लायब्ररीमधला पेपर त्याने ढापून आणलेला आणि मन लावून काही तरी वाचत होता. काही वेळ कुणीच त्याला काही बोललं नाही, पण टाइमपास होत नाही म्हटल्यावर अभ्याने काडी टाकलीच. ‘चोच्या, ० एवढा मन लाऊन अभ्यास केला असतास तर मेरिटमध्ये आला असतास, आता नोट्सच्या भिका मागतोस तशा मागाव्या लागल्या नसत्या.’ चोच्या थोडा वेळ काहीच बोलला नाही. गुमान वाचत बसला. वाचून झाल्यावर मात्र त्याने आपलं तोंड उघडलं. ‘हरामखोरा, अरे बातमीच तशी होती, म्हणून वाचत होतो. उद्धव ठाकरे म्हणतात की, शिवसेना प्रमुखपद स्वीकारणार नाही. कारण बाळासाहेबच त्या पदासाठी होते’ असं बोलत चोच्याने वातावरण गंभीर केलं.
‘हो यार, बाळासाहेबांना देशातले सारेच घाबरायचे आणि तेवढाच आदरही करायचे. कारण त्यांचं व्यक्तिमत्त्वही तसंच होतं. पण त्यांच्यानंतर सेनेचं काय होणार, हा प्रश्न सोपा नाही,’ असं सुप्रिया म्हणाली. यावर संत्या म्हणाला, ‘एक सांगू का, आपल्या आई-पप्पांच्या पिढीला विचारा बाळासाहेब त्यांच्यासाठी काय होते ते. पण आता काळ बदललाय, आता आपल्यासारखी यंग जनरेशन राज ठाकरेंना सपोर्ट करणारी, त्यांना फॉलो करणारी. शिवसेना आणि मनसे दोघांचेही विचार सारखेच. त्यामुळे मला तरी वाटतंय की मनसेला यापुढे भरपूर पाठिंबा मिळू शकतो. पण आता बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे सेना कशी चालवतात यावर सारं काही असंल बघं,’ असं अभ्या म्हणतो न म्हणतोच तेवढय़ात स्वप्ना म्हणाली, ‘यु आर राइट यार, पण खरं सांगू का, आपल्या कॉलेजच्या इलेक्शनला बघं, किती काय काय होतं, आता येत्या इलेक्शनला कदाचित बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी शिवसेना आणि मनसे एकत्र इलेक्शन लढतीलही. पॉलिटिक्समध्ये काहीही सांगता येत नाही यार. आज एखाद्याला शिवी हासडली तरी काही दिवसांनी त्या दोन व्यक्ती एकत्र येताना आपण बघतोच, त्यामुळे यार आताच काही प्रेडीक्शन करणं चुकीचं ठरेल.’
‘तुझं बरोबर आहे यार, इलेक्शनमध्ये काय होईल काय माहिती, पण एक गोष्ट सांगू का आपल्या मराठी माणसाचा कोणी तरी वाली असायला हवा यार, बाकी कोणती पार्टी आपल्याला सपोर्ट करते सांगा. शिवसेनेमुळे आपण दंगलीत वाचलो, आता आपल्यापुढच्या समस्या थोडय़ा वेगळ्या आहेत. मराठी माणसांसाठी तरी या दोघांनी एकत्र यायला हवं यार, नाही तर आपणच महाराष्ट्रात परके होऊन जाऊ,’ असं सुशा म्हणाली.
यापुढे या विषयावर बरीच चर्चा झाली, अखेर चोच्याने सांगितलेला ‘अण्णा’चा चहा आला आणि चर्चेला ब्रेक लागला. ‘ते काय करतील ते करतील, आपण कशाला त्याचं टेन्शन घ्यायचं,’ असं चोच्याने म्हटल्यावर साऱ्यांनीच मान डोलावली आणि पुन्हा एकदा कट्टा आपल्याच टाइमपासमध्ये रंगला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा