गांधीजींच्या तत्त्वानुसार चरख्यावर सूत कातून स्वत: बनवलेले वस्त्र आपण सध्या वापरत नसलो तरी खादीचे वस्त्र आपण नक्कीच वापरतो. खादीचा प्रवास स्वदेशी चळवळीपासून फॅशन स्टेटमेंट पर्यंत झाला आहे. गांधी जयंतीच्या निमित्ताने खादी वस्त्रोद्योग भांडारांमध्ये खादीच्या कपडय़ांवर सूट दिली जाते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात खास खादीच्या कपडय़ांचे प्रदर्शनही ठेवले जाते.
खादी हे कापड मुख्यत: कॉटनपासून बनवले जाते. त्यामध्ये सिल्क किंवा लोकरीचा वापर केला जातो. थंडीत गरम आणि उन्हाळ्यात थंड वाटणारं हे ऑल सीझन मटेरियल. किंमत वसूल करणारं आहे. महात्मा गांधीजींमुळे आपल्या देशात खादीचा प्रसार झाला. त्यांच्या स्वावलंबी तत्त्वानुसार ब्रिटिशांकडून कापड घेण्यापेक्षा ते स्वत: चरख्यावर कपडे बनवत आणि वापरत. खादी मटेरिअल आता टेक्स्टाइल इंडस्ट्रीमध्ये मोठय़ा प्रमाणात बनत आहे. गांधींप्रमाणे चरख्यावर सूत कातून नाही तरी त्यांची परंपरा आपण जपली पाहिजे. त्यासाठी खादीला एक फॅशनेबल टच देऊन त्यात काय नावीन्य आणता येईल आणि कशा रीतीने वापरता येईल ते पाहू.
खादी हे आता ओल्ड फॅशन मटेरिअल न राहता वेस्टर्न आउटफिट्समध्येही दिसण्यात येते. रॅप्ड स्कर्ट, लॉन्ग मॅक्सी गाऊन्स आणि साडी यामध्ये खादीला जास्त मागणी आहे. शिवाय आता खादीमध्ये डल व्हाइट, खाकी, ऑफ व्हाइट, राखाडी अशा डल शेड्स न राहता केशरी, हिरवा, निळा असे ब्राइट रंग दिसतायत त्यामुळे खादीला एक वेगळा लुक आलाय आणि म्हणूनच फक्त स्वातंत्र दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन अशा वेळेला खादीचा उपयोग न करता तो आता लग्नकार्यात, फंक्शन्समध्ये आणि कॉपरेरेट लेवलवरही केला जातो. त्याचप्रमाणे खादीमध्ये आता विविध प्रिंट्सही पाहायला मिळतात.
लग्नकार्यात खादी सिल्कच्या साडय़ांना जास्त मागणी असते अशा साडय़ा नेसल्यावर आपल्याला एक कलात्मक, क्लासिक लुक येतो. या साडय़ांवर मोत्यांचा डिसेंट नेकलेस आणि इअरिरग्स एवढय़ा अॅक्सेसरीजसुद्धा आपल्या लुकमध्ये आणखी उठाव आणतात. नुकत्याच झालेल्या एका फॅशन शोमध्ये ‘गांधी ट्रिब्यूट’ या थीमला अनुसरून खादीपासून बनवलेले वेगवेगळे गार्मेट्स, वेगळ्या स्टाइलने ड्रेप केलेल्या साडय़ा रॅम्पवर पाहायला मिळाल्या. अशा गेटअपवर कोल्हापुरी चपला अगदी उठून दिसत होत्या.
आजकाल खादीचे फक्त कपडेच नव्हे तर खादीच्या बॅगा, खादीचे पेपर, सतरंजा, जाजम, ड्रॉइंग कॅनव्हास, टॉवेल, पंचा या गोष्टींसाठीही देशा-विदेशातून मागणी आहे. खादीच्या बॅगांमध्ये हत्तीची, हरणाची, झाडांची आणि मोठय़ा प्रमाणात राजस्थानी प्रिंटची मागणी ग्राहक करतात. शिवाय या बॅगांमध्ये वेगवेगळे पॅटर्नही पाहायला मिळतात. त्यामुळे कॉलेज गोइंग गर्ल्सला अशा बॅगा फॅशन म्हणून वापरता येतात. शिवाय त्यात जास्त सामानही राहत असल्यामुळे त्या कम्फर्टेबल असतात. त्यामुळे आपण कधी तरी आपल्या कम्फर्ट झोनसाठी जॉर्जेट, सिल्क, शिफॉन अशा विदेशी मटेरिअलपेक्षा आपल्या स्वदेशी खादी मटेरिअलचा वापर करायला काहीच हरकत नाही.
गुजरातच्या खादी- ग्रामोद्योग मंडळाने खादीच्या प्रसारासाठी आयोजित केलेल्या फॅशन शो मध्ये नामवंत डिझायनर रोहित बाल, अनामिका आणि प्रताप यांचं खादी कलेक्शन सादर करताना अभिनेत्री सोनम कपूर.
अमृता अरुण – viva.loksatta@gmail.com