‘गुंतता हृदय हे’ तुम्ही ऐकलं असेल. ‘या इथे जाहला संगम दो सरितांचा’ या कडव्यात दोन नद्यांचा संगम म्हणून प्रतीकात्मकरीत्या दोन निषादांचा कल्पक वापर केला आहे.. अफलातून. शेवटी अर्थातच ‘ययाति आणि देवयानी’ मधले ‘सर्वात्मका सर्वेश्वरा..’ त्या एका कॅसेटमुळे माझी विचार-प्रक्रियाच बदलून गेली!
असेच काहीसे परत झाले ते श्रीधर फडके यांची गाणी ऐकून! गाणी रेकॉर्ड आणि अरेंज करताना सुश्राव्य ध्वनीचाही गंभीररीत्या विचार करण्याचा काळ आणि तसे तंत्रज्ञान तेव्हा हळूहळू विकसित व्हायला लागले होते आणि तशात ‘तेजोमय नादब्रह्म’ या अल्बमने माझे अक्षरश: कान उघडले! सुरेश वाडकर आणि आरती अंकलीकर यांच्या काहीशा अनवट मिश्रणातून साकारलेला अल्बम –  ‘मी राधिका’, ‘मी एक तुला फूल दिले’, ‘कधी रिमझिम’, ‘दे साद दे हृदया’ इत्यादी गाण्यांमध्ये चाल आणि गायकीचे सौंदर्य वादातीत आहे.
मला आठवतेय, त्या काळात ‘संतवाणी’ या सदराखाली संध्याकाळी साधारण दुपारी ४  वाजता दूरदर्शन सहय़ाद्रीवर दररोज दोन-तीन मिनिटे भक्तिगीते ऐकवली जायची. उतरत्या उन्हाचा खिडकीतून येणारा कवडसा आणि श्रीधर फडके यांची ‘येई वो विठ्ठ्ले..’, ‘आम्हां न कळे ध्यान.’, ‘देवाचिये द्वारी, उभा क्षण भरी..’ ‘विठ्ठल आवडी प्रेमभावो’.. घरातील त्या वेळचं दृश्य आठवून आत्तासुद्धा अंगावर काटा आला.
श्रीधर फडके यांच्या ‘फिटे अंधाराचे जाळे’, ‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी’, आणि संपूर्ण ‘ऋतू हिरवा’ हा आल्बम, यांचा फक्त उल्लेखच पुरेसा आहे.. ती तुम्ही ऐकलीच असणार.
    

Sarangi maestro Pt Ram Narayan passes away
व्यक्तिवेध : पं. रामनारायण
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
Viral Indonesian Siblings Render The Most Adorable Version Of Dhoom Track Dilbara
गिटार वाजवत मोठ्या भावाने गायले गाणे, छोट्याने किंचाळत…., इंडोनेशिअन भावाडांनी जिंकले नेटकऱ्यांचे मन, पाहा Viral Video
Sharda Sinha, Chhath Puja songs, Bihar,
शारदा सिन्हा… छठ पूजा गीतांना अजरामर करणारी ‘बिहार कोकिळा’
kiara advani and mithun chakravarti
मिथून चक्रवर्ती ते कियारा अडवाणी, बॉलीवूडमधील ‘या’ लोकप्रिय कलाकरांची खरी नावे माहित आहेत का?
Neelu Phule And Prasad Oak
“मला त्याच वेळेला ऑस्कर…”, निळू फुलेंची आठवण सांगत प्रसाद ओक म्हणाला, “त्यांनी मला फोन केला आणि…”
Loksatta vyaktivedh Quincy Jones Producer Music Composer movie Background music of serials
व्यक्तिवेध: क्विन्सी जोन्स

हे  ऐकाच..
अमृतगाथा आणि लोकगीते
चंद्रकांत काळे हे नाव त्यांच्या सहजसुंदर अभिनयामुळे, आणि स्वच्छ वाणीमुळे तुमच्या नक्कीच परिचयाचे असेल, मला त्यांचा परिचय झाला, तो त्यांच्या प्रयोगशील गायकीतून! अर्थात चंद्रकांत काळेंच्या चाहत्यांसाठी त्यांनी गायलेली गाणी हा काही नवीन भाग नाही, पण मी पहिल्यांदा त्यांना ऐकले, ‘अमृतगाथा’ या अल्बममधून. भक्तिसंगीताची, किंबहुना भक्तीची एक नवी मितीच माझ्या डोळ्यांसमोर आली! अमृतगाथा हे स्व. आनंद मोडक, माधुरीताई पुरंदरे आणि चंद्रकांत काळे यांनी एकत्र येऊन केलेले सादरीकरण फारच वेगळे आणि प्रयोगशील आहे. सर्वच संतसाहित्याला चाल लावताना आणि त्या चाली सादर करताना पठडीबाहेरचा विचार केला आहे. विशेषत: ‘राजस सुकुमार’ हा तुकारामांचा अभंग.. मस्तच! तसेच ‘हमाम्मा रे पोरा’, ‘गवळणी ठकविल्या’, ‘आम्ही लटिके ना बोलू’, ‘जळे माझी काया’.. सर्वच गाणी आवर्जून ऐकण्यासारखीच! त्याचप्रमाणे कै. केशवराव बडगे यांची लोकगीतेही माझ्यासारख्या गायकावर वेगळे संस्कार करून गेली. लोकगीतांच्या परंपरेला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त करून देणाऱ्या केशवराव बडगे यांची- ‘खेळे भवरा गं बाई भवरा.’, ‘पोरी हळू चाल जोडवं टचकंल..’, ‘बिकट वाट वहिवाट नसावी..’ आणि तौफिक कुरेशी यांच्याबरोबर गायलेले सुप्रसिद्ध ‘जी जी रे’ ही गाणी ऐकली नसतील तर नक्की ऐकावी अशीच!  
जसराज जोशी -viva.loksatta@gmail.com